Extramarital sex : देशात 10 पैकी 7 विवाहित महिला परपुरुषांसोबत…

Extramarital sex : एका डेटींग अ‍ॅपने नुकतंच एक सर्व्हेक्षण (Gleeden dating app) केलं आहे. ग्लीडन असं या डेटींग अ‍ॅपचं नाव आहे. हे सर्व्हेक्षण लग्न झालेल्या महिला आणि पुरुष (Married men and women) यांचे विवाह्य बाह्य संबंध का असतात, हे जाणून घेण्यासाठी झालं.  याद्वारे डेटिंग अ‍ॅपच्या (Dating app) सहाय्याने भारतातील विवाहित महिला आपल्या पतीची फसवणूक का करतात याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या सर्व्हेक्षणातून (Dating app survey) अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.

या सर्व्हेक्षणामध्ये समावेश असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या उत्तरामध्ये एक उत्तर फार हैराण करणार आहे. यामध्ये दावा करण्यात आला आहे की, 10 मधून 7 महिला त्यांच्या पतीला धोका देतात. धोका देण्यामागील कारण म्हणजे, हे पुरुष घरातील कामात हातभार लावत नाही. एक नजर टाकूया, या अहवालातून काय माहिती समोर आली आहे.

एकट्या भारतात ग्लीडेन अ‍ॅपचे 5 लाखांहून अधिक युझर्स आहे. तर जगभारत जवळपास 5 मिलियन म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिक युझर्स असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे, हे अ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक लोकं हे विवाहित आहेत.

हेही वाचा :  'माझ्या नवऱ्याचं माझ्याच आईसोबत अफेअर होतं, मी दोघांना...' महिलेने सांगितली धक्कादायक घटना

महिलांनी दिली धक्कादायक कारणं

या सर्व्हेक्षणातून समोर आलेल्या रिपोर्टनुसार, भारतात 10 मध्ये 7 महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती आहे. याचा अर्थ लग्नानंतर पतीशिवाय इतर पुरुषांसोबत या महिलांचे संबंध आहे. यामध्ये समावेश असलेल्या काही महिलांच्या म्हणण्याप्रमाणे, लग्नामध्ये आता रस राहिला नाहीये, त्यामुळे बाहेरील पुरुषांशी संबंध ठेवले गेले.

मुंबई, दिल्ली आणि कलकत्ता सारख्या मोठ्या महानगरातील शहरांमध्ये अशा महिला अधिक होत्या, ज्या आपल्या पतीला धोका देत होत्या. काही महिलांचं असं म्हणणं होतं की, त्यांचे पती घरातील कामांमध्ये त्याची मदत करत नाही. त्यामुळे आम्ही वैतागतो आहोत.  

2017 साली हे डेटींग अ‍ॅप भारतात आलं. या कंपनी व्यवस्थापनाच्या दाव्याप्रमाणे, जवळपास 30 टक्के युझर्स महिलांचं वय हे 34-49 इतकं आहे. या वयोगटातील महिला पतीशिवाय इतर पुरुषांसोबत बाहेर संबंध ठेवतात. तर जवळपास 77 टक्के महिलांनी मानलं की, आम्ही आमच्या साथीदाराला धोका दिला कारण आम्हाला लग्नामध्ये रूची वाटत नव्हती.

एकूण पाच लाख युझरपैकी 20 टक्के पुरुष आणि 13 टक्के महिलांनी कबूल केलंय की, ते त्यांच्या पती किंवा पत्नीची फसवणूक करतायत. तर सुमारे 48 टक्के भारतीय महिला विवाहबाह्य संबंधांमध्ये असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचा :  'या राज्यात शांतता सुव्यवस्था....', मराठा मोर्चाचा प्रश्न विचारल्यानंतर CM शिंदेंनी करुन दिली आठवण

(महत्त्वाची टीप- वर दिलेली माहिती ही सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आलेली आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Gold Price Today: ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोने महागले, आज पुन्हा दरात वाढ; 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Silver Price Today in Maharashtra: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कोसळले असले तरी देशातील बाजारपेठेत …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …