Hijab Row: परीक्षेत न बसलेल्या विद्यार्थिनींना पुन्हा संधी मिळणार का? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर

Hijab Row : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब, शाल सारखे धार्मिक वस्त्र परिधान करण्यावर उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) बंदी आणली. असे असताना काही विद्यार्थीनी हिजाब परिधान (Hijab Row) करुन परीक्षा देण्यास पोहोचल्याने त्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. आता या विद्यार्थीनींची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. यावर कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी सूचक विधान केले आहे.

हिजाब वादामुळे (Hijab Controversy) परीक्षेला न बसलेल्या विद्यार्थिनींची फेरपरीक्षा घेण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. परीक्षेला गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही नियम नसल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. ही परीक्षा स्पर्धात्मक असून गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना मानवतावादी आधारावर विचार केला जाऊ शकत नाही असे ते म्हणाले. तसेच पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना ‘उच्च न्यायालयाने जे काही आदेश असतील ते आम्ही पाळू’, असेही ते म्हणाले.

‘परीक्षेत अनुपस्थित राहणे ही मुख्य घटना आहे. मग ते हिजाबच्या वादामुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे किंवा परीक्षेच्या तयारीच्या अभावामुळे असो. अंतिम परीक्षेला अनुपस्थित राहणे म्हणजे गैरहजर राहणे असा अर्थ होतो. त्यामुळे पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही असे शिक्षणमंत्री म्हणाले.

हेही वाचा :  हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या सर्व याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळल्या

हिजाब परिधान करुन २३१ मुली परीक्षाकेंद्रात, प्रवेश न दिल्याने शाळेविरुद्ध निदर्शने

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरती, २८ हजारपर्यंत मिळेल पगार
शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थिनींची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर अनेक मुस्लिम विद्यार्थिनींनी परीक्षेला बसण्यास नकार दिला. यानंतर ते न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जाऊ शकत नाहीत अशी प्रतिक्रिया कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी दिली.

नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार
४०० मुस्लिम विद्यार्थिनींनी सोमवारी शाळा-कॉलेज सोडले – शिक्षणमंत्री
‘कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल. आम्ही त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या निर्णयापूर्वी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही सामावून घेऊ शकतो, पण जे निकालानंतरही हजर राहिले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही असे करू शकत नाही’ असे शिक्षणमंत्री बी सी नागेश म्हणाले. साधारण ४०० मुस्लिम विद्यार्थिनींनी सोमवारी शाळा, महाविद्यालये सोडल्याचेही ते म्हणाले.

SAI Recruitment 2022: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार
सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरूच ठेवणार – CFI
आम्ही सर्वोच्च न्यायालयात आपला लढा सुरू ठेवणार आहेत असे सीएफआयचे सरफराज गंगावती यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षा न देण्याची सक्ती केली जात आहे. सत्ताधारी भाजप सरकार विद्यार्थ्यांना विशेषत: मुस्लिम महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ इच्छित नाही. निकालापूर्वी, आम्ही राज्यातील २५ जिल्ह्यांतील अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या आणि ११,००० मुस्लिम विद्यार्थिनींना या नियमाचा फटका बसल्याचे आढळून आले. आम्ही डेटा गोळा करत आहोत, असे कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI)च्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा :  शबाना आझमींनी कंगनाला ‘त्या’ पोस्टमुळे फटकारले म्हणाल्या, ‘अफगाणिस्तान हा…’

NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज
नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …