करिअर

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! खासगी वैद्यकीय शिक्षण आता सरकारी शुल्कात

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईखासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये आता सरकारी शुल्कात शिक्षण घेणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission, NMC) याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. यानुसार खासगी वैद्यकीय कॉलेजांमधील ५० टक्के जागांवरील शुल्क हे सरकारी वैद्यकीय कॉलेजांच्या शुल्काएवढेच असावे, असे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी कॉलेजांमध्ये दरवर्षी १० ते २५ लाख रु.पर्यंत शुल्क आकारले …

Read More »

कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षाच घ्याव्या लागणार: सामंत

करोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने आता आपल्याला ऑफलाइन परीक्षाकडे वळावे लागणार आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जाईल. अजूनही काही भागात एसटी बंद आहेत. यामुळे एसटीअभावी विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नसतील तर त्यासाठी सुद्धा आम्ही पर्यायी व्यवस्था आम्ही करणार आहोत, मात्र आता कुठल्याही स्थितीत ऑफलाइन परीक्षा सुरूच कराव्या लागणार आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्र …

Read More »

ऑफलाइन शाळा सुरु करण्यास परवानगी, जाणून घ्या नवी नियमावली

Offline School : करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार ४ मार्चपासून राज्यातील सर्व शाळा ऑफलाइन माध्यमातून सुरु केल्या जाणार आहेत. यासोबतच पूर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी शाळांना देखील ऑफलाइन वर्ग सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ग्रामीण भागातील शाळांचे ऑफलाइन वर्ग सुरु करण्यात परवानगी देण्यात आली होती. यावेळी …

Read More »

IGNOU जानेवारी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ

IGNOU January Registration 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (IGNOU) जानेवारी सत्र २०२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाने नोंदणीची अंतिम मुदत ५ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इग्नूमध्ये ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) प्रोग्राममध्ये नावनोंदणी करू इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करु शकतात. इग्नूने ट्विटरवर जानेवारीमधील प्रवेशाच्या (IGNOU January Registration) सुधारित तारखांची माहिती दिली …

Read More »

जेईई मेन आणि बोर्डाच्या परीक्षा क्लॅश, विद्यार्थ्यांकडून तारखा पुढे ढकलण्याची मागणी

Exams Clash: जेईई मेन्स (JEE Mains 2022) परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ३१ मार्च २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. जेईई मेन्स परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची परीक्षा एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मेमध्ये होणार आहे. दुसरीकडे सीबीएसई बोर्डाची (CBSE Board Exsms) टर्म २ ची परीक्षा देखील एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. यासोबतच राज्य …

Read More »

SIDBI Recruitment 2022: सिडबी बँकेत १०० सहाय्यक व्यवस्थापकांची भरती

SIDBI Recruitment 2022: SIDBI मध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी इच्छुकांसाठी नोकरीच्या बातम्या. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ने सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या SIDBI असिस्टंट मॅनेजर रिक्रूटमेंट 2022 च्या जाहिरातीनुसार, सामान्य प्रवाहातील ग्रेड A च्या या पदांसाठी नियमितपणे भरती केली जाणार आहे. SIDBI ने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी विविध श्रेणींसह एकूण १०० …

Read More »

NEP: दहावीच्या अभ्यासक्रमात आर्ट्सचा समावेश? जाणून घ्या अपडेट

Art education from SSC: दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये आर्ट्स विषयाचा समावेश होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने यासंदर्भातील संकेत दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, नाटक, नृत्य आणि संगीताशी जोडण्यासाठी संसदीय समितीने केंद्र सरकारला अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखालील शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा या विषयावरील संसदीय स्थायी समितीने परफॉर्मिंग आणि ललित कलांचे शिक्षण सुधारण्यासाठी अनेक …

Read More »

महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण होणार स्वस्त, विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची गरज नाही

Maharashtra Medical education: भारतातील वैद्यकीय शिक्षण (India Medical Education) परवडू न शकल्याने विद्यार्थी परदेशाचा (foregn Education) मार्ग स्वीकारतात. युक्रेन युद्धाच (Ukrain war) भारतीय विद्यार्थी अडकल्यानंतर (indian Student in Ukrain) या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, देशामध्येच विद्यार्थ्यांना परवडेल अशा शुल्कात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता आल्यास ते देशाबाहेर जाणार नाहीत असा निष्कर्ष यातून काढण्यात आला. महाराष्ट्र सरकारकडून यासंदर्भात सकारात्मक पाऊल …

Read More »

Ukrain मध्ये MBBS करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Ukrain War: युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ७ हजार भारतीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या पण त्याआधीच रशियन सैन्याने हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी भारतात परतू लागले आहेत. अशा स्थितीत मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात असल्याचे …

Read More »

मुंबईतल्या शाळा गजबजल्या; १०० टक्के उपस्थितीनिशी वर्ग सुरू

शाळेच्या सर्व तासिकांचं पूर्ण भरलेलं दप्तर, सोबत खाऊचा डबा असा सर्व जामानिमा घेऊन बुधवारपासून मुंबईतल्या शाळांमधील (Schools Reopened in Mumbai) विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले. बुधवार २ मार्चपासून शाळा पूर्णवेळ (Offline Schools) आणि पूर्ण १०० टक्के उपस्थितीत भरणार असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, मुंबईतल्या केजी ते दहावीपासूनच्या सर्व माध्यमाच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. त्यामुळे …

Read More »

NEET MDS 2022: नीट एमडीएस परीक्षेची सुधारित तारीख जाहीर

NEET MDS 2022: नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल साइंसेज (NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (NEET-MDS) २०२२ परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. पेपर २ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. अर्ज प्रक्रिया २१ मार्च ते ३० मार्च पर्यंत सुरू राहील. जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते NEET MDS …

Read More »

SSC Job: बारावी उत्तीर्णांना ९२ हजारपर्यंत पगार घेण्याची संधी, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

SSC CHSL Recruitment 2022: भारत सरकार (Government of India) मध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शने (staff selection) एसएससी सीएचएसएल भरती २०२२ (SSC CHSL Recruitment 2022) एलडीसी (LDC), जेएसए (JSA), पीए (PA), एसए (SA) आणि डिईओ (DEO) ही पदे भरली जाणार आहे. या पदासाठी ७ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी (SSC CHSL Recruitment 2022) …

Read More »

जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर, आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु

JEE Main 2022 exam: जेईई मेन २०२२ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार एनटीए जेईई मेन २०२२ एप्रिल आणि मे या दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन २०२२ फेज १ ही १६ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित केली …

Read More »

प्ले ग्रुप, केजी प्रवेशांसाठी कमाल वयोमर्यादा निश्चित

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील पूर्व प्राथमिक व प्राथमिक प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा (Age Limit Of Nursery Kg School Admissions) निश्चित करण्यात आली आहे. नर्सरी (प्ले ग्रुप), ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली अशा चार इयत्तांसाठी वयाची कमाल मर्यादा घालण्यात आली असून, या इयत्तांसाठी जास्तीत जास्त किती वय असावे, हे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी कमाल वयाची मर्यादा …

Read More »

NIOS परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दहावी, बारावीच्या परीक्षा कधी?..जाणून घ्या

NNIOS Board Exams 2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in आणि sdmis.nios.ac.in वर परीक्षेच्या तारखा पाहता येणार आहेत. अधिकृत वेळापत्रकानुसार, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांच्या परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई किंवा एनआयओएसच्या …

Read More »

AISSEE Result 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AISSEE Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) २८ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामचा (AISSEE Sainik School Result 2022) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर पाहता येणार आहे. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षांचा हा निकाल आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉगिन करुन AISSEE …

Read More »

JEE Main 2022 Eligibility Criteria: जेईई मेन परीक्षेचे पात्रता निकष कोणते? जाणून घ्या…

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA)जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मेन २०२२ (JEE Main 2022) साठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in अपडेट केली आहे. या परीक्षेसाठी पात्रता निकषही एनटीएने जारी केले आहेत. जेईई मेन परीक्षा एप्रिल मध्ये आयोजित होणार आहे. अधिकृत वेबसाइट सुरू झाल्यानंतर नोटिफिकेशनन जारी होईल आणि त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू होतील.यंदा ही परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन २०२२ पात्रता निकषांनुसार, …

Read More »

जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात होणार, एनटीए केले स्पष्ट

JEE Main 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने १ मार्च २०२२ रोजी मोठी घोषणा केली. त्यानुसार इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षेत त्यांचे गुण सुधारण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. जर उमेदवार पहिल्या प्रयत्नात त्यांचे सर्वोत्तम देऊ शकले नसतील तर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना चांगली तयारी करता येणार आहे. …तर दुसरी …

Read More »

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा देताय? महत्वाचे नोटिफिकेशन जाणून घ्या

UPSC Civil Services exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Central Public Service Commission, UPSC) पूर्व परीक्षा २०२२ साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. याद्वारे यूपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील माहिती आयोगाने दिली आहे. आयएएस परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट – upc.gov.in वर अधिक तपशील मिळू शकणार आहे.भारतीय वन सेवा प्राथमिक परीक्षा (IFS), आयएएस (IAS) पूर्व परीक्षा २०२२ (UPSC Pre Exam)५ …

Read More »

RTE Admission 2022: आरटीई प्रवेशांसाठी मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणेशिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी पालकांना अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अद्याप आरटीई प्रवेशांसाठी अर्ज करू न शकलेले पालक आता १० मार्च पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. मुदतवाढीसंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे. या परिपत्रकाद्वारे पालकांना आता २८ फेब्रुवारी ऐवजी १० मार्चपर्यंत प्रवेशांसाठी अर्ज करता येणार …

Read More »