मुंबईतल्या शाळा गजबजल्या; १०० टक्के उपस्थितीनिशी वर्ग सुरू

शाळेच्या सर्व तासिकांचं पूर्ण भरलेलं दप्तर, सोबत खाऊचा डबा असा सर्व जामानिमा घेऊन बुधवारपासून मुंबईतल्या शाळांमधील (Schools Reopened in Mumbai) विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले. बुधवार २ मार्चपासून शाळा पूर्णवेळ (Offline Schools) आणि पूर्ण १०० टक्के उपस्थितीत भरणार असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, मुंबईतल्या केजी ते दहावीपासूनच्या सर्व माध्यमाच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. त्यामुळे आता शिक्षकांनाही ऑफलाइन आणि ऑनलाइन अशी शिकवण्याची कसरत करावी लागणार नाही.

मुंबईत करोना संसर्गामुळे शाळा नियमितपणे आणि प्रत्यक्ष सुरू होण्यात वारंवार व्यत्यय येत गेले. अखेरीस करोना नियंत्रणात आल्यानंतर मुंबईतील पालिकेसह अन्य सर्व मंडळाच्या पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शाळा, ज्युनिअर कॉलेजे मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारपासून शाळा पूर्ण उपस्थितीनिशी केवळ ऑफलाइन पद्धतीनेच सुरू झाल्या. मित्र-मैत्रिणींची भेट झाल्यामुळे, शिक्षकांशी स्क्रीनवर नव्हे तर प्रत्यक्ष बोलता येत असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदालाही पारावार उरला नव्हता. कोणत्या नियमांचे या ऑफलाइन शाळांदरम्यान पालन करायचे आहे, ते जाणून घ्या…

काय आहेत नियम?

– विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासले जाईल.

हेही वाचा :  ऑफलाइन शाळा सुरु करण्यास परवानगी, जाणून घ्या नवी नियमावली

– शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आवश्यक.

– शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण अनिर्वाय.

– करोनापूर्व वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गांच्या तासांमध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती, सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेतले जावेत.

– वर्ग, स्कूलबस/स्कूल व्हॅनसह शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक. परंतु, मैदानी खेळ/कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही.

– शाळांमध्ये पूर्वीप्रमाणे मधली सुट्टी देण्यात येणार आहे.

– तसेच मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास अनुमती.

– करोनासदृश लक्षणे असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये.

– विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच शाळेत ये-जा करण्यासाठी बेस्ट सेवा, खासगी बसच्या प्रवासास अनुमती.

SSC HSC Exam 2022: दहावी, बारावी परीक्षेपूर्वी केंद्रसंचालकांना सूचना

शिक्षकांनी शनिवार, रविवारही वर्ग घ्यावेत; पवारांनी घेतली जि.प. शिक्षकांची शाळा
SSC HSC Exam 2022: खुशखबर! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुण मिळणार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …