Tag Archives: Russia Ukraine war

युक्रेनमधून परतलेल्यांसाठी लवकरच नवे धोरण; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची ग्वाही

मुंबई: युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी लवकरच नवे धोरण निश्चित केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.या विद्यार्थ्यांसाठी कुलगुरूंच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे देशमुख यांनी बुधवारी जाहीर केले. युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये …

Read More »

Petrol- Diesel Price Today: पेट्रोल ११० तर डीझेल ९५ रुपयांपेक्षाही महाग; जाणून घ्या आजचा दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक …

Read More »

Russia ukraine युद्धाचा थेट तुमच्या खिशावर काय होणार परिणाम, पाहा काय-काय महागणार

Russia ukraine war Impact : युद्धाचा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होत असतो. युद्धामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे जगाच्या विकसित अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत हे देश मागे पडले. रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही असाच परिणाम आहे. २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेले युक्रेन-रशिया युद्ध अजूनही सुरूच आहे. या लढ्याचा परिणाम केवळ या दोन देशांवरच नाही तर जगभर दिसून येईल. महागाई वाढेल आणि अनेक गोष्टी सर्वसामान्यांच्या …

Read More »

पाकिस्तानी मुलीने पीएम मोदींचे का मानले ‘आभार’… पाहा काय आहे कारण?

कीव्ह : पाकिस्तान (Pakistan) भारताविषयी कितीही द्वेष पसरवत असला तरी भारताने मात्र कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. याचं ताजं उदाहरण युद्धभूमी युक्रेनमध्ये (Ukraine) पाहिला मिळालं आहे. कीव्हमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी मुलीला भारतीय दुतावासाने (Indian Embassy in Kyiv) तिथून बाहेर पडण्यास मदत केली. खुद्द पाकिस्तानी तरुणीने व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय दूतावास आणि पंतप्रधानांचे मानले …

Read More »

रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

मास्को :  Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे. रशियासमोर (Russia) युक्रेनने गुडघे टेकले, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रशिया गरम, झेलेन्स्की नरम, असे दिसून येत आहे. याचा परिमाण हा झेलेन्स्की यांनी युद्धाच्या कारणालाच तिलांजली …

Read More »

पुतीन यांनी डिनर दरम्यान असं काय केलं, ज्यामुळे घाबरू लागली मॉडेल

मुंबई :  जगभरात सध्या चर्चा आहे ती फक्त रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाची. एका लाईव्ह कार्यक्रमात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये ‘स्पेशल मिलिटरी ऑपरेशन’ ची घोषणा केली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. एकेकाळी सिक्रेट एजंट असलेले पुतीन यांच खासगी आयुष्य देखील खूप सिक्रेट आहे. पुतीन यांनी आपल्या मुली आणि संपूर्ण कुटुंब हे कायमच गुलदस्त्यात ठेवले.  …

Read More »

युक्रेन बॅकफूटवर; नाटोच्या सदस्यत्वाचा आग्रह सोडणार, रशियाची मागणी झेलेन्स्कींना मान्य

जो देश गुडघ्यावर बसून काहीतरी भीक मागत आहे, अशा देशाचा मी अध्यक्ष म्हणवून घेऊ इच्छित नाही, असं झेलेन्स्की म्हणाले. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांत युद्धावर तोडगा काढण्यासाठी चर्चा देखील होत आहे. तिसऱ्या फेरीच्या बैठकीनंतर युक्रेनने सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलं होतं, तर रशिया नाखुश असल्याचं दिसून आलं होतं. दरम्यान, ‘आमच्या मागण्या मान्य झाल्यास आम्ही लगेच युद्ध थांबवू,’ …

Read More »

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं रशियाला जाहीर आव्हान, सोशल मीडियावर शेअर केलं लोकेशन; म्हणाले “मी कोणाला…”

देशभक्तीपर युद्ध जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा निर्धार रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमण केलं असून त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. यादरम्यान रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याचाही दावा आहे. इतकंच नाही तर जर रशियाने केलेल्या हल्ल्यात राष्ट्राध्यक्ष मारले गेले तर पुढील योजना काय असेल याची आखणी युक्रेनकडून करण्यात आली आहे. युक्रेनच्या दाव्यानुसार, झेलेन्स्की …

Read More »

Russia Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शेकडो लोक Airbnb बुक करत आहेत, कारण…

युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मदतीसाठी …

Read More »

नाटोकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा, न्युयॉर्क टाइम्सचा दावा

मॉस्को :  Russia Ukraine War : मास्को : नाटोने युद्धात प्रत्यक्ष उतरण्यास नकार दिला असला तरी युक्रेनला शस्त्र पुरवठा मात्र केला जातोय. गेल्या एका आठवड्यात युक्रेनला नाटो आणि अमेरिकेकडून जवळपास 17 हजार अँटी टँक शस्त्र पुरवण्यात आली आहेत. असा दावा न्युयॉर्क टाईम्सने केलाय. यात जॅव्हेलीन मिसाईल्सचा समावेश आहे. ही मिसाईल्स पोलंड-रोमानियाच्या सीमेवर उतरवण्यात आली होती. (NATO supplies arms to Ukraine, …

Read More »

मोठी बातमी : रशियाने जाहीर केली शत्रू देशांची यादी, यूक्रेनसह 31 देशांचा समावेश

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शत्रू देशांच्या यादीला मंजुरी दिली आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसह 31 देशांचा समावेश करण्यात आला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने हा दावा केलाय. रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चीनचे राज्य माध्यम CGTN ने आपल्या अहवालात केला आहे. या यादीत अमेरिका, …

Read More »

Russia-Ukraine War : रशियाबाबत ब्रिटेनच्या उपपंतप्रधानांनी भारताकडे मागितली ही मदत

लंडन : युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहे. युक्रेन-रशिया युद्धावर (Russia Ukraine War) संयुक्त राष्ट्रांत (UN) नियमित चर्चा आणि मतदान होत असून युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांकडून रशियावर दबाव आणला जातोय. दुसरीकडे रशियाच्या जवळच्या मानल्या जाणार्‍या भारत आणि चीनने आतापर्यंत रशियाबाबतच्या कोणत्याही मतदानात भाग घेतलेला नाही आणि रशियाच्या हल्ल्याचा निषेधही केलेला नाही. डॉमिनिक राब म्हणाले की, “चीन सदस्य आहे… …

Read More »

Ukraine Return Students: युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात

रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमधून जीव वाचवून भारतात परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Plea in Supreme Court on Ukraine Return Medical Students) दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये योग्य भारतीय किंवा परदेशी पदवी कार्यक्रमांतर्गत सामावून घेण्यासाठी केंद्र सरकार आणि इतर संबंधित घटकांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र …

Read More »

Russia Ukraine War : रशियाने 8 क्रूझ मिसाईल डागत उद्धवस्त केलं यूक्रेनचं एअरपोर्ट

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध रविवारी 11 व्या दिवशीही सुरूच आहे. रशियाने रविवारी युक्रेनच्या विनितसिया विमानतळावर कालिब्र क्रूझ मिसाईलने हल्ला करून उद्ध्वस्त केले. रशियाने विमानतळावर 8 क्रूझ क्षेपणास्त्रे डागली यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. झेलेन्स्की म्हणाले, ‘रशियाने 8 क्रूझ क्षेपणास्त्रे डागून विनितसिया विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. त्याने यूक्रेनच्या लष्करी हवाई तळावरही हल्ला …

Read More »

Russia Ukraine War : युक्रेनमधून विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार गंभीर नाही – पृथ्वीराज चव्हाण

“पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणं व उद्घटानं करत फिरत असल्याची बाब गंभीर”, असंही म्हणाले आहेत. “युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या युध्दाच्या अनुषंगाने युक्रेनमध्ये अजूनही अडकलेल्या भारतातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांना, मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटानं करीत फिरत असल्याची बाब गंभीर आहे.” अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज …

Read More »

रशिया-युक्रेनच्या युद्धात केरळमधील कॅफेची चर्चा, युद्धाला विरोध करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

केरळमधील एका कॅफेने युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेत मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा दिवस होऊन गेले आहेत. रशियातर्फे युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केला जातोय. याच भूमिकेमुळे रशियावर जगभरातून टीका केली जातेय. अमेरिका तसेच नाटोमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. केरळमधील एका कॅफेनेदेखील युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका …

Read More »

“नेहरुंच्या धोरणानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाचवले”, संजय राऊतांचं युक्रेनमधील परिस्थितीवरून टीकास्त्र!

संजय राऊत म्हणतात, “…तेव्हा विदेश मंत्रालय नेमकं काय करत होतं? विदेश मंत्रालयाच्या डोक्यावर आता काळी टोपी आणि अंधभक्तीचा प्रभाव दिसत आहे” रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र, त्याआधीपासूनच तिथल्या भारतीयांचं काय होणार? ते सुरक्षित मायदेशी पोहोचणार का? अशी चर्चा आणि संबंधित भारतीयांच्या कुटुंबियांना चिंता लागलेली होती. यासंदर्भात अनेक प्रयत्नांनंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय, विशेषत: तिथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भारतात …

Read More »

Russia-Ukraine War : युक्रेनमधून आतापर्यंत १३ हजार ३०० भारतीय परतले ; २४ तासांत १५ विमानं दाखल

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली माहिती ; पुढील २४ तासांसाठी १३ विमानं नियोजित असल्याचंही सांगितलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणण्याचे कार्य सुरूच आहे. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० नागरिक भारतात सुखरूप परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये आणखी १५ विमानांद्वारे २ हजार ९०० जण आले असून, पुढील २४ तासांसाठी १३ विमाने नियोजित आहेत. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली …

Read More »

Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध Apple पासून Google पर्यंत या कंपन्यांनी उचलले मोठे पाऊल

Russia-Ukraine War : यूक्रेनवर रशियाकडून हल्ल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण आहे. रशियावर अनेक देश यामुळे नाराज आहेत. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये अनेक कंपन्यांचा देखील समावेश आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्या जसे की Google, Apple, Microsoft आणि SpaceX पासून ते Twitter, Netflix आणि Meta यांनी देखील रशियावर निर्बंध लादले आहेत. Russia-Ukraine War: रशिया विरुद्ध कोणत्या कंपनीने काय पाऊलं उचलली …

Read More »

 Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग 

Russia Ukraine War : अभिनेत्री उर्वशी रौतेलाने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती एका नव्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. परंतु, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उर्वशीच्या चित्रपटाचे शुटिंग थांबले आहे. युक्रेनमधील शूटिंगचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपूर्वी युक्रेनमधील कीव्ह आणि ओडेसा येथे तिच्या आगामी तमिळ चित्रपटाचे …

Read More »