फेब्रुवारी 21, 2024

VIDEO : प्रवाशांसोबत विमानात प्रवास करत होता साप, लोकांमध्ये पसरली घबराट

Snake in flight : विमानात प्रवास करत असताना अचानक समोर साप दिसला तर? हे एखाद्या सिनेमात दाखवल गेलं होतं. पण सत्यात देखील उतरेल असं वाटलं नसेल. मलेशियामधून समोर आलेल्या काही छायाचित्रे आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर सर्वांनाच हैराण केले आहे. हजारो फूट हवेत उडणाऱ्या विमानात एका सापाने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण केली.

इमर्जन्सी लँडिंग

सापाला पाहताच लोकांनी आरडाओरडा सुरू केला. यानंतर अटेंडंटने प्रवाशांना घाबरून न जाण्याचा सल्ला देत सर्वांना सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेताना पायलटने वरिष्ठांना कळवले. हे उड्डाण करणार्‍या कॅप्टनने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानाचे पुन्हा लँडिंग केले. या घटनेचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. जे आतापर्यंत लाखो वेळा पाहिले गेले आहे. 

एअर एशियाचे स्टेटमेंट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान वळवले जाईपर्यंत साप AirAsia Airbus A320-200 मध्ये राहिला. एअरएशियाचे सेफ्टी ऑफिसर कॅप्टन लिओंग तिएन लिंग म्हणाले, “विमान कंपनीला या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. क्वालालंपूर ते तवाऊ या विमानात साप दिसल्याची नोंद झाली आहे. ही बाब गंभीर आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू.

प्रकरणाचा तपास सुरू

हेही वाचा :  Tips and Tricks: उन्हाळ्यात AC चालवण्याआधी हे काम न केल्यास विजेचे बिल येईल भरमसाठ

विमानाच्या आत साप कसा पोहोचला? हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. त्याला प्रवाशाने सोबत आणले होते की बाहेरून विमानात प्रवेश केला होता? या सर्व प्रश्नांसह प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तिस-यांदा दिलेलं मराठा आरक्षण तरी टिकणार का? यापूर्वी दोन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आरक्षण का बाद झाले?

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण …

महाराष्ट्रातील शिक्षकांची ‘या’ सक्तीच्या कामातून होणार सुटका? राज ठाकरे फक्त बोलले अमित ठाकरे थेट मंत्रालयात गेले

Maharashtra Election Commission : निवडणूक आयोगाच्या कामावरून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोग …