ताज्या

मुलीचा मृत्यू झाला तरी पत्ता नाही; मृतदेहासोबतच आईने काढले तीन दिवस, अखेर…

Crime News Today:  84 वर्षीय वृद्ध महिला तब्बल तीन दिवस मुलीच्या मृतदेहासोबत राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नईतील मनाली न्यू टाउनमध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. (Depressed woman lives with dead daughter)  आई 55 वर्षीय मुलीच्या मृतदेहासोबत राहत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर …

Read More »

‘शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,’ राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले ‘उद्या जर त्यांनी गौतम अदानींना…’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींचा उल्लेख करत केंद्र सरकारला घेरलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी कोळशाच्या किंमतीसंबंधी ‘फायनान्शिअल टाइम्स’मध्ये आलेल्या वृत्ताचा उल्लेख करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला की, कोळशाच्या चुकीच्या किंमती दाखवत आणि बिलात हेराफेरी करत गौतम अदानी यांनी वीजेचे दर वाढवले आहेत. जनतेच्या खिशातून …

Read More »

ऑक्टोबर हिटमध्ये ग्राहकांच्या खिशाला चटका; महाराष्ट्रात वीजबील इतक्या पैशांनी वाढणार

Maharashtra Electricity Price Hike: ऑक्टोबर हिटचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांच्या प्रतियुनिट विजेच्या दरात 15 ते 35 पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळं या महिन्यात येणारे वीज बिल वाढणार असल्याची शक्यता आहे. ऑक्टोबर हिटमध्ये उकाडा वाढू लागला आहे. वाढलेल्या तापमानामुळं अंगाची काहिली होत असताना नागरिकांकडून विजेचा वापर वाढला आहे. संपूर्ण दिवस घरातील …

Read More »

‘मी पळालो नाही, पुणे पोलिसांनी पळवलं’ ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा धक्कादायक दावा

Drugs Mafia Lalit Patil :  ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil)अखेर बंगळुरुतून अटक करण्यात आलीये.  मुंबई पोलीस (Mumbai Police) त्याला मुंबईत घेऊन आले. वैद्यकीय तपासणीनतंर त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं असून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. 2 ऑक्टोबर 2023ला ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून (Sasoon Hospital) पळून गेला होता. तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता. याचप्रकरणात पुणे …

Read More »

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Mumbai Local Train Update: मुंबई व मुंबईलगतच्या नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई लोकलचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील पाच स्थानकांच्या कामाला वेग आला आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार आहे. त्यामुळं उरणकरांना आता …

Read More »

खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्…

Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील किस्से तर जगजाहिर आहेत. लोकलमधील महिलांची हाणामारी असो किंवा लोकलमध्ये साजरे करण्यात येणारे सण असो. संपूर्ण देशभरात मुंबई लोकलची चर्चा असते. मात्र, मुंबईनजीकच्या ठाण्यात लोकलमध्येच एक भयंकर प्रकार घडला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.  12 ऑक्टोबर रोजी …

Read More »

ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील  याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर …

Read More »

सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं? ओबीसींना धक्का न लावता आरक्षण अशक्यच?

Maratha OBC Reservation : जरांगे पाटलांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त ७ दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, कायदेतज्ज्ञांचं काय मत आहे जाणून घेवूया.  ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं राज्य सरकार वारंवार सांगतंय. त्यात मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला …

Read More »

ओला कॅबच्या ड्रायव्हरने तरुणीसह… कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Crime News : महिलांनो, खासगी कॅबमधून प्रवास करत असाल तर सावधान! कल्याणमध्ये कॅबमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग झाला आहे. रात्री ऑफिसमधून परतताना तिच्यासह हा प्रकार घडला. कॅबचालकाला अटक करण्यात आली आहे. कल्याण परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  ओला कॅब चालकानं एका तरुणीचा विनयभंग केला. ही तरुणी नवी मुंबईमधल्या ऑफिसमधून …

Read More »

असा बाप पाहिजे! सासरी होत होता मुलीचा छळ; वडील बँड बाजा वाजवत पोहोचले अन्….; गावात एकच चर्चा

आपल्याकडे मुलीला लग्न झाल्यानंतर सासर हेच तुझं आता घर असून, तिकडे कोणालाच न दुखवता संसार करण्यास सांगितलं जातं. अनेकदा तर सासरहून आता फक्त मृतदेह बाहेर पडेल अशीही शिकवण दिली जाते. यामुळेच अनेकदा मुली सासरी छळ होत असतानाही आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांकडे तक्रार करत नाहीत. पण झारखंडच्या रांची येथील एका पित्याने या जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना छेद दिला असून, थेट वरात …

Read More »

IT ने पाठवली नोटीस, काय झालं पाहण्यासाठी मजुराने बँक बॅलेन्स चेक केला तर झोपच उडाली, खात्यात अब्जो रुपये….

उत्तर प्रदेशात एक मजूर रातोरात करोडपती नव्हे तर अब्जाधीश झाला आहे. त्याच्या खात्यात तब्बल 2 अब्ज 21 कोटींहून अधिक रुपये जमा झाले आहेत. बँक खात्यात जमा झालेला रकमेचा आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण आता अब्जाधीश होणं त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. मजुराला थेट प्राप्तिकर विभागाने नोटीस पाठवली आहे.  लालगंज ठाणे क्षेत्राच्या बरतनिया गावातील हे प्रकरण आहे. येथे …

Read More »

UGC कडून विद्यार्थ्यांना मोठी भेट; JRF, SRF सह अनेक शिष्यवृत्तींच्या रकमेत भरभरून वाढ

UGC Fellowships 2023: विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) विविध फेलोशिप योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या रकमेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयोगाने फेलोशिपमध्ये मिळणाऱ्या रकमेत बदल करुन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढवली आहे. 20 सप्टेंबर रोजी आयोगाच्या 572व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने फेलोशिप योजना रिवाइज करण्याचा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. बदलण्यात आलेली फेलोशिप स्टायपेंड 1 जानेवारी 2023पासून लागू होणार आहे. यासंदर्भात आयोगाने एक …

Read More »

Indore Zomato Girl : सुपर बाइक, वेस्टर्न लुक..! ‘या’ डिलिव्हरी गर्लला पाहून लोकांच्या नजरा खिळल्या, Video Viral

Indore Zomato Girl Video : तुम्ही ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचा खूप वापर करत असाल. पण तुमच्या दारावर कधी बोल्ड आणि वेस्टर्न लुकची ही तरुणी डिलिव्हरी करण्यासाठी आली आहे. अहो सध्या झोमॅटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सुपर बाइक, वेस्टर्न लुकमधील ही डिलिव्हर गर्लचा इंदूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिला बघून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित होतोय. (zomato …

Read More »

ED, CBI कडून जप्त होणाऱ्या करोडो रुपयांचं नेमकं काय होतं? अशी आहे प्रक्रिया…

Explained ED And CBI: सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि आयकर विभाग (IT) कडून करण्यात आलेल्या छापेमारीबाबत अनेक बातम्या तुम्ही वाचल्या आहेत. वृत्तपत्र किंवा टिव्हीवर अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांनी हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याच्या बातम्या व फोटो तुम्ही पाहिले असतीलच. पण  या संस्थांकडून करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली रक्कम व …

Read More »

चौकशी करा किंवा काही करा, मला काही फरक पडत नाही; मीरा बोरवणकर यांच्या गंभीर आरोपांना अजित पवार यांचे उत्तर

Ajit Pawar On Meera Borwankar : आर आर पाटलांचा विरोध असतानाही अजित पवारांनी पोलिसांची जमीन बिल्डरांना द्यायला सांगितली अस गंभीर आरोप मीरा बोरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. आर आर पाटलांविषयी दादांनी वाईट शब्द वापरल्याचा दावा देखील मीरा बोरवणकर यांनी केला आहे. चौकशी करा किंवा काही करा, मला काही फरक पडत नाही असं म्हणत अजित पवार यांनी …

Read More »

समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, पण समलैंगिक जोडप्यांना दिले ‘हे’ अधिकार

Same Sex Marriage : सुप्रीम कोर्टाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र आणि पोलिसांना काही निर्देश दिले आहेत, ज्याममुळे समलैंगिक जोडप्यांबाबत (Same Sex Couple) होणारा भेदभाव संपणार आहे. येत्या काळात त्यांना समलैंगिक जोडप्याला काही महत्त्वाचे अधिकार मिळण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि …

Read More »

‘अमित शाह यांचा मुलगा काय…,’ घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी …

Read More »

ऑनलाइन गेमच्या नादात लाखोंचे कर्ज, हफ्ते फेडण्यासाठी मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्याचे भयंकर कृत्य

Mumbai News Today: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिस स्थानकाच्या परिसरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 48 तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपीचे नाव ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमिन हादरली आहे. हल्लेखोर हा मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. काय घडलं नेमकं जाणून घेऊया. (Mumbai Police News) मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी …

Read More »

Same Sex Marriage: प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार – सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र …

Read More »

TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

TCS Recruitment: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसमध्ये काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण टाटा कम्युनिकेशन सेंटरने यंदा बंपर नोकरभरतीची घोषणा केली आहे. टीसीएस चालू आर्थिक वर्षात 40 हजार फ्रेशर्स नियुक्त करण्याची तयारी करत असल्याची माहिती  TCS सीओओ, एन गणपति सुब्रमण्यम यांनी दिली.  आयटी क्षेत्रातील इतर आघाडीच्या कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटच्या बाबतीत काळजी घेत आहेत. …

Read More »