समुद्राचं पाणी निळं का असतं? 96 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतीयाने उत्तर शोधून मिळवलं नोबेल

National Science Day Indian Who Explained Why Sea Looks Blue: आज देशभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात आहे.  प्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण म्हणजेच सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सी. व्ही रमण यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 चा आहे. तर त्यांची मृत्यू वयाच्या 82 व्या वर्षी 21 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. मात्र असं असताना आजच त्यांच्या स्मृतिप्रर्त्यार्थ विज्ञान दिवस का साजरा केला जातो? नोबेल पुरस्कार विजेत्या सी. व्ही रमण यांच्याबद्दलच्या काही रंकज गोष्टी जाणून घेऊयात…

> सन 1917 मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात सी. व्ही. रमण हे पहिल्यांदा प्राध्यपक म्हणून नियुक्त झाले. आशुतोष मुखर्जी यांनी त्यांना भौतिकशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्त केले.

> 1930 सालातील भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रमण यांना मिळाले. हे कोणत्याही भारतीयला मिळालेलं पहिलं नोबल पदक होतं.

> 1941 मध्ये रमण यांना फ्रॅंकलिन पदक 1954 मध्ये भारतरत्न पुरस्कार आणि 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्कार रमण यांना मिळाला.

> सी. व्ही रमण यांनी 1926 मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. सी. व्ही रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विखुरण्यासंदर्भातील एक अभिनव शोध लावला. या संशोधनाला ‘रमण इफेक्ट’ म्हणून ओळखला जातो. प्रकाश विखुरण्यासंदर्भातील म्हणजेच प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंगचा शोध लावला. म्हणूनच भारत सरकारतर्फे दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा :  Viral : पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या हरणाचा Video पाहिलात का?

> आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यामध्ये सी. व्ही रमण यांना भूमध्य समुद्र पाहून समुद्राचा रंग निळा का असतो असा प्रश्न पडला. यामधून त्यांनी या गोष्टीचा शोध लावला. 

> रमण यांनी समुद्राचा रंग निळा का आहे याचा शोध लावण्यापूर्वी लॉर्ड रेलिंग्ह (Lord Rayleigh) यांनी सांगितलेलं स्पष्टीकरणच ग्राह्य धरलं जायचं. लॉर्ड यांनी समुद्राचा निळा रंग हा आकाशाचं प्रतिबंब पडल्याने दिसतो, असं म्हटलं होतं. मात्र रमण यांना हे पटलं नाही. त्यांनी भारतात परतल्यानंतर या विषयावर सविस्तर संशोधन सुरु केलं.

> रमण यांनी त्यांच्या संशोधनामधील निष्कर्षाने दाखवून दिले की समुद्राचा रंग पाण्याच्या रेणूंद्वारे निर्माण होतो. समुद्राच्या पाण्यातील रेणंमध्ये सूर्यप्रकाश विखुरल्याने पाण्याला निळा रंग मिळतो. याच संशोधनाला रमण इफेक्ट असं म्हणतात. सूर्यप्रकाश वेव्हलेंथपेक्षा लहान पाण्याच्या कणांना धडकतो तेव्हा तो विखुरला जातो. या विखुरलेल्या प्रकाशाचा एक छोटासा भागामुळे रेणूंमधील ऊर्जा हस्तांतरीत करतो आणि विखुरलेल्या प्रकाशाची व्हेवलेंथ बदलते. तसेच त्याच्या ऊर्जा पातळीतही वाढ होते. 

> रमण इफेक्ट ही एक दुर्मिळ घटना आहे. रमण इफेक्टमध्ये दशलक्ष प्रकाश कणांपैकी फक्त एखाद्या रेणूच्या व्हेवलेंथमध्ये बदल घडतो. या संशोधनातून प्रकाशाच्या रेणूंच्या गुणधर्माचा सबळ पुरावा सापडला.

हेही वाचा :  Maharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘जो मला हरवेल मी त्याच्याशीच लग्न करेन’, गिता-बबिता जन्मल्याही नसतील तेव्हाची पहिली महिला रेसलर

आज 4 मे रोजी गुगलने हमीदा बानोच्या स्मरणार्थ ‘डूडल’ तयार केले आहे. हमीदा बानो या …

‘मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी…’; ‘पवारांना कुटुंब संभाळता आलं नाही’वर पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर …