Tag Archives: mumbai News in Marathi

क्षयरोगबाधित बालकांमध्ये ४४ टक्के वाढ

|| शैलजा तिवले मुंबई : मुंबईत चार वर्षांमध्ये बालकांमधील क्षयरोगाचे प्रमाण वाढले आहे. यात औषधांना दाद देणाऱ्या क्षयरोगासह (डीएस टीबी) औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाचे (ड्रग रेझिस्टंट- डीआर) प्रमाणही वाढत आहे. मागील चार वर्षांत हे प्रमाण सुमारे ४४ टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. घरामध्ये कोणाला क्षयरोग झाल्यास बालकांना क्षयरोगाची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. त्यात एचआयव्हीबाधित, कुपोषित …

Read More »

राज्यात जानेवारीत ७ हजार बेरोजगारांना नोकऱ्या; ९४ हजार उद्योगांची मनुष्यबळासाठी मागणी

९४ हजार उद्योगांची मनुष्यबळासाठी मागणी मुंबई : करोनाच्या संकटामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली असतानाच, आता राज्यातील खासगी, सार्वजनिक अशा जवळपास ९४ हजार उद्योगांनी मनुष्यबळ मागणीसाठी राज्याच्या कौशल्य विकास व उद्योजगता विभागाकडे नोंदणी केली आहे. त्यातून चालू वर्षांच्या प्रारंभालाच म्हणजे जानेवारी महिन्यात सात हजारांहून अधिक बेरोजगारांना विविध उद्योगांमध्ये रोजगाराची संधी मिळाली आहे. राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने महास्वयंम …

Read More »

वधू-वर सूचक संकेतस्थळावरून ४५ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून दोघांना अटक

सायबर पोलिसांकडून दोघांना अटक मुंबई:  मराठी वधू-वर सूचक संकेतस्थळावरून महिलेशी संपर्क साधून तिची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी अँटॉपहिल परिसरातून दोघांना अटक केली. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. अझर अन्सारी(२२) व राजकुमार पांडे अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही अँटॉपहिल परिसरातील रहिवासी आहेत. लुबाडलेली रक्कम जमा करण्यासाठी आरोपींनी बँक खाते उपलब्ध करून दिल्याचा आरोप …

Read More »

मुखपट्टीपासून अद्याप मुक्ती नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

अजित पवार यांचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रिमंडळात मुखपट्टीपासून मुक्ती मिळणार असल्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. जोपर्यंत करोना जात नाही, तोपर्यंत मुखपट्टी लावावीच लागेल. ज्यावेळी मुखपट्टी काढण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही  सांगू. तोपर्यंत मुखपट्टी लावायची म्हणजे लावायचीच, असे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वरळी, वरळी कोळीवाडा, माहीम रेतीबंदर, महालक्ष्मी, …

Read More »

भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणं बाहेर येत असल्याने संजय राऊतांची आदळआपट सुरू – शेलार

संजय राऊतांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता आज तयार नाही, असंही शेलार यांनी बोलून दाखवलं आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “भ्रष्टाचाराची सगळी प्रकरण बाहेर येत असल्याने संजय राऊत यांची आदळआपट सुरू आहे. संजय राऊत आज एकाकी पडले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला महाविकास आघाडीमधील एकही नेता तयार नाही.” असं शेलार …

Read More »

“विरोधीपक्षात असताना आम्ही रोज राजभवनावर येत नव्हतो”; नव्या दरबार हॉलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा टोला

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. यावेळी श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच निवडक निमंत्रित उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनातील विरोधकांच्या उपस्थितीवरुन टोला लगावला.  “मला आज नुतनीकरण केलेल्या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन …

Read More »

लोकल प्रवासात आजपासून मोफत करमणूक

मुंबई : लोकल प्रवासात प्रवाशांची करमणूक होण्यासाठी मध्य रेल्वे आणि एका खासगी कंपनीमार्फत कंटेंट ऑन डिमांडअंतर्गत वायफाय, मोबाइल अ‍ॅपची सुविधा देण्यात येणार आहे. या वायफायद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार असून यात विविध करमणूक उपलब्ध असेल. हे वायफाय प्रवाशांना प्रवासात अमर्यादित वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. या सुविधेचा शुभांरभ शुक्रवारपासून मध्य रेल्वेवर करण्यात येणार आहे. या सेवेमुळे प्रवासादरम्यान आपल्या …

Read More »

शिवाजी पार्कमधील स्मारकावरून वाद, मंगेशकर कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “राजकारणी लोकांनी…”

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यांदाच शिवाजी पार्कवरील लता मंगेशकर स्मारकाच्या वादावर भाष्य केलंय. “आम्ही मंगेशकर कुटुंबियांनी या वादात भाग घेण्याचं काहीही कारण नाही. कारण दीदीचं स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावं ही आमची इच्छा नाही,” असं स्पष्ट मत ह्रदयनाथ मंगेशकरांनी व्यक्त केलं. तसेच राजकारणी लोकांनी दीदींच्या स्मारकावरील वाद कृपया बंद करावा, असं आवाहनही केलं. …

Read More »

लेखिकेला समाज माध्यमांवरून बलात्कार, हत्येची धमकी ; भोपाळवरून तरूणाला अटक

या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते. पत्रकार व लेखिका असलेल्या महिलेची समाज माध्यमांवर बदनामी करून तिला बलात्कार व हत्येची धमकी दिल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी २४ वर्षीय तरूणाला भोपाळवरून अटक केली. या महिलेविरोधात २६ हजार आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले होते. याप्रकरणी चार ट्वीटर व दोन इन्स्टाग्राम खाते धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. …

Read More »