Bank Holiday List: नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या

Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

RBI च्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यात बँका 4 किंवा 6 दिवस नाही तर तब्बल 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी, छठ पूजा, गोवर्धन पूजा यासह सर्व सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवार या 15 दिवसांच्या सुट्टीचाही समावेश आहे.

सुट्ट्यांची यादी 

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीत राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. यावेळेस नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील ते पाहूया.

नोव्हेंबरमध्ये बँक सुट्ट्या

1 नोव्हेंबर  – कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
5 नोव्हेंबर – रविवारी देशभरातील बँका बंद राहतील.
10 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीमुळे शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
11 नोव्हेंबर – दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
12 नोव्हेंबर – रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
13 नोव्हेंबर – गोवर्धन पूजा/लक्ष्मीपूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.
14 नोव्हेंबर – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
15 नोव्हेंबर – गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबर – रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
20 नोव्हेंबर – पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
23 नोव्हेंबर – सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
25 नोव्हेंबर – चौथा शनिवार
26 नोव्हेंबर – रविवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
27 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

हेही वाचा :  पुण्यातील बाजारपेठेत दोघांची फ्री स्टाइल हाणामारी; कारण ठरला 'टोमॅटोचा भाव'

ऑनलाइन बँकिंगचा पर्याय 

नोव्हेंबर महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका बंद राहतील. असे असले तरी तुम्ही मोबाईल नेट बँकिंगच्या माध्यमातून लोक घरी बसून आपली कामे करू शकता. बँकांनी ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. असे असले तरी एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. म्हणून, सुट्टीपूर्वी रोख रकमेची व्यवस्था करुन ठेवणे सोयीचे ठरेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …