ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे फिरला? धक्कादायक प्रवास मार्ग आला समोर

Drug Smuggler Lalit Patil: ड्रग्ज तस्कर ललित पाटील  याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. 2 ऑक्टोबर 2023 रोजी ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी दहा पथकं तयार करण्यात आली होती. ड्रग्ज तस्कर ललित पाटील 10 दिवसात कुठे कुठे फिरला? याची ठिकाणे समोर आली आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

ललित पाटील हा चेन्नई येथे लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने चेन्नई गाठून सापळा रचला आणि ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या. ललित पाटील याला आता मुंबईत आणलं गेलं असून लवकरच कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर सगळ्यात आधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पोहोचला.

धुळ्यानंतर छत्रपती संभाजीनंतर त्यानंतर गुजरातमधील जामनगरमध्ये जाऊन तीन दिवस राहिला.

मुंबई पोलिसांची एकूण पाच पथक त्याच्या मागावर होती.

गुजरातमधून ललित पाटील समृद्धी महामार्ग पकडून सोलापुरात आला आणि त्यानंतर त्याने कर्नाटकात प्रवेश केला.

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अखेर ललित पाटीलला अटक करण्यात आलीय.

हेही वाचा :  शोएबच्या निकाहवर सानिया मिर्झाची पहिली प्रतिक्रिया, घटस्फोटाविषयी केला मोठा खुलासा

ललित पाटील बेंगलूरूमधून परदेशात पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती सूत्रांनी दिली.

ललित पाटील हा पोलिसांच्या हाती लागल्याने ड्रग्सप्रकरणातील अनेक बड्या लोकांची नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याला अटक केली होती. तसेच त्याला तपासासाठी नाशिकला आणण्यात आले होते. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भूषण पाटील याच्या घरी पुणे पोलिसांनी तपास केला. शिंदे गावात ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, त्या ड्रग्स कारखान्यावर देखील भूषणला तपासासाठी नेण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण करून पुणे पोलिसांचे पथक भूषण पाटीलला घेऊन रवाना झाले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दारुच्या नशेत मला…,’ काँग्रेसच्या महिला नेत्याचे गौप्यस्फोट, ‘दार बंद करुन…’

छत्तीसगडमधील काँग्रेस नेत्या राधिका खेरा (Radhika Khera) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. प्रदेश कार्यालयाकडून वारंवार …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …