रशिया गरम, झेलेन्स्की नरम; युक्रेनची युद्धाच्या मूळ कारणाला तिलांजली

मास्को :  Russia Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की ( Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी आता नरम भूमिका घेत युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाच्या मूळ कारणालाच तिलांजली दिली आहे. रशियासमोर (Russia) युक्रेनने गुडघे टेकले, असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रशिया गरम, झेलेन्स्की नरम, असे दिसून येत आहे. याचा परिमाण हा झेलेन्स्की यांनी युद्धाच्या कारणालाच तिलांजली दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, झेलेन्स्की यांनी नाटोवर संताप व्यक्त केला आहे. (Ukraine’s President Volodymyr Zelensky is now taking a softer line and working to end the war)

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की हे युद्ध सुरू झाल्यापासून झुकेगा नहीची आक्रमक भूमिका घेत होते. रशियाशी युद्ध लांबवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र आता युद्धाला जवळपास 14 दिवस झाल्यावर झेलेन्स्की यांची भूमिका नरम पडल्याचे दिसत आहे. झेलेन्स्की यांनी युद्धाचं मूळ कारण ठरलेल्या नाटो प्रवेशातला रस काढून घेतला आहे. एवढंच नाही तर नाटोवरच त्यांनी कडाडून टीकाही केली आहे. त्यामुळे रशियासमोर अखेर झेलेन्स्की येत्या काही दिवसांत गुडघे टेकून युद्ध संपवतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

हेही वाचा :  जो बायडन म्हणाले पुतीन 'वॉर क्रिमिनल'; रशियाचा संताप, आठवण करुन देत म्हणाले "जगभरात बॉम्ब टाकून..." | Ukraine Crisis Russia Slams Biden War Criminal Comment On Putin sgy 87

नाटो युक्रेनला सहभागी करून घेण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यावर आम्ही हा विषयच सोडून दिला आहे. भीक मागून, गुडघे टेकून काही मिळवणाऱ्या देशाचा मी अध्यक्ष नाही. त्यामुळे नाटोचे सदस्यत्व हा विषय आम्ही केव्हाच सोडून दिला आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

नाटोने युक्रेनला आधी सदस्यत्वाचं गाजर दाखवलं पण प्रत्यक्षात सदस्यत्व दिले नाही. एवढेच नाही तर नाटो मदतीलाही आले नाही. त्यामुळे नाटोवर झेलेन्स्की यांनी घणाघाती टीका केलीय. नाटो वादग्रस्त मुद्द्यांना घाबरते. रशियाशी दोन हात करण्यासही नाटो संघटना घाबरते अशी टीका झेलेन्स्की यांनी केली आहे.

डोनबासमधील डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन वादग्रस्त प्रदेशांना पुतीन यांनी स्वतंत्र देशाचा दर्जा दिला होता. ही सरळ सरळ युक्रेनची फाळणी होती. या प्रदेशांना रशिया सोडून कोणाचीच मान्यता नव्हती. मात्र आता या दोन प्रदेशांवर ही तडजोड करण्यास झेलेन्स्की यांनी समहती दर्शवलीय. 

डोनेट्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रदेशाना कोणीच मान्यता दिलेली नाही. स्वातंत्र्यानंतर हे दोन देश कसे राहतील याचा विचार व्हायला हवा, त्यासाठी चर्चेतूनच तडजोड साध्य करता येईल असं झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा :  विश्लेषण : युक्रेनमध्ये एवढे भारतीय विद्यार्थी MBBS च्या अभ्यासक्रमासाठी का जातात?

रशियाने शांतीचर्चेच्या दुसऱ्या फेरीत संपूर्ण शरणागती, डोनबासमधील दोन देशांना मान्यता आणि क्रायमियावरील रशियन प्रभुत्वाला मान्यता या अटी युक्रेनसमोर ठेवल्या होत्या. त्यातल्या डोनबासमधील अटीबाबत युक्रेनने तडजोडीची तयारी दर्शवलीय. तर युद्धाचं मूळ कारण नाटो सदस्यत्वाचा आग्रहही सोडून दिलाय. याचाच अर्थ आता युद्ध समाप्तीची तयारीच युक्रेनने दर्शवल्याचं स्पष्ट होत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …