‘आई-बहिणींना अपशब्द वापरू नका’ नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन

PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली.  नाशिकमध्ये जवळपास 40 गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यात आलं. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसंच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आलं. या रोड शोमध्ये पंतप्रधानांसोबत (PM Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. सुमारे दीड किलोमीटरच्या भव्य रोड शोसाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. पंतप्रधान मोदींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. जनार्धन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला. 

पंतप्रधान मोदींनी रोड शोनंतर गोदावरी तीरावर असलेल्या रामकुंडावर जलपूजन केलं…यावेळी सर्व आखाड्यांचे महंत उपस्थित होते…मोदींनी रामकुंडावर जलपूजन केल्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं…मोदींच्या या दौ-यादरम्यान जय श्री रामच्या घोषणांनी नाशिक दुमदुमून गेलं.

हेही वाचा :  शाकाहार, सुधा मूर्ती, ऋषी सुनक अन् नवा वाद! जाणून घ्या #IamPureVegetarian का होतोय ट्रेण्ड

युवा महोत्सावचं उद्धाटन
यानंतर नाशिकमध्ये सत्तावीसव्या युवा महोत्सवांच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटन करण्यात आलं. आपल्या भाषणाची सुरुवात पीएम मोदी यांनी मराठीत केली. राजमाता जिजाऊंना त्यांनी मराठीत वंदन केलं. भाषणात पीएम मोदी यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख लोकप्रिय सीएम असा केला. हा दिवस युवाशक्तीचा दिवस असल्याचं मोदींना भाषणात सांगितलं. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर टीका केली. घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान झालं असं पीएम मोदींनी म्हटल. तसंच युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं, ‘नशा करू नका, आई-बहिणींना अपशब्द वापरू नका’ असं आवाहन पंतप्रधान मोदींनी युवकांना केलं. 

देशाच्या सर्व मंदिर आणि तीर्थक्षेत्रावर स्वच्छता मोहिम राबवा असं आवाहन पीएम मोदी यांनी आपल्या भाषणात केलं. काळाराम मंदिरात येण्याची आणि सफाई करण्याची संधी मिळाली, असंही पीएम मोदींनी सांगितलं. तसंच आज भारताची अर्थव्यवस्थात जगातील टॉप 5 मध्ये आहे. तरुणांमुळे अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली. भारत हे उत्पादनाचं हब झालंय.महाराष्ट्राच्या भूमीला मनापासून नमन करत असल्याचंही मोदींनी सांगितलं.

‘चांद्रयान, आदित्य एल-१ चे यश जगासमोर आहे. भारतातील प्रत्येक दुकानसमोर युपीआय आहे. अमृतकाळात देशाला अजून पुढं न्यायचं आहे, असं पीएम मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. सरकारनं 10 वर्षात तरूणांना विविध संधी दिल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी तयार केली आहे. माझा तरूणांवर सर्वाधिक विश्वास आहे असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा :  पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच

भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत तरूणांचा सहभाग जेवढा जास्त असेल, तेवढंच देशाचं भविष्य चांगलं असेल. तरूण सक्रिय राजकारणात आले, तर घराणेशाहीच्या राजकारण कमी होत जाईल. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे,” असा हल्लाबोलही मोदींनी विरोधकांवर केला आहे.

पीएम मोदींकडून कौतुकाची थाप
नाशिकमधल्या दौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीय. नाशिकमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींना शाल भेट दिली.. सन्मान सोहळ्यात मोदींच्या खांद्यावरची ही शाल काही वेळाने घसरली. मात्र सतर्क असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ती घसरू न देता पकडली आणि पुन्हा मोदींच्या खांद्यावर चढवली.. एकनाथ शिंदेंच्या याच कृतीचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप दिली.

पीएम मोदी लक्षद्वीपला गेले तर…
राम मंदिर बनवून पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं.. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये मोदींचं कौतुक केलं.. मोदी जगात सर्वात लोकप्रिय पंतप्रधान आहेत.. मोदी लक्षद्वीपला गेले तर मालदीवला भूकंप आला असं म्हणत मोदींचा जगभरात किती दरारा हे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …