मराठ्यांचा OBC मध्ये समावेश करण्यास विरोध का? भुजबळांनी सांगितलं खरं कारण

Chhagan Bhujbal On Why He Oppose Inclusion Of Maratha In OBC: मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी आज जालन्यातील जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर थेट नाव न घेता टीका केली. छगन भुजबळ यांचा मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करुन घेण्यास विरोध आहे. तर जरांगेंनी आज कुणबी म्हणून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. जरांगेंनी भुजबळांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आपला विरोध का आहे हे स्पष्ट केलं आहे.

ओबीसीमध्ये 375 जाती

“मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. मी एका वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. त्याचं नाव आहे ओबीसी. महाराष्ट्रात यामध्ये 375 जाती आहेत. त्यात वंजारी, धनगर, कुणबी, तेली, माळी, सुतार, लोहार अनेकजण आहेत. या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतो. मी ओबीसींसाठी लढतोय. सध्या तरी ओबीसी बचाव हेच आमचं काम आहे. ओबीसींचे प्रश्न सुटत आहेत. इथे तर आम्ही 54 टक्के म्हणतो. बिहारमधील जनगणनेमध्ये 63 टक्के आढळून आले. 54 टक्क्यांपेक्षा कमी आढळून येणार नाही. देशात एकूण लोकसंख्येच्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्या ओबीसींची आहे,” असं भुजबळ पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

हेही वाचा :  Mahayuti Seat Sharing : '...तरच जागा मागा', अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं

…म्हणून मी बोलतो

ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण देऊन नये हे बोलणं चुकलं असं वाटतं का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. पण ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करता कामा नये असं उत्तर दिलं. “ओबीसीच्या बाबतीत आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या असं एखादा मोठा समाज बोलत असेल. मोठ्या प्रमाणात अशी मागणी होत असेल आणि ओबीसीचे नेते गप्प बसलो तर राज्यकर्त्यांना, प्रसारमाध्यमांना हे कबुल आहे असं वाटले. काही हरकत नाही असं वाटले. पण हरकत असेल तर बोललं पाहिजे नाही,” असं भुजबळ म्हणाले.

मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर..

पुढे बोलताना भुजबळांनी, “सर्व आरक्षण वाटून ओबीसीच्या 375 जातींना 17 टक्के आरक्षण शिल्लक आहे. त्यामध्ये मराठासारखा मोठा समाज येऊन बसला तर कोणालाच काही मिळणार नाही. उरलेले 50 कोणाला हे काहीच कळत नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की त्यांना टीकेल असं वेगळं आरक्षण द्या. जे फडणवीस सरकारने दिलं होतं. ते थोडसं सुप्रीम कोर्टात अडकलं. सुप्रीम कोर्टात त्यावर पुन्हा चर्चा होणार आहे. त्यांना द्या वेगळं आरक्षण. माझा विरोध कधीच नाही. माझी हीच कायम भूमिका होती. मी 35 वर्ष ओबीसीचं काम करतोय. नेहमी माझी हीच भूमिका आहे,” असंही स्पष्ट केलं.

हेही वाचा :  Corona Return : नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाची लाट? वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवं संकट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …