Same Sex Marriage: प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार – सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्ट समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणार ही नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुप्रीम कोर्टात आज ऐतिहासिक सुनावणी सुरु आहे. केंद्र सरकारने अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास ठाम विरोध केला होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल उत्सुकता होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणी सलग 10 दिवस सुनावणी घेतली होती. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांचा समावेश आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवण्यात आला होता. 

सुनावणीदरम्यान घटनापीठाने सांगितलं की, कोर्टाने याप्रकरणात किती दखल द्यावी याचा आम्ही विचार केला. आम्ही यामध्ये लक्ष घालू नये असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. देशातील नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचं रक्षण व्हावं अशी अपेक्षा राज्यघटना करते. न्यायपालिका आणि विधिमंडळ यांच्यातील अधिकारांची विभागणी यात अडथळा आणत नाही. 

समलैंगिकता आता फक्त शहरांपुरती मर्यादित नाही. समलैंगिकता फक्त उच्चभ्रू वर्गात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण देशातील गावांमध्येही समलैंगिक राहतात. वेळेसह विवाहसंस्थेत फार बदल झाले आहेत. सती परंपरा संपणं आणि विधवा पुनर्विवाहाल संमती हा त्याचाच भाग आआहे. लग्न ही काही वेळेसह बदलणारी संस्था नाही. आम्ही विशेष विवाह कायदा याच्यासह पर्सनल लॉमध्ये बदल करावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. पण कोर्टाच्या काही मर्यादा आहेत. विधीमंडळाच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करु इच्छित नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. 

हेही वाचा :  Success Story: घरच्यांचा विरोध डावलून UPSC ची तयारी, वंदना यांनी IAS बनूनच दाखवलं

विेशेष विवाह कायद्यात बदल करायचा की नाही यावर विचार करणं संसदेचं काम आहे.  समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता न देता त्यांची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आपल्या जोडीदाराची निवड हा कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा भाग आहे. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे असंही घटनापीठाने सांगितलं. 

 

भारतात समलैगिंक अधिकारांबाबत आत्तापर्यंत काय घडलं?

2014: सुप्रीम कोर्टाकडून “तिसरे लिंग” म्हणून कायदेशीर मान्यता

2017: कोर्टाने गोपनियतेचा (Right To Privacy) अधिकार मान्य केला. 

2018: समलैंगिक संबंधाला गुन्ह्याच्या श्रेणीतून हटवलं. कलम 377 रद्द.

2022: “एटिपिकल” परिवारांना मान्यता… असाधारण/ विशिष्ट परिवारांना मान्यता, ज्या परिवारामध्ये समलैगिंक व्यक्तींचा समावेश असेल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …