जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर, आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु

JEE Main 2022 exam: जेईई मेन २०२२ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जेईई मेन २०२२ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार एनटीए जेईई मेन २०२२ एप्रिल आणि मे या दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन २०२२ फेज १ ही १६ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल तर जेईई मेन २०२२ फेज ही २४ ते २९ मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

जेईई मेन परीक्षा २०२२ च्या वेळापत्रकासोबतच एनटीएने जेईई मेन २०२२ ची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरु केली आहे. जेईई मेन २०२२ परीक्षेच्या एक किंवा सर्व सत्रांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे.

अधिकृत नोटिफिकेशननुसार, एनटीए जेईई मेन्स २०२२ (NTA JEE Mains 2022) फक्त दोनदा घेण्यात येणार आहे. एनटीए जेईई मुख्य परीक्षा २०२२ मध्ये बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीपूर्वी जेईई अर्ज फॉर्म २०२२ सबमिट करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट; परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत करता येणार परीक्षा अर्ज

JEE Main 2022 Eligibility Criteria: जेईई मेन परीक्षेचे पात्रता निकष कोणते? जाणून घ्या…

जेईई मुख्य परीक्षा २०२२ दोन टप्प्यात होणार, एनटीए केले स्पष्ट
विद्यार्थ्यांना एनटीए जेईई मेन वेबसाइट – jeemain.nta.nic.in २०२२ वर जेईई मुख्य २०२२ चे माहितीपत्रक देखील तपासता येणार आहे. जेईई मेन २०२२ ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.

महत्वाच्या तारखा
जेईई मेन २०२२ नोंदणीची सुरुवात – १ मार्च २०२२
जेईई मेन २०२२ साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२२
जेईई मुख्य परीक्षेची तारीख २०२२ सत्र 1१– १६,१७,१८,१९, २० आणि २१ एप्रिल २०२२
सत्र २ – २४,२५,२६,२७,२८ आणि २९ मे २०२२

Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
Bank Job 2022: बँक ऑफ बडोदामध्ये भरती, मुंबईत नोकरीची संधी
जेईई मेन परीक्षा पॅटर्न
जेईई मेन २०२२ च्या पेपर पॅटर्नबद्दल खूप चर्चा होते आहे, शक्यता वर्तवण्यात येत आहेत. असे मानले जाते आहे की यंदा पेपर पॅटर्नमध्ये बदल होणे शक्य नाही. यावर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे, पण तरीही जेईई मेन चा पॅटर्न बदलण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा :  बॅंक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केटमध्ये भरती, येथे करा अर्ज

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …