ताज्या

गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्या फोडल्या : ‘ते महान…’; मनोज जरांगेची पहिली प्रतिक्रिया

Gunaratna Sadavarte: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील विविध ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाडीची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी ही तोडफोड केली असून एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही आंदोलक तरुणांकडून करण्यात आल्या आहेत.  मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी मुंबईतील क्रिस्टल टॉवर …

Read More »

आज पंतप्रधान शिर्डीत; साईबाबांच्या दर्शनानंतर विविध प्रकल्पांचे लोकार्पण, कसा असेल दौरा?

PM Modi Visit Maharashtra: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज महाराष्ट्राच्या मुंबई आणि नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दर्शनासाठी चार रांगांचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात येईल. त्याचबरोबर, उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. …

Read More »

Maharastra Politics : मराठा आरक्षणासाठी रोहित पवार यांनी घेतला धक्कादायक निर्णय!

Maratha reservation : सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केली नाही म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू करत आहे. पहिलं 17 दिवसांचं आमरण उपोषण झालं, आता कोणत्याही आरोग्य सेवा पाणी घेणार नाही, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पळापळ सुरू झाल्याचं चित्र समोर येतंय. दोन्ही नेत्यांनी सुपरफास्ट …

Read More »

Manoj Jarange Patil : झारीतले शुक्राचार्य कोण? मुख्यमंत्र्यांना कोण घालतंय खोडा? जरांगे पाटील स्पष्टच बोलले!

Maratha Reservation : दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्येच भाषण थांबवून शिवरायांची शपथ घेतली आणि मराठा आरक्षण देणारच, अशी ग्वाही दिली. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, असं सांगत एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथेबद्दल खुद्द जरांगे-पाटलांनी (Manoj Jarange Patil ) समाधान व्यक्त केलं. मात्र, सोबतच एक गुगली टाकली. मुख्यमंत्र्यांना आरक्षण …

Read More »

मराठा आरक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुखांचा फॉर्म्युला आहे तरी काय?

Maratha Reservation : मराठ्यांना कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे वारंवार डॉ.पंजाबराव देशमुखांचा उल्लेख करतायत.  भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुखांमुळेच विदर्भातील मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळालं. मात्र मराठ्यांना कुणबी आरक्षण कसं मिळालं, त्यासाठी पंजाबराव देशमुखांनी काय केल जाणून घेवूया.  राज्यात अनेक भागात मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्रं आहेत, त्याचं पूर्ण श्रेय जातं डॉ. पंजाबराव देशमुखांना.. पंजाबराव देशमुख यांची दूरदृष्टी होती म्हणून विदर्भातील मराठ्यांना कुणबी …

Read More »

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

Pune News Water Closure : पुणे शहरातील पाणी पुरवठा (Pune water supply) गुरुवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने (PMC) दिली आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा (Water supply Closure) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली. त्यामुळे आता पुणेकरांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.  …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी मागवले जातायेत अर्ज; आत्ताच फॉर्म भरा

BOM Recruitment 2023: तुम्हालाही बँकेत (Bank of Maharashtra) काम करण्याची इच्छा असेल तर एक सुवर्णसंधी चालून आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्रेडिट ऑफिसर (Credit Officer) पदाच्या 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या या मोहिमेच्या माध्यमातून संस्थेतील एकूण 100 पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीसाठी इच्छुक उमेदवार …

Read More »

कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

Company fire Employee: अनेक कंपन्यांच्या एचआर पॉलिसीमध्ये किचकट नियम असतात. जे कर्मचाऱ्यांच्या कधीच लक्षात येत नाहीत. पण भविष्यात याच नियमांमुळे कर्मचारी अडचणीत येतात. खासगी नोकरी असो की सरकारी नोकरी, पगारासोबतच कर्मचाऱ्याला इतर काही सुविधाही दिल्या जातात. हक्काच्या सुविधेचा फायदा न देताच कर्मचाऱ्यावर कारवाई करणे कंपनीला महागात पडले आहे. काय आहे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  एखाद्या व्यक्तीला गरजेच्या वेळी रजा …

Read More »

‘मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,’ राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला आहे. 28 मिनिटांच्या चर्चेत राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी, जातीय जनगणना, मणिपूर हिंसा यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं छातीठोकपणे सांगितलं. “निवडणुकीला फक्त 6 महिने राहिले आहेत. मोदी सरकार पुन्हा …

Read More »

‘आरक्षण देण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोणीतरी अडवतंय’ मनोज जरांगेंचा आरोप… तर अनेक गावात राजकीय नेत्यांना बंदी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू झालंय सरकारने आश्वासन देऊनही 40 दिवसानंतर आरक्षण न दिल्याने जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेयत. आता अन्न, पाणी, वैद्यकीय उपचारही घेणार नाही, असं कडक उपोषण करण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय .40 दिवस उलटूनही सरकारने गुन्हे मागे घेतले नाहीत. आत्महत्या केलेल्यांना मदत नाही. सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करत …

Read More »

अनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्… बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या

Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका बॅंक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात (sachin upadhyay murder case) रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पत्नीनेच बॅंक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बॅंक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस तपासात बॅंक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान, घरातल्या कामावालीने पोलिसांना (UP Police) दिलेल्या …

Read More »

‘…तर दुपारी 4 वाजेपर्यंत मराठा आरक्षणाचा कागद निघेल’; मोदींचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा दावा

Maratha Aarakshan Manoj Jarange: जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावामध्ये आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणाला बसत आहेत. मात्र त्यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत मनोज जरांगेंनी आरक्षण का दिलं जात नाही हे समजत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच …

Read More »

‘आम्ही दर 5 वर्षांनी जनतेकडे मतं मागायला…’; सरकारी कामांमधील न्यायालयीन हस्तक्षेपासंदर्भात चंद्रचूड यांचं वक्तव्य

CJI Chandrachud On Court Interference In Government Work: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेसंदर्भात आपलं एक निरिक्षण नोंदवलं असू सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आहे. जरी जनता न्यायाधिशांची निवड करत नसली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची असते. न्यायाव्यवस्था ही प्रगतशील सामजाच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावते, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाऊन यूनिव्हर्सिटी लॉ सेंटर आणि दिल्लीतील सोसायटी फॉर डेमोक्रेटिक …

Read More »

रावणाने पूर्ण केली शेवटची इच्छा, मरण्यापूर्वी खाल्ला गुटखा; पाहा भन्नाट Video

Viral Video Of Ravan : देशभरात दसरा (Dasara Video) मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. सोशल मीडियावर लोक दसऱ्याच्या संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करून दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. कोण रामाचा अवतार घेतं, तर कोण रावणाचा (Ravan)… मात्र, सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने (Viral Video) धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू …

Read More »

‘मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणं ही चांगली बाब तरी माघार नाहीच’ मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या  शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेत, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलेली डेडलाईन 24 ऑक्टोबरला संपली असून 25 ऑक्टोबरपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अशात …

Read More »

जीव वाचवणारे डॉक्टरच जीवावर उठले, रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण… Video व्हायरल

Viral Video : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करतात. पण जीव वाचवणारे हेच डॉक्टर रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या जीवावर उठल्याची एक घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमधल्या (Medical College) ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली. मारहाणीच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर …

Read More »

‘डेडलाईन संपायला उरले काही तास, उद्यापासून सरकारला जेरीस आणायचं’ मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Reservation : अहमदनगरच्या चौंडीत दसऱ्यानिमित्तानं धनगर समाजानं एसटी आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी मेळावा आयोजिक केला. या मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी हजेरी लावत धनगरांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला. जरांगेंचं काठी आणि घोंगडं देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत सेनेच्यावतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला  यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलतडे, आमदार राम शिंदे आणि …

Read More »

तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मी मैदानात असेन- पंकजा मुंडें

Pankaja Munde Bhagwan Gad Speech: कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयांचे चेक तुम्ही गोळा केले. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरचे आम्ही उन्हात आहोत. ज्याला पदे दिलीत ते दूर जाऊ शकतील पण ही जनता माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. दसरा मेळाव्यानिमित्त भाषणावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांचे कार्यक्रमस्थळी जंगी स्वागत करण्यात आले. …

Read More »

नारायण राणेंसह भाजपाला धक्का! निलेश राणेंनी तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics BJP Leader Nilesh Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन निलेश राणेंनी ही घोषणा केली आहे. निलेश राणेंच्या समर्थकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी असल्याची चर्चा कोकणच्या राजकारणामध्ये सुरु आहे. निलेश राणेंनी अचानक तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. कायमचा बाजूला …

Read More »

मांत्रिकाने घेतला महिलेचा जीव; भूतबाधा झाल्याचे म्हणत मानेवर उभा राहिला, मृत्यूनंतरही…

Crime News In Marathi: अंधश्रद्धेचे भूत एकदा चढलं की ते उतरवणे खूप कठिण असते. भारतात आजही खेड्यापाड्यात अनेक अंधश्रद्धा मानल्या जातात. 21व्या शतकात अजूनही काही आजार झाल्यास डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जातात. मात्र कधी कधी त्यांच्या उपचारांमुळं जीव जाण्याची वेळ येते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील एका महिलेसोबत घडला आहे. मांत्रिकाकडे उपचारांसाठी नेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, मांत्रिक मात्र …

Read More »