रणवीरचं न्यूड फोटोशूट ते कॉमेडियन वीर दासची कविता; 2022 मधील ‘बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी’

Year Ender 2022: 2022 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहेत. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खास वर्ष होते. या वर्षी अनेक चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला.  आरआरआर, ब्रह्मास्त्र, गंगूबाई काठियावाडी यांसारख्या बिग बजेट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली पण अवघ्या 16 कोटींमध्ये तयार झालेला कांतारा भाव खाऊन गेला. काही चित्रपट हिट ठरले तर काही वादग्रस्त ठरले. चित्रपटांबरोबरच कलाकर देखील चर्चेत होते. काही कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकले तर काही त्यांच्या कामामुळे अडचणीत सापडले. 2022 मधील ‘बॉलिवूड कॉन्ट्रोव्हर्सी’ यांच्याबाबत जाणून घेऊयात…

द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)

11 मार्च रोजी प्रसिद्ध झालेला द कश्मीर फाइल्स हा चित्रपट रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकला. या चित्रपटाबद्दल नादव लॅपिड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर द कश्मीर फाइल्स हा चित्रपट पुन्हा चर्चेचा मुद्दा झाला. चित्रपटाच्या कथानकावर काही लोकांनी अक्षेप घेतला होता. 

रणवीर सिंहचं फोटोशूट (Ranveer Singh)

News Reels

हेही वाचा :  'अवतार' च्या Advance Booking ला सुरुवात; रुपेरी पडद्यावर दिसणार निळ्या विश्वाची जादू

एका मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. रणवीरचे हे न्युड फोटो व्हायरल होताच काही लोकांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

काली पोस्टर (Kaali Poster) 

दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्या काली या माहितीपटाच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता. या माहितीपटाच्या  पोस्टरमध्ये माँ कालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, माँ कालीच्या वेशभूषेत ही अभिनेत्री एका हातात त्रिशूळ आणि एका हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेऊन दिसत आहे. हे पोस्टर हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावत असल्याचे म्हणत सोशल मीडियावरील युझर्स संतापले होते. 

ब्रह्मास्त्र (Brahmastra)
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रणवीर हा मंदिराची घंटा वाजवताना शूज परिधान केलेला दिसला. त्यामुळे नेटकरी या चित्रपटावर भडकले. त्यानंतर अयान मुखर्जीनं यावर स्पष्टीकरण दिले होते. 

लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)
लाल सिंह चड्ढा हा चित्रपटामुळे देखील कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली. या चित्रपटाच्या कथानकामुळे तसेच चित्रपटामधील कलाकारांच्या जुन्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. 

हेही वाचा :  Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फिट टू फॅट अवतार

वीर दासची  (Veer Das) कविता 
अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासनं अमेरिकेत  वॉशिंग्टन डीसीमध्ये स्टँड अप कॉमेडी शो दरम्यान एक कविता सादर केली. त्यानंतर त्या कवितेवरुन वाद निर्माण झाला. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Most Searched South Films : RRR ते KGF 2; 2022 मध्ये दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला; जाणून घ्या सर्वाधिक सर्च केलेले ‘टॉप 10’ चित्रपट

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …