ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, लिगामेंट सर्जरी होणार

Rishabh Pant Health: भारतीय टीमचा धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये पंत थोड्यात बचावला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झाली… दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला.कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यावर देहरादूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (Max Hospital) उपचार सुरु होते. पुढील उपचारासाठी पंतला मुंबईला शिफ्ट करण्यात आले आहे. चार वाजण्याच्या आसपास ऋषभ पंत एअर अँबुलन्सने मुंबईत दाखल झाला.  क्रिकेटर ऋषभ पंतचे पुढील उपचार मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात, थेट डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांच्या देखरेखीत उपचार होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. 

मुंबईतील रुग्णालयात ऋषभ पंत याच्यावर लिगामेंट सर्जरी होणार आहे. अपघातामुळे पंतला मोठ्या प्रमाणाच दुखापत झाली आहे. कार अपघातानंतर पंतच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत. त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही. दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत. दरम्यान, ऋषभ पंतला यातून सावरण्यासाठी खूप मोठा कालवाधी लागणार आहे. पुढील काही दिवस ऋषभ पंत मैदानावर दिसण्याची शक्यता नाही. पण चाहते ऋषभ पंतसाठी प्रार्थना करत आहे. ऋषभ लवकर मैदानावर परतावा यासाठी क्रीडा चाहते प्रार्थना करत आहे

हेही वाचा :  एक सामना असाही! नागपुरात अंडर 14 इंटर स्कूल स्पर्धेत 705 धावांच्या फरकाने जिंकला सामना

अपघातावेळी पंत गाडीत एकटाच –
अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. अपघात झाल्यानंतर पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी पंतने कारची खिडकी तोडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. 

तू लढवय्या – टीम इंडियाकडून पंतला धीर
ऋषभ पंतच्या अपघातानंतर भारतीय क्रिकेट टीमने त्याच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. त्याची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. ‘तू लढवय्या आहेस, बरा हो आणि लवकर परत ये’ अशा भावना खेळाडूंनी व्यक्त केल्यात ऋषभ पंतला लवकर बरं होण्यासाठी टीम इंडियाने शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, चहल, ईशान किशन, शुभमन गिल हे फायटर पंतला स्पीडी रिकव्हरीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

live reels News Reels

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rishabh Pant car Accident: ऋषभ पंतचा अपघात खड्ड्यामुळे? अपघातासंदर्भात एक मोठा खुलासा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …