Jitendra Awhad : ‘शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र’; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Jitendra Awhad On BJP : महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतरही भाजपचे नेते काही शांत बसतं नाही आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi) यांनी शिवाजी महाराजांबाबत विधान केलं आहे. त्यांचा या विधानाचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 

सुधांशू त्रिवेदी यांचं वक्तव्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक खासगी वृत्तवाहिन्यांवर डिबेट शो घेण्यात येतं आहे. अशाच एका डिबेट शोमध्ये सुधांशू त्रिवेदी यांना बोलविण्यात आलं होतं. त्यावेळी त्रिवेदी म्हणाले की, ”औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली.” त्यांचा या वक्तव्यानंतर सर्वत्र रोष पसरला आहे. त्यांचा या विधानानंतर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आणि त्यांनी त्यांचावर पलटवार केला. (Jitendra Awhad Tweet on Sudhanshu Trivedi chhatrapati shivaji maharaj bhagat singh koshyari statement nmp)

हेही वाचा :  NPPA : ताप, डायबिटीस, दम्यासह 128 औषधं स्वस्त, नागरिकांना मोठा दिलासा

 

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नागरिकांना मोठं वचन; सर्वांसमक्ष म्हणाले…

 

‘शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र’

जितेंद्र आव्हाड यांनी त्रिवेदींवर हल्लाबोल करत म्हणाले की, ”शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे खपवून घेतलं जाणार नाही”, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.  ते असंही म्हणाले की, ”सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांची पाच पत्रे दाखवावी.”

Jitendra_Awhad_Tweet

राज्यपालांच्या मनात दुसरं काहीही नव्हतं  – फडणवीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपली प्रतिक्रियी दिलीय. जोपर्यंत चंद्र-सूर्य राहतील.. तोपर्यंत आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच राहतील, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यपालांच्या मनात दुसरं काहीही नव्हतं असंही फडणवीसांनी म्हंटलंय. 

राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर वाद 

”छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. नव्या युगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉक्टर नितीन गडकरी पर्यंत इथेच आदर्श मिळतील,” असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांना डी. लिट ही पदवी देण्यात आली. या सोहळ्यानंतर बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज तो पुरानी बात है, असं म्हटलं होतं.

हेही वाचा :  'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरेSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईने रामायणाचे विडंबन मानले जाणारे ‘राहोवन’ हे वादग्रस्त नाटक सादर …

‘मराठी माणूस यांची चड्डीपण..’, ‘बिनशर्ट’वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, ‘हिरव्या..’

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या …