Murder Mystery : अनैतिक संबंधात अडसर, ‘दृश्यम’ स्टाईलने काढला पतीचा काटा

Murder Mystery : तुम्ही ‘दृश्यम’ (Drishyam) सिनेमा पाहिला असालच. या सिनेमातली मर्डर मिस्ट्रीची (Murder Mystery) शेवटपर्यंत उकल होत नाही.मात्र सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या एका सीननंतर या घटनेतील हत्येची माहिती प्रेक्षकांना कळते, मात्र पोलिसांना या गुन्ह्याचा छडा लावता येत नाही. आता अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. अनैंतिक संबंधातून ही घटना घडली आहे. हा संपुर्ण घटनाक्रम एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.  

अनैंतिक संबंध 

य़ा घटनेत मृतक चंद्रवीरच्या पत्नीचे शेजारच्याच परपुरूषाशी अनैंतिक संबंध (extramarital affair) होते. त्यामुळे पती चंद्रवीर या दोघांच्या नात्यात अडसर ठरत होता.त्यामुळे चंद्रवीरची पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीला संपण्याचा कट रचला होता. 

हत्येचा घटनाक्रम

पती चंद्रवीरचा काटा काढण्यासाठी चार-पाच दिवसांपुर्वीच तयारी करण्यात आली होती. प्रियकराने 4 दिवसांपुर्वीच घरात 7 फुटांचा खड्डा खणला होता. या खड्ड्यात त्याचा मृतदेह लपवण्याचा त्यांचा मानस होता. प्रियकराने (Boyfriend) त्या रात्री बंदूकीची गोळी चंद्रवीरच्या डोक्यात घातली, त्यानंतर त्याचा मृतदेह खाटेवर ठेवला. तसेच त्याच रक्त घर भर पसरू नये यासाठी एक बादली देखील ठेवली होती. 

हेही वाचा :  मराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे

हत्या केल्यानंतरही हात का कापला? 

पतीची हत्या केल्यानंतर दोघांनी त्याला जमीनीत गाढण्याची तयारी केली.त्यावेळी त्यांची नजर चंद्रवीरच्या हाताच्या कड्यावर गेली. जो पोलिसांना सापडल्यास मोठा पुरावा ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी हा कडा हातातून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत्यूनंतर बॉडी फुगल्यामुळे कडा हाताबाहेर येतच नव्हता. त्यामुळे प्रियकराने त्याच्या हातावर कुल्हाडीने वार करत हात तोडला. त्यानंतर हा हात दुर जाऊन वास न येण्यासाठी केमिकल फॅक्ट्री जवळ फेकला. नंतर दोघांनी मिळून तो मृतदेह त्या खंड्यात पुरला. मृतदेह पुरल्यानंतर या खड्यावर प्लास्टर देखी करण्यात आले होते.
 

पत्नीचा पोलिसांना चकवा

चंद्रवीरच्या हत्येनंतर पोलिसांना तिच्यावर शक येऊ नये, यासाठी ती नेहमी पोलिसांना पतीच्या हत्येविषयी विचारायची. एवढेच नाही तर तिने दिरावर खुन केल्याचा संशल व्यक्त केला होता. जेणेकरून पोलिसांचा तपास दुसरीकडे वळता होईल. 

2021 मध्ये हत्येची फाईल बंद 

2018 ला ही घटना घडली होती. या घटनेत तब्बल 4 वर्ष तपास करून सुद्धा पोलिसांच्या हाती एकही पुरावा लागला नव्हता. त्यामुळे मग पोलिसांनी 2021 ला हत्येची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा :  सरकारी रुग्णालयात गुदमरुन आठ रुग्णांचा मृत्यू; ऑक्सिजनअभावी जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

असा उलगडला हत्येचा कट 

 तब्बल 4 वर्ष या घटनेत पोलिसांना एकही पुरावा मिळाला नव्हता. त्यानंतर हा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. त्यानंतर क्राईम ब्रांचने ही केस पुन्हा रिओपन केली आणि तपास सुरु केला. या तपासात त्यांना हत्येसंबंधी ठोस पुरावे मिळाले. या प्रकरणाबाबत एसपी दीक्षा शर्मा यांनी सांगितले की, मृताच्या मुलीला संशय होता की तिच्या आईनेच शेजाऱ्यांसोबत वडिलांची हत्या केली होती. पण पुराव्याअभावी ती शांत बसली होती. 

याप्रकरणी पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने आई आणि प्रियकर अरुणवर संशय व्यक्त केला. अरुणला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेहाचा सांगाडा खड्ड्यातून जप्त करण्यात आला होता. तसेच हत्येत वापरलेले साहित्यही त्याच्याकडून जप्त केले. या घटनेचा उलगडा होताच संपुर्ण ऱाज्य हादरलं होते. 

दरम्यान ही घटना गाजियाबादच्या सिकरोड गावामध्ये घडली होती. या घटनेची उकल करण्यात पोलिसांना 5 वर्ष लागली. ही घटना ऐकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

धावत्या स्कूल व्हॅनचा मागचा दरवाजा उघडला आणि… काळजचा थरकाप उडवणारा Video

School Van Incident CCTV : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनसाठी (School …

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका …