पुराणातील हिंदू ऋषींच्या नावावरून मुलांची नावे आणि अर्थ

Indian Baby Boy Names And Meaning :  मुलांची नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात. मुलांवर कायम मोठ्या व्यक्तींचा कृपाशिर्वाद असावा असं कायम वाटत असतं. हिंदू संस्कृतीत पुराणातील ऋषींचे अनन्य साधारण महत्त्व होते. ऋषीमुनींच्या नावावरून मुलांना नावे ठेवण्याचा तुम्ही देखील विचार करत असाल. तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

आता नावं ठेवताना पालक पुन्हा एकदा जुन्या नावांचा विचार करतात. जुनी नावे नव्याने ट्रेंड होऊ लागली आहेत. अशाच जुन्या पुराणातील हिंदू ऋषींची नावे आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. मुलांना कायमच पवित्र नाव द्यावे असं पालकांना वाटत असतं. अशावेळी जाणून घेऊया. पुराणातील ऋषीमुनींची नावे आणि त्या नावांचे अर्थ 

ऋषीमुनींची नावे आणि अर्थ 

पुलस्त्य – ब्रम्हदेवाचा मानस पुत्राचे नाव पुलस्त्य. ज्ञानी, तपस्वी आणि दैवीय संपत्तीचे मालक असा याचा अर्थ आहे. मुलांकरिता वेगळे नाव शोधत असाल तर या नावाचा नक्की विचार करा.

कश्यप – कश्यप ऋषींचे नाव प्रसिद्ध आहे. ऋषीमुनीमध्ये श्रेष्ठ मानण्यात येणाऱ्या ऋषींचे नाव तुम्ही निवडू शकता. धर्मरितीनुसार चालणारे आणि धर्माचे पालन करणारे असा कश्यप या नावाचा अर्थ होतो. कश्यप हा संस्कृत शब्द असून कासव असा याचा अर्थ होतो.

हेही वाचा :  Corona Fourth Wave | चीन, हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा धुमाकूळ, भारताला चौथ्या लाटेचं संकट?

अगस्त्य – अगस्त्य ऋषींचे नावही तुम्ही मुलासाठी निवडू शकता.  हे अत्यंत युनिक नाव असून सप्तर्षींमध्ये यांची गणना केली जाते. वैदिक नाव ठेवायचे असेल तर मुलासाठी तुम्ही हे नाव निवडू शकता.

अत्रि – अत्रि हे फक्त ऋषींचे नावच नाही तर अनेकांचे गोत्रही असते. महान ७ ऋषी ज्यांना सप्तर्षी असे म्हटले जाते त्यामध्ये अत्रि ऋषींचा समावेश होता. तारा आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असा त्याचा अर्थ आहे. 

वसिष्ठ – वसिष्ठ नदी आणि ऋषी दोन्ही प्रसिद्ध आहेत. ज्ञानी आणि अत्यंत गुणवान असे ऋषींचे नाव तुम्ही मुलासाठी निवडावे. समृद्ध आणि सर्व सृष्टी, उत्कृष्ट व्यक्ती असा या नावाचा अर्थ असून मुलासाठी वेगळे नाव म्हणून तुम्ही विचार करू शकता.

ऋषीमुनींची युनिक नावे मुलांसाठी निवडा 

व्यास –  महाभारत ज्यांनी लिहिले असे व्यास ऋषी. १८ पुराणांची रचना आणि वेदांची रचना करणाऱ्या ऋषींचे नाव हे नक्कीच तुमच्या मुलाच्या नावासाठी योग्य ठरेल. आपल्या मुलासाठी युनिक नावांचा शोध करत असाल तर या नावाचा विचार करावा.

भृगू – संत आणि शांत व्यक्ती असा भृगू या नावाचा अर्थ आहे. तुम्हाला थोडे कठीण आणि युनिक नाव हवे असेल तर ऋषीच्या नावावरून तुम्ही हे नाव सुचवून ठेऊ शकता.

हेही वाचा :  IND vs ENG: रोहित शर्माला 'ही' चूक पडणार का महागात? पहिल्या टेस्टमध्ये केलं 'हे' काम

मरीचि – सूर्याचे किरण, प्रभा अथवा कांती असा मरीचि या नावाचा अर्थ असून सप्तर्षींपैकी हे एक ऋषी मानले जातात. अत्यंत हुशार आणि प्रतिभावान असणाऱ्या या ऋषींचे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.

निमित – निमित या नावाचा अर्थ आहे तुमचं मुळ. या नावाचा अर्थ तुमचं नशिब असं देखील आहे. अर्थव वेदा, ऋग्वेदा यामध्ये देखील निमित नावाचा अर्थ आहे. ११ या नावाचा शुभांक आहे.

आयुष – आयुष या नाव्याचा अर्थ हिंदुमध्ये अतिशय खास आहे. हे नाव हिंदू धर्मामध्ये अतिशय खास आहे. याचा अर्थ आहे उदंय आयुष्य. महत्वाचं म्हणजे ऋग्वेद आणि अथर्व वेदात या नावाचा उल्लेख आहे.

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …

लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?

Swati Maliwal Details: सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या …