ताज्या

Covid-19: केरळनंतर या दोन राज्यात JN.1 व्हेरिएंटची एन्ट्री, नव्या वर्षात फिरायला जाण्याआधी सावधान

Covid-19 JN.1 Variant : जगासह देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. हिंवाळा सुरु होताच पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) धोकाही वाढू लागला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 वेगात पसरतोय. देशात 8 डिसेंबरला नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला होता. अवघ्या बारा दिवसात ही संख्या 2000 वर पोहोचली आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत सर्व राज्य सरकारने सतर्कतेचा (Alert) इशारा …

Read More »

संघाच्या अनिवार्य असलेल्या कार्यक्रमाकडे अजित पवारांची पाठ; मुख्यमंत्र्यांनी जाऊन घेतलं स्मृतीस्थळाचे दर्शन

Maharashtra Politics : भाजपाने सोमवारी आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्यांच्या आमदारांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूरच्या रेशमबागेत निमंत्रित केले होते. यासाठी आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटातील आमदारांना पत्राद्वारे आमंत्रित केले होते. सर्व मंत्री, आमदार आणि आमदारांची …

Read More »

‘नव्या संसदेतील शौचालयं इतकी घाणेरडी आहेत की…’ जया बच्चन थेटच बोलल्या

Jaya bachchan : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरु आहे. विरोधकांनी जिथं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली, तिथंच इतरही काही मुद्द्यांवर प्रचंड चर्चा झाली. यातलाच एक मुद्दा होता, शौचालयासंदर्भातला. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी मंगळवारी संसदेत शौचालयांचा मुद्दा उपस्थित करत परिस्थिती नेमकी किती विदारक आहे हीच बाब प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या साऱ्यात मागील दोन दिवसांमध्ये …

Read More »

62 वर्षीय महिला फळं विकत असताना तो आला अन् त्याने… VIDEO पाहून म्हणा ‘दिन बन गया’

Viral Video :  सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यातील काहीच व्हिडीओ असे असतात ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्यक्तीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आपल्या आजूबाजूला अशी असंख्य लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. अशातच त्या व्यक्तीचं मानवतेच्या दिशेने केले कृत्य पाहून दिल बल्ले बल्ले होईल. …

Read More »

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal Crime) एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये एका जावायाने कुटुंबातील चौघांची हत्या केली आहे. सासरा, दोन मेव्हणे आणि पत्नीची जावयाने निर्घृणपणे हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी जावयाला अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन हा हत्याकांडाचा थरार घडल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस (Yavatmal Police) …

Read More »

‘महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्…’; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

Maratha Reservation : राज्यातला मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. एकीकडे, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली आहे. अशातच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षणावर लवकर तोडगा काढला जावा अशी …

Read More »

‘देशात फक्त ‘अंधभक्त’ आणि संसदेत फक्त…’; ‘सरकार घाबरलं’ म्हणत ठाकरे गटाचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

141 MP Suspended: विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करणाऱ्या सत्ताऱ्यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच होणार आहे, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. जगात देशाची नाचक्की झाली. त्याची जबाबदारी म्हणून सरकारतर्फे काय पावले उचलली जाणार आहेत? असा प्रश्न संसदेतील घुसखोरीबद्दल विचारला तर काय चुकलं …

Read More »

थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाची शक्कल; मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत बांधणार म्हाडाची घरं

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : एमएसआरडीसीकडील थकित कर्जवसुलीसाठी म्हाडाने शक्कल लढवली आहे. एमएसआरडीसीच्या अंतर्गत येणाऱ्या  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगतच्याजमीनीवर म्हाडा घर बांधणार आहे. यामुळे येत्या काही वर्षात  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाच्या वसाहती दिसू शकतात. यामुळे महाराष्ट्रात नविन घरांची निर्मीती होणार आहे.  मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गालगत म्हाडाची घरं निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हाडाने एमएसआरडीसीकडून एक हजार कोटी …

Read More »

Parliament Winter Session: संसद घुसखोरी अन् 141 निलंबनाचं राजकारण; विरोधक कोणती भूमिका घेणार?

MPs Suspended From Parliament : संसदेत गोंधळ घालणाऱ्या आणखी 49 खासदारांचं मंगळवारी निलंबन करण्यात आलं. गोंधळी खासदारांवर कारवाई होण्याचा हा तिसरा दिवस… ज्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं. संसदेची सुरक्षा भेदून दोघा तरुणांनी लोकसभेत उड्या मारल्याच्या घटनेवर सरकारनं निवेदन करावं, संसदेच्या सुरक्षेप्रकरणी चर्चा व्हावी, अशी या खासदारांची मागणी होती. मात्र, त्यावरून खासदारांनी गोंधळ घातला, तेव्हा सरकारनं थेट निलंबनाचीच कारवाई केली. त्यामध्ये …

Read More »

शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Shani Shingnapur : शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलीय. तसंच शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणे कायदा लागू करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली. शनिशिंगणापूर तिर्थ क्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्ट्राचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.   शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्यावरून परिषदेत गोंधळ झाला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.  श्री …

Read More »

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लान! जरांगे यांचा विरोध

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लान तयार केला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईत हे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरु असल्याचं कळतंय. मात्र, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांंचा याला विरोध आहे.  विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल …

Read More »

‘तुमच्याविरोधात ठोस पुरावे…’, हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दांपत्याला मोठा धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली

हनुमान चालिसा पठण प्रकरणी रवी राणा आणि नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने दोघांविरोधात पुरावे तसंच साक्षीदार असल्याचं सांगत याचिका फेटाळून लावली आहे. राणा दांपत्याने याप्रकरणी दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. आज यावर न्यायालय निर्णय देणार होतं. पण आज कोर्टाने दोघांविरोधात ठोस पुरावे आहेत सांगत याचिका फेटाळून लावली. आता 5 जानेवारीला …

Read More »

आमदाराच्या सुनेची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये पतीचे नाव, पोलिसांकडून अटक

Crime News In Marathi: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथील काँग्रेस आमदाराच्या सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काँग्रेस आमदार सोहनलाल वाल्मिकी यांच्या मुलाला अटक केली आहे तर राहते घरही सील करण्यात आले आहे. आदित्य वाल्मिकी असं आमदाराच्या मुलाचं नाव असून त्याच्यावर 28 वर्षांच्या पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा …

Read More »

मुंबई- ठाणे जोडणाऱ्या मेट्रो मार्गावरील 2 स्थानके वगळली; आता असा असेल मार्ग

Mumbai Metro 4 station: वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मेट्रोमुळं ठाण्यातील प्रवाशांना थेट मुंबईत येणार आहे. तसंच, हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही दक्षिण मुंबईत येण्याचा पर्याय उपलब्ध होईल. मात्र, या प्रकल्पात थोडे बदल करण्यात आले आहेत. जागेचा अडसर आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यामुळं मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने दोन स्थानके वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो 4 मार्गावरील सुमननगर …

Read More »

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; ‘या’ प्रकारे समोर आलं सत्य

Dinosaur Egg Found in MP: श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणे खूप आवश्यक आहे. अनेकदा अंधश्रद्धेमुळं मानवाचे खूप नुकसान झाल्याची उदाहरणदेखील तुम्ही पाहिली आहेत. मध्य प्रदेशातही एक अजीब प्रकार समोर आला आहे. दगडाचे गोळे म्हणून गावकरी ज्याची पुजा करत होते त्याची तपासणी करताच मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. तज्ज्ञांच्या एका पथकाने केलेल्या तपासणीत हे सत्य उघड झाली आहे. …

Read More »

साऊथ कोरियाच्या तरुणीचा पुण्यात विनयभंग, व्हिडिओ करत असताना तो आला अन्…

South Korean Vlogger Harassed: साउथ कोरियाची युट्यूबर तरुणी पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. मात्र, नेमकी ही घटना कुठे घडली आहे याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाहीये.  कैली नावाच्या कोरियन तरुणीने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक …

Read More »

काँग्रेसला देणगी द्यायला जाल तर भाजपच्या खात्यात जातील पैसे! Donate for Desh मोहिमेत मोठा घोळ

Congress Donation Campaign : आगामी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासोबात ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ (Donate for Desh) नावाची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेसने या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांना 138, 1,380 रुपये, 13,800 रुपये किंवा 10 पट रक्कम पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनापूर्वी दान करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ‘जनतेचा पैसा हडप करण्याचा आणि …

Read More »

VIDEO: तृणमूल खासदाराने उपराष्ट्रपतींची उडवली खिल्ली; राहुल गांधी हसल्याने भडकले धनखड

Opposition MPs suspension : नव्या संसद भवनात चार तरुणांनी केलेल्या घुसखोरीवरुन विरोधक आक्रमक झाले आहे. संसदेतील सुरक्षाभंगावरुन सोमवारी खासदारांनी संसदेत गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर आधी लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात निलंबित खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन सुरु केले आहे. मात्र आता या आंदोलनावरुन आता राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड चांगलेच संतापले आहेत. सभापती जगदीप धनखड …

Read More »

‘स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी….’ 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवार संतापले, ‘असं असेल तर शिक्षेला तयार’

संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा ‘इंडिया आघाडी’ने दिला आहे. यावरुन दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संतापले आहेत. ‘झी …

Read More »

भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणात कंगना, मतदारसंघाबाबत मात्र सस्पेन्स

Kangana Ranaut On Loksabha 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिने केलेली वक्तव्य खूप गाजतात. अलीकडेच कंगना लोकसभा 2024ची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, कंगनाकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र आता तिच्या कुटुंबातील एका सदस्यानेच यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगना भाजपाकडून लोकसभा निवडणुक लढणार असण्याची माहिती …

Read More »