नारायण राणेंसह भाजपाला धक्का! निलेश राणेंनी तडकाफडकी घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics BJP Leader Nilesh Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन निलेश राणेंनी ही घोषणा केली आहे. निलेश राणेंच्या समर्थकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी असल्याची चर्चा कोकणच्या राजकारणामध्ये सुरु आहे. निलेश राणेंनी अचानक तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.

कायमचा बाजूला होत आहे

निलेश राणेंनी दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निलेश राणेंनी, “मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही,” असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली आहे.

भाजपाचे मानले आभार

“मागच्या 19 ते 20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रेम मिळालं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे,” असं म्हणत निलेश राणेंनी भाजपाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा :  समुद्राचं पाणी निळं का असतं? 96 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतीयाने उत्तर शोधून मिळवलं नोबेल

मला पटत नाही

“मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे खासदार होते

15 व्या लोकसभेमध्ये निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …