ताज्या

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा; आणखी कोण आहे राजीनामा देण्याच्या तयारीत?

Maratha Reservation :  शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी राजीनामा दिला आहे.  मराठा आरक्षण मुद्द्यावर हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे.  गावागावत आंदोलन आणि उपोषण होत असताना आता मराठा आंदोलनासाठी राजीनामा सत्र सुरु होण्याची चिन्ह दिसत आहेत.  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीचा खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारे ते पहिलेच खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं …

Read More »

फॉलोअर्स वाढवण्यासाठी रस्त्यावर रिव्हर्समध्ये पळवली कार; पण स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं

रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होणाऱ्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं आणि फॉलोअर्स वाढावेत यासाठी चक्क वर्दळीच्या रस्त्यावर रिव्हर्स गेअरमध्ये कार पळवली. आपल्या या जीवघेण्या स्टंटसहित त्यांनी फक्त स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घातला होता. पण प्रसिद्ध होण्याची ही हाव त्यांना चांगलीच महागात पडली असून, आयुष्यभराची अद्दल घडली आहे.  गुरुग्राममधील …

Read More »

केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला …

Read More »

ठाण्यात खळबळ! नराधम वडिलांचा लेकीवर बलात्कार, गुन्हा दाखल होताच घेतला टोकाचा निर्णय

Minor Girl Rape Case In Thane: ठाण्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या आईला हा प्रकार समजताच तिने पोलिसात धाव घेत बापाविरोधात तक्रार दाखल केली मात्र, तक्रार दाखल झाल्याचे कळताच नारधमाने रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे,  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय …

Read More »

‘तू कोणतीही गाडी निवड…’; पायाने सुवर्णपदक जिंकणाऱ्या शीतल देवीसाठी आनंद महिद्रांचे खास गिफ्ट!

Para Asian Games: ज्येष्ठ भारतीय उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आजूबाजूला घडणाऱ्या व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींवर ते भाष्य करत असतात. आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेले व्हिडीओदेखील सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. आता त्यांनी भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या एका खेळाडूसाठी मोठं गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. आशियाई पॅरा …

Read More »

Bank Holiday List: नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या

Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या …

Read More »

पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्‍यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला …

Read More »

केरळमध्ये भीषण स्फोट, कन्वेंशन सेंटरमध्ये प्रार्थना सुरु असतानाच ब्लास्ट; 1 ठार, 20 जखमी

केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये मोठा स्फोट झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोट कसा आणि कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. …

Read More »

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात …

Read More »

‘तरुणांना हार्टअटॅक आल्यावर आश्चर्य वाटू देऊ नका’, नारायणमूर्तींच्या ’70 तास काम’ सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल

इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं मत त्यांनी एका मुलाखतीत मांडलं. यानंतर सर्वसामान्यांसह अनेक उद्योगपतींनी नारायणमूर्ती यांच्या मताशी असहमत असल्याचं सांगत टीका केली आहे. तर जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांच्यासारख्या काहींनी पाठिंबा दर्शवला आहे.  …

Read More »

दिवाळीत कांद्याचे भाव कमी होणार? सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Onion Price Hike: टॉमेटोचे दर आवाक्यात येत नाहीत तर आता कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. दिल्ली एनसीआरसह अनेक ठिकाणी कांद्याचे दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. एक आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर 15 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. येत्या काही दिवसांत कांदा 100 रुपये पार करण्याची शक्यता आहे.  काही महिन्यांपूर्वी टॉमेटोच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. काही ठिकाणी टॉमेटो 200 रुपयांपर्यंत पोहोचले …

Read More »

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपमधील आपला सहावा सामना इंग्लंडविरोधात खेळणार आहे. भारत-इंग्लंडमधील हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता हा सामना सुरु होणार आहे.  भारत आणि इंग्लंडमध्ये रोमहर्षक सामना होईल असा अंदाज आहे. इंग्लंड संघ गतवर्षीचा वर्ल्डकप विजेता आहे, तर भारताने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. पण सध्याच्या वर्ल्डकपमध्ये …

Read More »

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.90 टक्क्यांनी वाढून 90.48 डॉलर प्रति बॅरल पातळीवर व्यवहार करत आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २.८० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल $८५.५४ असा दर दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला …

Read More »

धारावी पुनर्वसन; गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने

Sharad Pawar Support Gautam Adani :  गौतम अदानींवरुन शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले आहेत. अदानींना धारावी गिळू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत. येत्या दोन तीन दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन त्यांच्या मनातली शंका समजून घेणार असल्याचं विधान शरद पवारांनी केले …

Read More »

HONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील

Optical illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी पहायला मिळतात.  यामध्ये व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी असतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल होता.  ज्यासाठी डोक्याचा देखील वापर करावा लागत आहे. असाचएक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द शोधायचा आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी …

Read More »

मराठा आरक्षणासाठी गावागावात जरांगे; उपोषणाचा वणवा पेटणार

Manoj Jarange On Maratha Reservation :  मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर आलीय, मनोज जरांगे-पाटलांनी उपोषण प्रखर केलंय. आतापर्यंत एकटे जरांगे पाटील उपोषण करत होते, आता मात्र गावोगावी आपल्याला जरांगे-पाटील दिसतील. कारण राज्यभरात गावोगावी मराठा समाज थेट आमरण उपोषणाला बसणार आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी नेत्यांना शांततेच्या मार्गानं गावबंदी करण्यात आली होती, काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी पुढा-यांना अक्षरश फैलावर घेतलं. आता मात्र …

Read More »

दिल्लीतील बुराडी कांडची पुनरावृत्ती? एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या, फक्त एकाचा गळफास अन्…

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सातजणांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सूरतच्या पालनपूर जकातनक रोडवरील घरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.  प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, 6 जणांनी विष पिऊन टोकाचं पाऊल उचललं आहे. तर एकाने गळफास लावून घेत जीवन संपवलं. मृतांची ओळख …

Read More »

भाजपाला मोठा धक्का! पुढील काही आठवड्यात हे राज्य ‘हात’चं जाणार

मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत आपण विजयी होऊ असा दावा करत आहेत. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. यादरम्यान मध्य प्रदेशातील ओपिनियन पोल समोर येत आहेत. ZEE मध्य प्रदेश/छत्तीसगडनेही एक ओपिनियन पोल केला आहे. ZEE NEWS-C FOR SURVEY च्या या सर्व्हेनुसार, 11 हजार 500 हून अधिक लोक या सर्व्हेत …

Read More »

गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये …

Read More »

भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या

Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या …

Read More »