Breaking News

हुमा कुरेशीच्या लुक्सने विस्फारतील डोळे, डिझाईनर्स कपड्यातील रॉयल लुक

हुमा कुरेशीने आपल्या अभिनयाने आणि लुक्सने नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडली आहे. नुकताचा ‘मेरा नूर है मशहूर’ या सिरीजमधील हुमाने आपला लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या लुककडे पाहून डोळेच विस्फारतील. डिझाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये हुमा अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत असून एखाद्या राजकन्येप्रमाणे भासत आहे.

हुमाने केलेला हा लुक अत्यंत रॉयल असून कोणत्याही लग्नासाठी अथवा विशेष कार्यक्रमासाठी आपण असा लुक कॅरी करू शकतो. हुमाच्या या लुकवरून प्रेरणा घेऊन कपड्यांची निवड करणे अधिक सोपे जाईल. पाहुया हुमाच्या या लुक्सचे अधिक तपशील (फोटो सौजन्य – @iamhumaq Instagram)

श्वास रोखणारा रॉयल लुक

श्वास रोखणारा रॉयल लुक

हुमा कुरेशीने नुकतेच फोटोशूट केले असून डिझाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला वन साईडेड ऑफशोल्डर लेहंगा घातला आहे. पर्पल आणि सिल्व्हर डिझाईन असणारा हा लेहंगा आणि हुमाचा लुक श्वास रोखून धरायला लावेल इतका सुंदर आहे. थाई स्लिट कट असणारा हा ड्रेस लक्षवेधी आहे.

हेही वाचा :  वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पागल असतात मुली, 5 महिलांनी सांगितले मोठ्या पुरूषांच्या प्रेमात का घायाळ असते मन

मोकळे केस आणि अ‍ॅटिट्यूड

मोकळे केस आणि अ‍ॅटिट्यूड

या डिझाईनर कपड्यांसह हुमाने दिलेल्या पोझ आणि अ‍ॅटिट्यूडमुळे तिच्यावरून नजरच हटत नाहीये. मॉडेलसह दिलेल्या पोझ आणि डिझाईनर कपडे यामध्येच तिच्या चाहत्यांचे मन गुंतल्याचे दिसून येत आहे. या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसून येत आहे.

(वाचा – ‘परी म्हणू की सुंदरा’ प्रियाचे परफेक्ट साडी लुक्स, पारंपरिक आणि मॉडर्न तडका)

नॅचरल मॅट मेकअप

नॅचरल मॅट मेकअप

यासह हुमाने नॅचरल मॅट मेकअपचा आधार घेतला आहे. पर्पल रंगाला शोभेल असे हायलायटर, न्यूड लिपस्टिक शेड आणि स्मोकी आईज असा लुक केल्यामुळे हुमाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तिचा हा लुक इंटरनेटवर सध्या व्हायरल होत असून चाहत्यांची पसंती मिळत आहे.

(वाचा – या मराठी अभिनेत्याची बायको आहे अत्यंत स्टायलिश, हिंदी मालिकांमध्ये गाजवतेय नाव)

एलिगंट ऑफ-व्हाईट सिल्व्हरी आऊटफिट

एलिगंट ऑफ-व्हाईट सिल्व्हरी आऊटफिट

या फोटोमध्ये हुमा एखाद्या राजकन्येपेक्षा कमी भासत नाहीये. ऑफ-व्हाईट क्रिमिश अशा रंगाचा लेहंगा आणि त्यावर नेट दुपट्टा घेऊन हुमाने लुक पूर्ण केला आहे. या एलिगंट लुकमध्ये हुमाच्या चेहऱ्यावरून नजरच हटत नाहीये. सोशल मीडियावर हुमाचा हा ग्लॅम अवतार व्हायरल होतोय.

हेही वाचा :  महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

(वाचा – अंबांनीची सून राधिका मर्चंटची स्टायलिश एंट्री, गुलाबी रफल साडी आणि चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल)

एक्विझिट दागिने

एक्विझिट दागिने

हुमाने या लेहंग्यासह घातलेल्या Exquisite Jewelry ने लक्ष वेधून घेतले आहे. मोठा कुंदन नेकलेस आणि मांगटिका या ड्रेसची शोभा वाढवत आहे. या संपूर्ण दागिन्यांमुळे लेहंग्याला एक वेगळाच लुक प्राप्त झाला आहे. त्यात हुमाने दिलेल्या पोझ अधिक भर घालत आहेत.

व्हेवी हेअरस्टाईल आणि ग्लॅम मेकअप

व्हेवी हेअरस्टाईल आणि ग्लॅम मेकअप

या लुकसह हुमाने भांग पांडून दोन्ही बाजूला व्हेवी हेअरस्टाईल केली असून मेकअपसाठी ग्लॅम आणि ग्लॉसी लुक ठेवला आहे. ड्यूई बेस आणि त्यासह आयलॅशसह मस्कारा आणि लाल शेड लिपस्टिकचा आधार घेत हा लुक अधिक क्लासी केला आहे.

एखाद्या लग्नासाठी अथवा तुमच्या स्वतःच्या लग्नातही तुम्ही हा लुक नक्कीच कॅरी करू शकता. एलिगन्स आणि क्लासी लुक याचे हे समीकरण म्हणावे लागेल.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई-पुणे दरम्यान 28 मे ते 2 जूनपर्यंत अनेक ट्रेन रद्द होणार, वाचा संपूर्ण लिस्ट

Mumbai-Pune Train cancelled List: मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 28 …

‘मातोश्रीचे ‘लाचार श्री’ होणाऱ्यांची हकालपट्टी करा’, शिशिर शिंदेंच्या पत्राला कीर्तिकरांनी दिलं उत्तर, ‘कोणीतरी चुगली करणारं…’

Shishir Shinde Letter to Eknath Shinde:  शिवसेना उपनेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी गजानन कीर्तिकर …