ताज्या

Panchang Today : आज पौष महिन्यातील द्वितीया तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang 13 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी आहे. धनिष्‍ठ नक्षत्रासोबत सर्वार्थ सिद्धी योग आहे.  चंद्र आणि गुरू यांच्यामध्ये केंद्र योगाची निमिर्ती होणार आहे. (saturday Panchang)    तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार हा हनुमान आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं …

Read More »

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील टोलचे रेट कार्ड पाहून वाहनचालक चक्रावले; महिन्याचा टोल पास तब्बल 79 हजार रुपयांचा

Mumbai Trans Harbour Link :  MMRDAमार्फत बांधण्यात आलेला अटल सेतू म्हणजेच शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू अखेर वाहतुकीसाठी सज्ज झालाय. अटल सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई शहरांना जोडणारा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूचे कौतुक होत असतानाच चर्चा रंगली आहे ती येथे केल्या जाणाऱ्या टोल वसुलीची.  शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर कमीत कमी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. या …

Read More »

3 कोटींपेक्षा कमी लोक आले तर नाव बदलेन; मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे यांचा इशाारा

manoj jarange on maratha reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. 3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा असं सांगत मनोज जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिलाय.   आरक्षण देण्याच्या नावाखाली सरकार फसवणूक करत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. …

Read More »

हास्य कवी संपत सरल करणार विद्रोही साहित्य संमेलनाचं उदघाटन

विनोद पाटील, झी मिडिया, मुंबई :  सानेगुरूजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये यंदाचं 18 वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला हे संमेलन भरवण्यात येणार असून सुप्रसिद्ध विद्रोही हास्य कवी संपत सरल यांच्या हस्ते या संमेलनाचं उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी अमळनेरमधील विद्रोही साहित्य संमेलन स्थळाचं अनोख्या पद्धतीनं भूमीपूजन करण्यात आलं. लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांच्या …

Read More »

‘जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही…’ अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?

Ananya Panday Possessive : गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अभिनेत्री अनन्या पांडेच्या लव्ह लाईफची चर्चा सुरु आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी एकत्र एका पार्टीत हजेरी लावली. नुकतंच अनन्याने एका कार्यक्रमादरम्यान आदित्यसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी तिने …

Read More »

‘खर्च उचलावा लागतो म्हणजे काय…’, अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली ‘ती रस्त्यावर…’

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक वादग्रस्त कार्यक्रम म्हणून बिग बॉसला ओळखले जाते. सध्या बिग बॉस हिंदीचे 17 वे पर्व सुरु आहे. या पर्वात सहभागी झालेले अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. “विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो”, असे त्या म्हणाल्या. त्यावर आता अंकिताची …

Read More »

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने…; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

कर्नाटकातील एका हॉटेलमध्ये मुस्लीम तरुणांनी घुसून तिथे राहणाऱ्या एका मुस्लिम महिला आणि एका हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा घटनेत धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने नवा खुलासा केल्याने घटनेला वेगळे वळण आले आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, हॉटेलच्या बाहेर फेकल्यानंतर मुस्लिम तरुणांनी तिला निर्जनस्थळी …

Read More »

‘झिम्मा २’चं चित्रपटगृहात अर्धशतक; ‘हा’ सिनेमा ठरला दुसरा यशस्वी मराठी चित्रपट

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित …

Read More »

‘नियतीने ठरवलं होतं की…’, अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, ‘PM मोदींना…’

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, त्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान 22 जानेवारी या तारखेची घोषणा झाल्यापासूनच अनेकजण लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख करत त्यांची आठवण काढत होते. लालकृष्ण अडवाणी कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण नंतर हे वृत्त फेटाळण्यात आलं होतं. राम मंदिर उभं राहण्यासाठी लढा देणारे लालकृष्ण अडवाणी …

Read More »

‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या, ‘मग सुट्टी काय…’

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.  सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत …

Read More »

पंतप्रधान मोदी अष्टांग योगातील ‘यम’ नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या

PM Modi 11 Day Anushthan : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. रामाची प्राणप्रतिष्ठापणा होईपर्यंत 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष अनुष्ठान करणार आहे. या अनुष्ठानची सुरुवात नाशिक काळाराम मंदिर पंचवटी इथून करण्यात आली आहे. या विशेष अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. काय आहे हे अनुष्ठान आणि काय आहे …

Read More »

नको तिथे नियमांना प्राधान्य यालाच म्हणतात का? बेड रिडन व्यक्तीला हक्काच्या पेन्शनसाठी काय करावं लागलं पाहा

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सरकारी कामकाजात सर्वसामान्यांना कायमच वाट पाहावी लागते. यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांवरही हीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. आधीच वेदना सहन कराव्या लागत असताना रुग्णाने आपण जीवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी सरकारी कार्यालयापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत प्रवास केला आहे. पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी …

Read More »

‘…म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो’, कोणी आणि का केला हा दावा?

Ram Mandir : सर्वत्र सध्या श्री रामाचा जप ऐकायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. अख्ख देश राममय झालेला दिसत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. पण या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. त्यामधील कारणही तेवढंतच भीतीदायक आहे. रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ही शास्त्रांच्याविरोधात आहे, …

Read More »

‘आई-बहिणींना अपशब्द वापरू नका’ नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन

PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली.  नाशिकमध्ये जवळपास 40 गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात आलं. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसंच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आलं. या रोड शोमध्ये पंतप्रधानांसोबत (PM Narendra Modi) …

Read More »

पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व

PM Modi 11 Day Anushthan: अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेमध्ये सहभागी होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ऑडिओ संदेशात 22 जानेवारीच्या त्या अद्भूत क्षणाचा साक्षीदार होणार आहोत ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठापणनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं …

Read More »

Rajyog 2024 : ‘या’ राशीत तयार होणार ‘महाभाग्य योग’! माता लक्ष्मीच्या कृपेने बरसणार पैशांचा पाऊस

Mahabhagya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडली आणि ग्रह स्थिती याला अतिशय महत्त्व आहे. एखादी व्यक्ती सामान्य कुटुंबात जन्माला येते पण ती यशाच्या शिखरावर पोहोचलेली आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात की त्याची ग्रह स्थितीत धनवान होणं लिहिलं असतं. कौटुंबिक पार्श्वभूमी खूपच कमकुवत असून त्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक राजयोग निर्माण होतात. त्यामुळे याला या राजयोगामुळे श्रीमंत होण्याचा मार्ग …

Read More »

‘अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,’ महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी म्हणाले ‘हेच जर मुलाने….’

सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ वाद निर्माण करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन वाद निर्माण होण्याचं कारण म्हणजे, त्यात एका तरुणीने इंस्टाग्राम इन्फ्लूएन्सरने कशाप्रकारे महागड्या क्लबमध्ये तरुणाला बिल भरायला लावावं हे समजावून सांगितलं आहे.  तरुणी व्हिडीओत सांगत आहे की, “सर्वात आधी जुगाड करुन …

Read More »

सलग 3 दिवस बँका बंद, मकर संक्रांतीला बँक बंद की सुरु? जाणून घ्या बँक हॉलिडेची यादी

देशभरात पुढील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे सण साजरे होणार असून, यामुळे बँकेचे कामकाज बंद असणार आहे. काही राज्यांमध्ये तर सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. थोडक्यात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर बँका एकूण 16 दिवस बंद असणार आहेत.  जानेवारी 2024 मध्ये बँका 16 दिवसांसाठी बंद असणार आहेत. यामध्ये रविवार आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसंच उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती …

Read More »

ऑनर किलिंगने देश हादरला! गावातील चिंचेच्या झाडाला बापानेच मुलीला लटकवलं, दोर तोडला ती वाचली पण…

Honour Killing :  देशाला हादरवणारी आणखी एक ऑनर किलिंगची घटना घडली असून, यावेळी आई- वडिलांनी पोटच्या मुलीला तिनं अनुसूचित जमातीतील तरुणाला जोडीदार म्हणून निवडल्याचा आकस मानात ठेवत सूडभावनेनं तिला संपवण्याचं क्रूर कृत्य केलं.  कुठे घडली नात्यांला काळीमा फासणारी घटना? तामिळनाडूतील तंजावर येथे अनुसूचित जातींमधील मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केली. बीबीसीच्या वृत्तानुसार पूवालूर गावातील नवीन नावाच्या …

Read More »

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने (महावितरण) नागपुरात मोठी कारवाई केली आहे. नागपुरात महावितरण आणि लष्करीबाग उपविभागाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे मोहीम राबवून सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याची समोर आणलं आहे. या सात उद्योगपतींनी तब्बल 52.55 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आलं आहे. नारी आणि कामठी रोड परिसरातील सात उद्योजकांनी तब्बल 3 लाख 14 हजार 753 युनिटची वीज …

Read More »