Russia Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शेकडो लोक Airbnb बुक करत आहेत, कारण…


युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे.

युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनियन नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मदतीसाठी जगभरातील नेटकरी पुढे आले आहेत. एअरबीएबीच्या माध्यमातून युक्रेनमधील लोकांना मदत केली जात आहे. युद्धग्रस्त भागात शेकडो लोकांनी एअरबीएनबीच्या माध्यमातून घरं भाड्याने घेत आहेत. प्रत्यक्ष तिथे न राहता जागेचं भाडं दिलं जात आहे. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनियन लोक त्यांच्या मायदेशातून पळून जात असताना जगभरातील हजारो लोकांना त्यांना मदत करण्याचा अनोखा मार्ग सापडला आहे. युक्रेनमध्ये एअरबीएनबी भाड्याने बुक करून लोक आर्थिक गरज असलेल्या युक्रेनियन लोकांना थेट पैसे पाठवत आहेत. दुसरीकडे, एअरबीएनबीच्या सीईओने जाहीर केले की, युक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनी रशिया आणि बेलारूसमधील सर्व सुविधा निलंबित करत आहे.

एका ट्विटर युजर्सने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर युद्धग्रस्त देशातील रहिवाशांना मदत करण्यासाठी घर भाड्याने देणारी कंपनी Airbnb वापरण्याची कल्पना लोकप्रिय झाली. वापरकर्त्याने युक्रेनियन एअरबीएनबी होस्ट्सच्या कृतज्ञ संदेशांचे स्नॅपशॉट देखील शेअर केले आहेत. ज्या लोकांनी मालमत्ता बुक केली होती अशा लोकांना पाठवले आहेत. “मी Airbnb वर भाड्याने खोल्या बुक करून युक्रेनला मदत करण्याची कल्पना शेअर केली. २४ तासांनंतर शेकडो लोकांनी युक्रेनमध्ये एअरबीएनबी माध्यमातून बुकींग केली. युद्धग्रस्त भागातील लोकांना तत्काळ आर्थिक मदत पाठवण्याचा मार्ग मिळाला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे,” ट्विटर युजर्सने लिहिले.

हेही वाचा :  Sushma Andhare : 'रामभाऊ, आमचा नाद नका करु, आम्ही माणूस आऊट करतो' सुषमा अंधारे यांचा इशारा

एअरबीएनबीचे सीईओ, ब्रायन चेस्की यांनी सांगितले की, २ मार्च ते ३ मार्च दरम्यान जगभरातील लोकांकडून एअरबीएनबीवर ६१ हजारांहून अधिक जणांनी बुकिंग केलं. बुकिंगच्या माध्यमातून १.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स थेट गरजू युक्रेनियन लोकांपर्यंत पोहोचले आहेत.

एअरबीएनबीने देखील पुष्टी केली आहे की, ते युक्रेनमधील सर्व सेवा शुल्क माफ करत आहेत. “संकटाच्या या क्षणी समुदायाच्या प्रेरणादायी उदारतेमुळे आम्ही खूप नम्र झालो आहोत,” असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा :  Russia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण?

युटाहमधील एअरबीएनबी होस्ट सारा ब्राउन, युक्रेनमध्ये एअरबीएनबी मालमत्ता बुक करणाऱ्या शेकडो अमेरिकन लोकांमध्ये होती. “आत्ता पैसे देणे आणि ते थेट व्यक्तीला देणे हा एक मार्ग आहे,” असं तिने सांगितले. तर बुकिंग करत असताना, सुश्री ब्राउनने युक्रेनमधील तिच्या होस्टला एक संदेश पाठवला आणि स्पष्ट केले की, “वैयक्तिकरित्या येणार नाही परंतु काही प्रेम पाठवू इच्छित आहे.”

“तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि तुम्ही आमच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप खूप धन्यवाद,” असं उत्तर होस्टने उत्तर दिले. “आम्हाला या कठीण दिवसांमध्ये टिकून राहण्यास मदत होते. यामुळे आम्हाला शक्ती आणि प्रेरणा मिळते. आम्ही विजयावर विश्वास ठेवत कीवमध्ये राहात आहोत.” इतर ट्वीटर युजर्सने देखील एअरबीएनबी होस्टकडून मिळालेले संदेश शेअर केले आहेत.

हेही वाचा :  26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच …

Viral Video : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

Pune Job News : सरकारी नोकरीवर (Government Jobs) असणाऱ्या अनेकांचाच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना हेवा …