ताज्या

‘बलात्कार, दरोडे, लूटमारी… सगळ्यात मुस्लिम 1 नंबर,’ AIUDF खासदार बदरुद्दीन अजमल असं का म्हणाले? स्वत: केला खुलासा

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (AIUDF) प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच्या एका विधानावरुन मोठा गदारोळ माजला आहे. “आपण (मुस्लीम) चोरी, दरोडे, लूटमारी…असा सर्व गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत. आपण जेलमध्ये जाण्यातही पहिल्या क्रमांकावर आहोत,” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. दरम्यान आपण नेमकं असं विधान का केलं? त्यामागील कारण काय याचा खुलासा बदरुद्दीन अजमल यांनी केला आहे.  ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना बदरुद्दीन अजमल …

Read More »

ऑक्टोबर सरला तरी थंडीची चाहूल नाहीच; 5 नोव्हेंबरपर्यंत उन्हाच्या झळा तीव्र

Maharashtra Weather Update: ऑक्टोबर महिना सरत आला तरी अद्याप थंडीची चाहूल लागली नाहीये. ऑक्टोबर हिटचा तडाखा अजूनही जाणवतो आहे. मुंबई तसेच कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा सातत्याने चढा आहेच. पुढचे काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहिलं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, पुढील पाच दिवस मुंबईकरांना उष्ण हवामानापासून दिलासा नाहीच, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  मुंबई प्रादेशिक हवामान …

Read More »

मराठा आरक्षणाचा राग लालपरीवर! मराठवाड्यात 85 बसेसची मोडतोड-जाळपोळ; 4 कोटींचे नुकसान

Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यावे या मागणीसाठी राज्य सरकारला 40 दिवस देण्यात आले. पण यानंतरही मागणी पूर्ण न झाल्याने मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. एसटी महामंडळाकडून गेल्या 4 दिवसात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली …

Read More »

‘कुत्र्याला लिफ्टमधून न्यायचं नाही’, महिला आणि IAS अधिकाऱ्याचा राडा; शाब्दिक चकमकीनंतर तुफान हाणमारी

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.  पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर …

Read More »

सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी…; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

सागर आव्हाड, झी मीडिया Pune Crime News: अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह पुण्यातील वाघोली येथील एका लॉजवर आढळले आहेत. या प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे) आणि सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर) असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे. (Pune Couple Suicide) प्रेमी युगलांच्या आत्महत्येचे कारण …

Read More »

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. पहिल्यांदा शेतीला कुणबी म्हणायचे. आता शेती सुधारित शब्द आलाय. या शब्दाला मराठे कमी लेखणार नाहीत. आम्ही कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार आहोत. यासाठी अभ्यासकांसोबत चर्चा करु असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.  कोणी आत्महत्या करु नका. मी देखील …

Read More »

किराणा दुकानातील बिस्किटं-कुरकुरे चोरल्याने 4 चिमुकल्यांना बेदम मारहाण करुन झाडाला बंधून ठेवलं

बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील गर्दीचा अमानवीय चेहरा जगासमोर आला आहे. येथे किराणा मालाच्या दुकानातील बिस्किट आणि कुरकुरे चोरल्यामुळे 4 लहान चिमुकल्यांना जमावाने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे फक्त मारहाणच केली नाही तर त्यांना झाडाला तासन् तास बांधून ठेवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  या घटनेच्या व्हिडीओत संपूर्ण क्रूर कृत्य कैद झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातील …

Read More »

‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांतून जन्मलेल्या…’; मराठा आरक्षणासाठी मिटकरींचं शिंदेंना पत्र! केली ‘ही’ मागणी

Maratha Aarakshan Ajit Pawar Group Letter To CM Shinde: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे-पाटलांच्या उपोषणाचा आज म्हणजेच मंगळवारी सातवा दिवस आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनांदरम्यान हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर बीड आणि धाराशिवमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री …

Read More »

मनोज जरांगे-पाटलांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती! म्हणाल्या, ‘त्यांनी आपल्या…’

Maratha Aarakshan Supriya Sule Comment: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला सोमवारी गालबोट लागलं. राज्यातील अनेक भागांमधून हिंसाचाराच्या घटनांच्या बातम्या समोर आल्या. बीडमध्ये 2 आमदारांची घर आंदोलकांनी जाळली. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा बीड आणि धाराशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. हिंसांचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना अर्ल्ट देण्यात आला …

Read More »

‘खरंतर बोलू नये पण परिस्थिती अशी आहे म्हणून…’; उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरची पोस्ट

Manoj Jarange Patil Hunger Protest Health: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी सायंकाळी उपस्थितांबरोबर संवाद साधण्यासाठी मनोज जरांगे-पाटील स्टेजवर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतानाच अशक्तपणामुळे ते कोसळले. त्यानंतर उपस्थितांच्या आग्रहानंतर त्यांनी थोडं पाणी प्यायलं. आज म्हणजेच मंगळवारी (31 ऑक्टोबर 2023 रोजी) मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगेंच्या शरीरावर या …

Read More »

देशातील लाखो आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे.  …

Read More »

Maharastra Politics : ‘हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचा हात, मला शंका होतीच…’, मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप!

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. अशातच सरकारने जरांगे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता. अशातच मनोज जरांगेंनी सरकारचा प्रस्ताव फेटाळलाय. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, फक्त त्यांनाच नव्हे तर सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं, अशीच जरांगेंची मागणी आहे. मात्र, …

Read More »

घर खरेदीची शेवटची संधी; म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mhada Pune Lottery 2023 : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीला अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून आजवर सुमारे ७३,८४८ अर्जदारांनी अर्ज केले असून त्यापैकी ५१,००० अर्जदारांनी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. विहित मुदतीत अर्ज केलेल्या अर्जदारांना दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ …

Read More »

Video : निवडणूक प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला; पोटात खुपसला चाकू, प्रकृती चिंताजनक!

Telangana MP Stabbed Video : नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) पार पडणार आहेत. त्यामुळे आता देशभरात निवडणुकीचं वातावरण तयार झाल्याचं पहायला मिळतंय. तेलंगाणामध्ये (Telangana Elections) सर्वच पक्ष जोरदार तयारीत लागले आहेत. काँग्रेसने नुकतीच आपली दुसरी यादी जाहीर केली होती. अशातच आता तेलंगाणामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) खासदार कोथा प्रभाकर रेड्डी (MP …

Read More »

UAE जाण्याचा विचार विचार करताय? विमानातून ‘या’ वस्तू नेण्यास बंदी

India to UAE: भारतातील बहुतांश लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. तर, काही जण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले आहेत. अशावेळी सुट्टीत भारतात आल्यानंतर घरातून निरनिराळे पदार्थ नेले जातात. तर, कुटुंबातील लोकही प्रेमाने पदार्थ पाठवून देतात. परदेशात आपल्या घरची चव मिळणे कठिण असते तसंच, आपल्या जेवणाचा स्वाद मिळत नाही. अशात तर तुम्ही युएईमध्ये राहाताय तर तुम्हाला या काही गोष्टी विमानातून घेऊन जाता …

Read More »

‘अशा आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता काही…’; मराठी अभिनेत्याचा जरांगे-पाटलांना पाठिंबा

Marathi Actor Joins Maratha Protest Praises Manjo Jarange Patil: राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे-पाटील मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आणरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील आज स्टेजवरच कोसळले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज पाणी प्यायलं. एकीकडे हा लढा सुरु असतानाच एक मराठी अभिनेता या आंदोलनातील साखळी …

Read More »

नागपुरकरांसाठी गुड न्यूज! शहरात ‘या’ 5 ठिकाणी होणार नवे उड्डाणपूल, नितीन गडकरींची मंजुरी

Nagpur five flyovers: नागपुरकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नागपुरकरांचा नेहमीचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण नागपूरमध्ये आणखी पाच नवे उड्डाणपूल येणार आहेत. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने 792 कोटी रुपये मंजूर केले आहेत. 5 नव्या उड्डाणपूलांमुळे पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरची वाहतूक कोंडी फूटणार आहे. येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा होती. …

Read More »

मनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली…’या’ मागण्यांसाठी लढा सुरूच

Manoj Jarange Patril Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यानी सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चाललीय. त्यांना बोलतानाही त्रास होतोय. आज सकाळपासून त्यांची हालचालही मंदावलीय, उठायला आणि बसायलाही त्यांना होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून जरांगे झोपूनच आहेत. बोलायला उभं राहाताना ते कोसळले. प्रकृती खालावत असली तरीही जरांगे आमरण …

Read More »

114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच

Post Office Time Deposit: आपल्या कमाईचा काही हिस्सा गुंतवणुकीसाठी काढून ठेवतो. बँकांमध्ये एफडी असो किंवा सोन्यातील गुंतवणूक विविध माध्यमातून सामान्य नागरिक पुढील भविष्यासाठी गुंतवणुक करु शकतो. अलीकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी देखील अजूनही सरकारी संस्थांमध्ये जास्त विश्वास ठेवला जातो. पोस्ट ऑफिसही नागरिकांसाठी गुंतवणुकीच्या विविध योजना घेऊन आल्या आहेत. यात नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे. पोस्ट ऑफिसची …

Read More »

नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांसाठी बंद असेल शेअर मार्केट; तर दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगची ही असेल वेळ!

Stock Market Holiday 2023: नोव्हेंबर महिन्यात अनेक सण-समारंभ आहेत. तसंच, दिवाळी देखील नोव्हेंबरमध्येच आहे. त्यामुळं बँक आणि शाळांना या महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमध्येही या महिन्यात सुट्ट्या आहेत. नोव्हेंबरमध्ये शेअर मार्केट 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईच्या शेड्युलनुसार या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सण, शनिवार आणि रविवार यांचादेखील समावेश आहे. या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला ट्रे़डिंग करता येणार नाही. …

Read More »