मोठी बातमी : रशियाने जाहीर केली शत्रू देशांची यादी, यूक्रेनसह 31 देशांचा समावेश

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या शत्रू देशांच्या यादीला मंजुरी दिली आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसह 31 देशांचा समावेश करण्यात आला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने हा दावा केलाय.

रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चीनचे राज्य माध्यम CGTN ने आपल्या अहवालात केला आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जपान आणि युरोपीय संघातील सदस्य देशांची नावे आहेत. युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 देश आहेत.

युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर युरोपमधील देशांकडून दबाव आणला जात आहे. अमेरिकेसह पाश्चात्य देश सतत त्यांच्यावर टीका करत असून निर्बंध लादले जात आहेत. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याच्या उद्देशाने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत.

शत्रूंच्या यादीत या देशांची नावे का?

1. अमेरिका : अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याशिवाय रशियाच्या 4 बँका आणि राज्य ऊर्जा कंपनी गॅझप्रॉमवरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्दही बंद केली आहे. यासोबतच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पाठवली असून आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे.

हेही वाचा :  Viral Video : शहानपणा नडला! त्याने मगरीच्या तोंडात हात घातला, पुढे काय झालं पाहा

2. ब्रिटन : रशियाच्या सरकारी मालकीच्या एअरलाइनने एरोलॉफ्टसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ब्रिटनने 5 रशियन बँकांवर बंदी घातली आहे. यासोबतच पुतिन यांची संपत्ती जप्त करून त्यांची खाती गोठवण्याचेही सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर रशियाच्या अब्जाधीशांनीही खासगी जेट विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिकेप्रमाणेच ब्रिटननेही युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे.

3. युक्रेन: रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तर युक्रेनला वेगळा देश मानत नाही, असेही म्हटले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने आपले ५०० सैनिक गमावल्याचे मान्य केले आहे.

4. जपान: रशियाविरुद्ध लढण्यासाठी जपान युक्रेनला शस्त्रे पुरवत आहे. बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेटसह अनेक संरक्षण उपकरणे जपानने युक्रेनला पाठवली आहेत. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की ते बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, तंबू, जनरेटर, फूड पॅकेट, हिवाळी कपडे आणि औषधे युक्रेनला पाठवत आहेत. याशिवाय जपानने 4 रशियन बँकांची मालमत्ता जप्त करण्याची घोषणा केली आहे.

5. युरोपियन युनियन: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल युरोपियन युनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियनमध्ये 27 देश आहेत. युरोपियन युनियनच्या सर्व सदस्यांनी त्यांची हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केली आहे. याशिवाय युरोपियन युनियनमध्ये उपस्थित असलेल्या रशियन अब्जाधीशांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत. एवढेच नाही तर युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट असलेले सर्व देश युक्रेनला केवळ आर्थिकच नव्हे तर लष्करीही मदत करत आहेत.

हेही वाचा :  8,891 फूटांचे अंतर आणि 3 सेकंद...; युक्रेनच्या स्नायपरने रशियन सैनिकाला ठार करत केला विक्रम

युरोपियन युनियनचे सदस्य देश – ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, चेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आयर्लंड, इटली, लॅटव्हिया, लिथुनिया, लक्झमबर्ग, माल्टा, नेदरलँडस, पोलंड, पोर्तुगाल, रोमानिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रातील ‘या’ गावात आहे भगवान श्रीकृष्ण यांचे सासर; एका शापामुळं झालं होतं उद्ध्वस्त

Amravati:  लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. राज्यात दुसर्या टप्प्यातील मतदान असताना अमरावती …

‘संजय राऊत ठाकरेंच्या घरी लादी पुसतात’, कार्यकर्त्याचं वाक्य ऐकताच फडणवीस म्हणाले ‘हा बोलतोय ते…’

LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून …