IGNOU जानेवारी सत्राच्या नोंदणीला मुदतवाढ

IGNOU January Registration 2022: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे (IGNOU) जानेवारी सत्र २०२२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाने नोंदणीची अंतिम मुदत ५ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इग्नूमध्ये ओपन अँड डिस्टन्स मोड (ODL) प्रोग्राममध्ये नावनोंदणी करू इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन स्वतःची नोंदणी करु शकतात.

इग्नूने ट्विटरवर जानेवारीमधील प्रवेशाच्या (IGNOU January Registration) सुधारित तारखांची माहिती दिली आहे. इग्नूने ट्विट केले की जानेवारी २०२२ सत्रासाठी नवीन प्रवेश आणि नोंदणीसाठी (Online and ODL mode) अंतिम तारीख ५ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

इग्नूने जारी केलेल्या निर्देशानुसार, विद्यार्थ्यांनी सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यानंतर नोंदणी करावी. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट onlinerr.ignou.ac.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार

TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या
दरम्यान, इग्नूने १८ जानेवारी २०२२ रोजी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तरुणांसाठी कामाच्या संधी निर्माण करणे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण फ्रेमवर्क मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :  करोनामुळे UPSC देऊ न शकलेल्यांच्या फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट

IGNOU January Registration: असा करा अर्ज
उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा.
‘Application Process’ या लिंकवर क्लिक करा.
क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा.
अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा.
अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउनलोड करा.
पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
Bank Job 2022: बँक ऑफ बडोदामध्ये भरती, मुंबईत नोकरीची संधी
IGNOU तर्फे २०० हून अधिक ओडीएल अभ्यासक्रम आणि १६ ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविले जातात. कार्यक्रमांची सविस्तर यादी आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ओडीएल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या एससी/एसटी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येते. इग्नूने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तरुणांसाठी कामाच्या संधी निर्माण करणे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण फ्रेमवर्क मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. यासोबतच जवळपास ३२ NSTIs, ३००० ITIs, ५०० PMKKs आणि ३०० JSSs नोंदणी, परीक्षा आणि कार्य केंद्रे म्हणून इग्नूशी जोडले जाणार आहेत.

हेही वाचा :  IGNOU पीएचडी प्रवेश परीक्षा उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाऊनलोड

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …