Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

Pune News Water Closure : पुणे शहरातील पाणी पुरवठा (Pune water supply) गुरुवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. तर शुक्रवारी उशिरा आणि कमीदाबाने पुरवठा केला जाईल, अशी माहिती पुणे महानगरपालिकेने (PMC) दिली आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा (Water supply Closure) बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली. त्यामुळे आता पुणेकरांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. 

कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद ?

पुणे शहरातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी,डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

यंदाच्या वर्षी सर्वसाधारण पाऊस होण्याचा तसेच पावसाळ्यात एल निनो सक्रिय असण्याच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. पुणे शहराला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेला दररोज 1470 दशलक्ष घनमीटर (MLD) पाणी लागते. मात्र, पुण्यापुढील गावांसाठी सोडले जाणारे पाणी, कडक उन्हामुळे होणारे बाष्पीभवन विचारात घेता पाण्याचं व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे.

दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरण आता 96 टक्के भरले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. धरण साखळी क्षेत्रात झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे.

हेही वाचा :  महिलांसाठी वसतिगृहांची उभारणी करा; पुण्यातील युवतींना मारहाण प्रकरणामुळे भारतीय महिला फेडरेशनची मागणी

पुणे शहरातील इतर बातम्या

> पुण्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण करून फायरिंग केल्याचा  धक्कादायक प्रकार घडलाय.  ऑनलाईन ऑर्डर यायला उशीर झाल्याने डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात वाद झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी डिलिव्हरी बॉय आणि त्याचे मित्र गेले असता  आरोपीने मारहाण करत हवेत फायरिंग केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

> पुण्याच्या हिंगणे चौकात भरधाव कारनं चौघांना उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय. अपघातात तीन महिलांसह एका लहान मुलगा गंभीर जखमी झालाय. रिक्षाची वाट पाहत असलेल्या महिलांना भरधाव कारनं जोरात धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाल्या असून, भीषण अपघात सीसीटीव्हीत चित्रित झालाय. जखमी झालेल्या महिला बस स्टँडवर रिक्षाची वाट पाहत होत्या. त्यावेळी गाडी त्यांच्या दिशेनं भरधाव वेगानं आली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात आलेल्या कारने महिलांना उडवलं. ही धडक इतकी जोरात होती की महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर गाडीच्या पुढच्या भागात रस्त्याच्या शेजारी उभी असलेली दुचाकी अडकल्याने गाडी जागीच थांबली…नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.आता पोलीस या अपघाताचा तपास करतायत.

> पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना आज ओला, उबर, स्विगी सेवा बंदचा फटका बसण्याची शक्यताय… कारण, ओला उबरसह स्विगी, झोमॅटोच्या कर्मचा-यांनी बंद पुकारलाय. या कंपन्यांच्या विरोधात मोबाईल अॅपवर काम करणारे कॅब चालक, रिक्षाचालक तसेच डिलिव्हरी बॉईजनी बंदची हाक दिलीय. मोबाईल अॅपच्या द्वारे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून चालकांची लूट सुरू असून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप चालक संघटनांनी केलाय.

हेही वाचा :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …