ताज्या

Astrology: कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय जाणून घ्या

काही जणांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो. मंगळ दोषामुळे विशेषतः लग्नकार्यात अडथळे येतात, असे मानले जाते. जर पती-पत्नीपैकी कुणाला मंगळ दोष असेल तर दुसऱ्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हा दोष लग्नापूर्वी सुधारला जाऊ शकतो, याासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देण्यात आले आहेत. ज्योतिषीय गणनेनुसार मंगळ कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या चौथ्या, सातव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात असेल तर मंगळ खूप प्रभावी असतो. यामुळे …

Read More »

‘ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे’, मराठी चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बरेच चर्चेत आहेत. मराठी चित्रपट सृष्टी आणि राज ठाकरे यांचं तसं फार जुनं नातं आहे. पण आता त्यांनी मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिलाय. राज ठाकरे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडिओमधील राज ठाकरे यांच्या दमदार आवाजानं सर्वांची मनं जिंकली …

Read More »

अपघाती दावा निकाली काढण्यासाठी नवीन नियम, आता वाहन विम्यासाठी द्यावी लागणार ‘ही’ माहिती

देशात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो.खराब रस्ते आणि वाहतुकीचे नियम न पाळल्याने अपघात घडतात. काही अपघात इतके भीषण असतात की कायमचं अपंगत्व येतं. यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी पावलं उचलताना दिसत आहे. चारचाकी वाहनांमध्ये थ्री पॉइंट बेल्ट आणि सहा एअरबॅग्सचा प्रस्ताव पुढे केल्यानंतर दुचाकीसाठी नवे नियम तयार केले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवी नियमावली आखली आहे. आता रस्ते व …

Read More »

१०० व्या कसोटी सामन्यापूर्वी मिळालेल्या सन्मानावेळी विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना, “माझ्यासाठी हा खास क्षण”

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीची कारकीर्द आजवर अनेक चढउतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर चांगली …

Read More »

Petrol- Diesel Price Today: रशिया-युक्रेन संघर्षाचा परिणाम, इंधनाचे वाढले दर; जाणून घ्या आजचा भाव

रशिया-युक्रेनमधील संघर्षाचा पेट्रोल डिझेलच्या किमतीवर परिणाम जाणवत आहे. जाणून घ्या आजचा भाव Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा …

Read More »

Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील युद्धाचा परिणाम! सोने-चांदी महागले; जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,२९० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६८,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

Ukraine War: “मला अजिबात कल्पना नव्हती की…”; आनंद महिंद्रा लवकरच करणार मोठी घोषणा?

युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तेथे अडकून पडलेत, यापैकी अनेकजण हे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. सध्या युक्रेनमध्ये सुरु असणाऱ्या युद्धामुळे भारतामधील वैद्यकीय शिक्षण हा सुद्धा एक महत्वाचा चर्चेचा विषय ठरत आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या परदेशी मुलांच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये …

Read More »

विश्लेषण : करोनापश्चात सहव्याधी! का सतावतेय पालक, शिक्षकांना मुलांतील वर्तनबदलांची चिंता?

– भक्ती बिसुरे करोना काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या माणसांसह लहान मुले घरात कोंडली गेली. शाळेसह बाहेरच्या जगाशी तुटलेला संपर्क, पालक कामात असल्याने पुरेसा वेळ न देऊ शकणे अशा अनेक कारणांनी मुले एकलकोंडी आणि चिडचिडी झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. मुलांमधील हे वर्तनबदल कसे हाताळावेत ही चिंता शिक्षक आणि पालकांमध्ये सध्या आहे. मुलांमध्ये वर्तन …

Read More »

विश्लेषण : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका अपरिहार्यच? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काय होणार?

– उमाकांत देशपांडे स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रनिहाय ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाबाबतचा शास्त्रीय सांख्यिकी तपशील (इंपिरिकल डाटा) गोळा करून आरक्षणाचे प्रमाण निश्चित केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत निश्चित केलेले त्रिस्तरीय निकष (ट्रिपल टेस्ट) पाळावेच लागतील, असे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याविषयी… ओबीसी आरक्षणाचा नेमका तिढा …

Read More »

maharashtra budget session 2022 : सरकार-राज्यपाल संघर्षांचा नवा अंक ; दोन मिनिटांत अभिभाषण आटोपले

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्षांचा नवा अंक गुरुवारी पाहायला मिळाला़  विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणांच्या गोंधळात राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत विधिमंडळातील अभिभाषण आटोपले आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच ते सभागृहातून तडक निघून गेले. राज्यपालांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यातच राज्यपालांनी सहकार कायद्यात बदल करणारे विधेयक परत पाठवल्याने हा …

Read More »

Maharashtra Budget Session 2022 : सहकार कायद्यातील बदलाचे विधेयक राज्यपालांकडून परत

मुंबई : सहकार कायद्यात बदल करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या विधेयकातील संस्थांना अभय देण्याच्या विशेषाधिकाराच्या तरतुदीला आक्षेप घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे विधेयक फेरविचारार्थ परत पाठवल़े  त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आह़े केंद्र सरकारने केलेल्या ९७ व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकारने २०१३ मध्ये सहकार कायद्याच्या विविध कलमांत सुधारणा केल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी या घटनादुरुस्तीतील काही …

Read More »

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक अधांतरी?

मुंबई : सरकारबरोबरील पत्रप्रपंच, विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, विधेयके फेरविचारार्थ परत पाठविणे यापाठोपाठ अभिभाषण अर्धवट करणे यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायमच महाविकास आघाडी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली आहे. या साऱ्याचा परिपाक म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे भवितव्य आता अंधकारमय झाले आहे. सरकारी विमानातून खाली उतरविण्यात आल्याने राज्यपाल कोश्यारी यांचा जळफाट झाला होता. अभिभाषण अर्धवट सोडून त्यांनी पुन्हा एकदा …

Read More »

ठाणे आणि नवी मुंबई शहर निर्बंधमुक्त

ठाणे : राज्यात करोना निर्बंध शिथिलीकरणासाठी राज्य शासनाच्या निकषांनुसार महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक ग्राह्य धरले आहे. जिल्ह्यातील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लशींचे प्रमाण हे राज्य सरकारच्या निकषांमध्ये बसत असल्याने येथील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय गुरुवारी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे ठाणे आणु नवी मुंबई महापालिका क्षेत्र निर्बंधमुक्त झाले आहे. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव घटल्याने बुधवारी राज्य …

Read More »

लतास्वरांना अविस्मरणीय आदरांजली ; ‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमांतर्गत संगीतसंध्येला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ज्या स्वरांनी कित्येक पिढय़ांत संगीताचा कान तयार केला, त्या गानप्रतिभेला तिच्या सर्वोत्तम गीतांचा नजराणा बहाल करत आदरांजली वाहणारी एक अपूर्व संध्या रसिकांना गुरुवारी अनुभवायला मिळाली. ‘लोकसत्ता’ अभिजात उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘लता:एक आठवण’ या मैफलीमध्ये आजच्या पिढीतील गानतपस्वींनी लता मंगेशकर यांच्या हिंदी, मराठी आणि रागदारीवरील गीतांचा आविष्कार घडविला. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांची उस्फूर्त दाद मिळाली. लतादीदींच्या …

Read More »

Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थी भयग्रस्त ; मायभूमीत येण्यासाठी व्याकूळ

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला तरी हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशी लवकरात लवकर परतण्याचे वेध लागले असून अद्यापही त्यांचा भारतीय दूतावसाशी संपर्क होऊ शकत नाही. येथील सुमी शहरातील सुमी विद्यापीठातील काही विद्यार्थानी द इंडियन एक्सप्रेसह्णशी संवाद साधून आपली व्यथा व्यक्त केली. मूळ थ्रिसूरचा (केरळ) येथील विद्यार्थिनी निरंजना संतोषने सांगितले, की कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यानी तिला …

Read More »

Russia Ukraine War : एकही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये ओलीस नाही ; रशियाच्या दाव्याचे भारताकडून खंडन

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये कोणताही भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवला नसल्याचा निर्वाळा भारताकडून देण्यात आला आहे. रशियाने याबाबत केलेल्या दाव्यानुसार खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याकडून ओलीस ठेवण्यात असून, त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांना रशियन भूमीत जाऊ देण्यास मज्जाव करण्या येत असल्याचा दावा रशियातर्फे करण्यात आला. त्याचे स्पष्ट शब्दांत भारताने खंडन केले आहे. येथे …

Read More »

राज्यात तिसरी लाट ओसरली ; रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही मोठी घट

मुंबई : राज्यात करोनाची तिसरी लाट ओसरत आली असून दैनंदिन रुग्णसंख्येसह मृत्यूच्या प्रमाणातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. राज्यात सहा हजार रुग्ण उपचाराधीन असून दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास एक टक्क्यापर्यंत कमी झाले आहे.करोनाची तिसरी लाट जानेवारीमध्ये राज्यात वेगाने पसरत होती, त्यावेळी सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या ३३ हजार ५०० होती. फेब्रुवारीमध्ये यात मोठय़ा प्रमाणात घट होऊन ती पाच हजारापर्यत कमी झाली. फेब्रुवारीच्या …

Read More »

युक्रेनच्या वैद्यकीय अभ्यासक्रमांचा भूलभुलैया ; २० ते ३० टक्केच विद्यार्थी भारतात काम करण्यास पात्र

युक्रेन, रशिया युद्धस्थितीत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे देशातील वैद्यकीय शिक्षणाची परिस्थिती, युक्रेनचे स्थान अशा मुद्दय़ांचा ऊहापोह सुरू झाला आहे. भारतातून युक्रेनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणारे आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात काम करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या डॉक्टरांचे प्रमाण हे जेमतेम वीस ते तीस टक्के असल्याचे दिसते आहे. तेथील काही विद्यापीठांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी …

Read More »

माहुलवासियांचे कुल्र्यात पुनर्वसन ; मुंबई महापालिकेला १६०० सदनिका देण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणामुळे हैराण झालेल्या माहुल येथील पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांचे आता कुर्ला येथील प्रीमियर मिलच्या जागेवरील एचडीआयएलच्या गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या ताब्यातील १६०० घरे मुंबई महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने गुरुवारी दिले. त्यामुळे माहुलमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील जलवाहिन्यांच्या सुरक्षिततेसाठी तेथील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. या प्रकल्पग्रस्तांचे माहुल …

Read More »

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण पुनस्र्थपित करण्यासाठी सादर करण्यात आलेला राज्य मागासवर्ग आयोगाच अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे राजकीय कोंडीत सापडलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत, असा पुन्हा सूर लावला आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्ग लागेपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी राज्य निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »