नेटची काळीभोर साडी,हि-यांची भरजरी नक्षी,ऑफशोल्डर ब्लाऊज,काळीकुट्ट नेलपेंट,हुमा कुरेशीचंं मंत्रमुग्ध करणारं रूप

Huma Qureshi बॉलीवूड मधील त्या अभिनेत्रींपैकी एके आहे जी आपल्या बिनधास्तपणासाठी प्रसिद्ध आहे. तिचे चित्रपटातले रोल्स असो व रिअल लाईफमधील ती स्वत: असो त्यात ग्लॅमरचा तडका आणि बिनधास्तपणा अवश्य दिसतो. तिला तिच्या अभिनयाप्रमाणे आणि सौंदर्याप्रमाणे हवे तसे यश मिळाले नसले तरी गेल्या 1 ते 2 वर्षांत मात्र तिची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचे दिसते आहे. हुमा कुरेशी ही अन्य अभिनेत्रींपेक्षा सडपातळ बांध्याची नाही पण ही तिची कमतरता नसून एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

कारण ती जशी आहे तसं तिने स्वत:ला घडवलं आहे आणि स्वत:ची वेगळी फॅशन व स्टाईल डेव्हलप केली आहे. हुमा सर्व प्रकारचे आऊटफिट्स लिलया कॅरी करते आणि साडी तर तिची खूप जास्त फेव्हरेट असल्याचे सुद्धा सांगण्यात येते. तर अशा या सुंदर अभिनेत्रीने नुकतेच काही साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करत धुमाकूळ घातला आहे. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @iamhumaq))

मन मोहून घेणारी साडी

मन मोहून घेणारी साडी

हुमा कुरेशीने काळ्या रंगाची सुंदर साडी घालून फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये तिचा अवतार खूपच किलर दिसतो आहे. काळ्या रंगाच्या या शियर साडीसोबत तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला असून तिची एकंदर साडी खूप जास्त सुंदर आणि आकर्षक दिसते आहे. तुम्ही जर एखाद्या लग्न समारंभात जाणार असाल तर अशा प्रकारची साडी नक्की परिधान करू शकता. तुमचा लुक नक्कीच अन्य स्त्रियांच्या तुलनेत उजवा ठरेल.

हेही वाचा :  Bhagyashree Birthday:रुबाब, शाहीथाट सलमानची हिरॉईन भाग्यश्रीचे साडीतील 5 मराठमोळे लुक

(वाचा :- ट्यूब टॉप व शॉर्ट्समध्ये तारा सुतारियाने फ्लॉंट केला सडपातळ बांधा, कातील अदा बघून इंटरनेचा पारा गेला सर्रकन वर)​

सी-थ्रू साडीवर गोल्डन सिक्विन

सी-थ्रू साडीवर गोल्डन सिक्विन

हुमाने फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधून ही साडी निवडली होती. या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती सी-थ्रू फॅब्रिकमध्ये होती. या काळ्या रंगाच्या साडीवर गोल्डन एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. साडीवर गोल्डन सिक्विन सजवलेले पॅटर्न अॅड गेले होते, जे बारीक धाग्यांच्या मदतीने जोडलेले होते. तर या साडीच्या बॉर्डरवर फेदर डिटेलसह ऍप्लिक वर्क दिसत होते. एकंदर हुमाची ही साडीच कोणलाही प्रेमात पाडणारी आणि हवीहवीशी वाटणारी होती.

(वाचा :- दिशाच्या दिलखेचक लेहंगा-क्रॉप चोळी लुकपुढे नवीकोरी नवरी कियाराही फिकी, पोर्णिमेच्या चंद्रावर नवरा राहुलही फिदा)​

ऑफ शोल्डर ब्लाऊज केला कॅरी

ऑफ शोल्डर ब्लाऊज केला कॅरी

या साडीसोबत हुमाने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ब्लाऊज घातला होता, ज्याला स्वीटहार्ट नेकलाइन देण्यात आली होती. या ब्लाऊजवर मॅचिंग सिक्वीन्स आणि बीड्स जोडण्यात आले होते, जे साडीसोबत परफेक्ट मॅच होत होते. हुमाने ही साडी पारंपारिक पद्धतीने स्टाईल केली होती आणि तिला खूप जास्त खुलून दिसत होती. असे वाटत होते जणू ही साडी खास हुमासाठीच बनवली गेली आहे की काय!

हेही वाचा :  आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

(वाचा :- न्यासा देवगणचा रेड शॉर्ट ड्रेसमध्ये कहर, गुलाबी गाल अन् नखरेल चाल बघून लाखो चाहत्यांच्या काळजाचा चुकला ठोका)​

मेकपने लुक बनवला क्लासी

मेकपने लुक बनवला क्लासी

हा लूक कम्प्लिट करण्यासाठी हुमाने गोल्डन पर्ल ड्रॉपडाउन ईअररिंग्स घातल्या होत्या, चांदीची डायमंड रिंग परिधान केली होती आणि गोल्डन बॅग सुद्धा कॅरी केली होती. स्मोकी आईज, पिंक ग्लिटरी आईशॅडो, ब्लश्ड चीक्स, डेवी फाउंडेशन, ग्लॉसी पीच लिप शेड, मस्कारा आणि शार्प कॉन्टोरने तिने आपला मेकअप पूर्ण केला होता. हुमाच्या साडीचा हा एम्ब्रॉईडरी पॅटर्न अगदी नवीन आणि युनिक आहे आणि तुम्ही येणाऱ्या एखाद्या लग्नसमारंभासाठी असा लुक कॅरी करण्याचा विचार नक्कीच करू शकता.

(वाचा :- मलायका अरोराचा नादच नको…! ब्लॅक बॉडीसूटमधील किलर लुकसमोर वनपीसमधील करिश्मा कपूरही पडली फिकी, फॅशनची जुगलबंदी)​

वनपीसमधील कातील लुक

वनपीसमधील कातील लुक

नुकत्याच एका इव्हेंटला मोठमोठ्या बॉलीवूड सौंदर्यवती उपस्थिती होत्या, पण त्यावेळी सर्वात जास्त भाव खाऊन गेली ती हुमा कुरेशी! हुमा कुरेशीच्या एन्ट्रीने पाहणाऱ्या प्रत्येकाचा कलेजा खल्लास केला. हुमाचे नशीब सध्या जोरावर आहे. ती जो रोल करते आहे तो हिट होतो आहे. त्यामुळे तिच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागून असतात. हुमा यावेळी वेलवेट फॅब्रिकचा शॉर्ट ड्रेस परिधान करून पोहोचली होती. ज्यात तिची फिगर हायलाईट होताना दिसत होती. या आऊटफिटमध्ये प्लीट्स पडताना सुद्धा दिसली आणि वेस्टवर मस्त फिटिंग दिसून आली. शिवाय लुक कम्प्लिट करण्यासाठी तिने गळ्यात डायमंडचा सुंदर नेकलेस घातला होता व केस ओपन ठेवले होते. या आऊटफिटच्या जोरावर हुमाने कित्येकांना घायाळ केले याची मोजदादच नाही.

हेही वाचा :  लाल भडक टिकली अन् कागदापेक्षाही पातळ साडीत काजोलचा धुरळा

(वाचा :- 53 वर्षांच्या भाग्यश्रीने नेसली इतकी सुंदर साडी की पडली 27 वर्षांच्या लेकीवरच भारी, आई कोण अन् लेक कोण फरक सांगा..!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …