Tag Archives: mumbai News in Marathi

‘पहिली पत्नीच निवृत्तीवेतनासाठी पात्र’

मुंबई : पहिल्या पत्नीपासून कायदेशीर काडीमोड घेतला नसेल आणि तिचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकरणात दुसरी पत्नी मृत पतीच्या निवृत्तिवेतनासाठी पात्र ठरू शकत नाही. किंबहुना कायदेशीररीत्या लग्न झालेली पत्नीच पतीच्या निवृत्तिवेतनासाठी पात्र असेल, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने बुधवारी एका प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी दिला. पतीच्या मृत्यूनंतर निवृत्तिवेतनाचा लाभ नाकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सोलापूर येथील श्यामल ताटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान …

Read More »

इक्बाल कासकरला हजर करण्याचे न्यायालयाचे आदेश

ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे. February 17, 2022 12:44:29 am मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला हजर करण्याचे आदेश मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. ठाणे येथील खंडणीच्या आरोपाप्रकरणी इक्बाल सध्या ठाणे कारागृहात बंदिस्त आहे.  इक्बालला ठाण्याहून मुंबईला आणण्यासाठीची पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) करावी, असेही …

Read More »

ओबीसी समाजाला एकत्र आणण्यासाठी नवीन संघटना

ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या अनेक प्रश्नांवरती गेल्या दोन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक आंदोलने- मोर्चे घेण्यात आले. February 16, 2022 11:51:31 pm मुंबई:  इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणावरून पक्षापासून दुरावलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी राज्यस्तरीय ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या पुढाकाराने या समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये  २५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये समाजाची …

Read More »

“बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी…” ; नारायण राणेंच्या टीकेवर मिलिंद नार्वेकरांचा पलटवार!

“वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?” असं देखील नार्वेकरांनी राणेंना विचारलं आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(बुधवार) पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेवरून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली. या वेळी त्यांनी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची देखील खिल्ली उडवल्याचे दिसून आले. तर, राणेंकडून झालेल्या टीकेवर शिवसेनेकडूनही खासदार विनायक विनायक राऊत …

Read More »

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना साडेसात लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी …

Read More »

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर आरोपास्त्र डागल़े  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक प्रत्युत्तर दिल़े   भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे …

Read More »

“शिवसैनिक संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही”; मास्टरस्ट्रोक म्हणत नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत इशारा दिला आहे. …

Read More »

चांदीवाल आयोगाचे नवाब मलिकांना समन्स; १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

सचिन वाझेच्या तक्रारीनंतर चांदीवाल आयोगाकडून मलिकांकडे विचारणा करण्यात येणार आहे. चांदीवाल आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समन्स बजावले आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे. अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आपली प्रतिमा खराब होत असल्याचे सचिन वाझेने …

Read More »

“तीन वाजल्यानंतर संजय राऊतांचे षटकार”; चंद्रकांत पाटलांसमोर सुप्रिया सुळे यांचं विधान; म्हणाल्या “जेव्हा ते इशारा देतात…”

मुंबईत सुरु असलेल्या ईडीच्या धाडींवरुन पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचं जाहीर केलं असून यावेळी ते काय सांगतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं …

Read More »

निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश; मुंबई पालिकेचा प्रभाग पुनर्रचना आराखडा

मुंबई पालिकेचा प्रभाग पुनर्रचना आराखडा मुंबई : पालिकेची मुदत संपण्यापूर्वी सहा महिने आधी प्रभाग पुनर्रचनेच्या आराखडय़ाबाबत अधिसूचना काढणे अनिवार्य आहे. असे असले तरी करोनामुळे निर्माण झालेल्या विशेष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेतील प्रभाग पुनर्रचनेसाठी या अटीत सवलत द्यायला हवी, असे तोंडी मत उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. त्याच वेळी या अधिसूचनेविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर राज्य निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने …

Read More »

काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि… : संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत भाजपाला खुलं आव्हान दिलंय. तसेच पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा संजय राऊत …

Read More »

परीक्षार्थीची छायाचित्रे, परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी; तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय

|| मंगल हनवते तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी ‘म्हाडा’चा निर्णय मुंबई : तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे.  या तपासणीत दोषी आढळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात निवड झालेला उमेदवार असल्यास त्याची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.   म्हाडाची भरती परीक्षा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात …

Read More »

अडीच लाख म्हाडा परीक्षार्थी; शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत

शुल्क परताव्याच्या प्रतीक्षेत मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेतील सर्व परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण, भरती परीक्षा पार पडल्या तरीही अडीच लाखांहून अधिक परीक्षार्थीना परीक्षा शुल्क परताव्याची प्रतीक्षा आहे.  पुणे सायबर पोलिसांनी पेपरफुटीचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी परीक्षा शुल्क परत करण्याची घोषणाही करण्यात आली. सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेतली, पण …

Read More »

एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा

|| सुशांत मोरे बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास करता येणार आह़े  सुलभ प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आह़े प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आह़े  बेस्ट उपक्रमाने २०२० च्या …

Read More »

एसटीत आता कंत्राटी वाहकांची भरती; ‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया

‘ट्रायमॅक्स’ कंपनीकडून प्रक्रिया मुंबई : कामगारांच्या संपामुळे एसटीची सेवा अद्यापही पूर्ववत होऊ न शकल्याने महामंडळाकडून कंत्राटी चालकांची भरती सुरू आहे. मात्र, संपात मोठय़ा प्रमाणात वाहकही सहभागी असल्याने महामंडळाने काही महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने वाहक भरतीचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटीत ८२ हजार ४८९ कर्मचारी असून, २७ हजार ९८५ कर्मचारी  कामावर हजर झाले आहेत. अद्यापही …

Read More »

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढेल – संजय राऊत

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकार स्थापन करतील, असंही राऊत म्हणाले. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर, २०२४मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना लोकसभा निवडणुका लढेल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “आम्ही नुकतेच गोव्याहून परत आलो आहोत आणि लवकरच …

Read More »

‘हिजाब’चे राज्यभर धर्मातीत समर्थन; विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह

विरोधानंतर वापर आणि मागणीत वाढ, महिलाहक्काचा आग्रह मुंबई : कर्नाटकमधील महाविद्यालयांत हिजाबवर बंदी घालण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद देशभर उमटत असताना राज्यात मात्र थोडे वेगळे चित्र दिसत आहे. महाविद्यालयांनी अशा प्रकारे धर्माला लक्ष्य करणारा पोशाखविरोध केल्यास आम्ही देखील हिजाब वापरू, अशी भूमिका घेत तुरळक स्वरूपात हिंदूू मुली मुस्लिम विद्यार्थिनींच्या समर्थनार्थ उभ्या राहत आहेत. तर विरोधामुळे केवळ शैक्षणिक स्तरावरच नाही तर …

Read More »

दैनंदिन रुग्णांच्या संख्येत घट; उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजारांवर

उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजारांवर मुंबई: राज्यात दैनंदिन करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी होऊन सुमारे ५२ हजार झाली आहे. राज्यात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर घट झाली. जानेवारीमध्ये दैनंदिन सुमारे ३३ हजार ५१० रुग्ण आढळत होते, तर फेब्रुवारीमध्ये हे प्रमाण ११ हजार ८९२ रुग्ण आढळले आहेत. परिणामी, राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या …

Read More »

वानखेडेंच्या तक्रारीबाबत गुन्हा दाखल करण्याची शिफारस; मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे  तक्रार

मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे  तक्रार  मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाकडे केलेल्या तक्रारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची शिफारस राष्ट्रीय आयोगाने केली आहे. तसेच चौकशीच्या नावाखाली समीर वानखेडे अथवा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास न देण्याबाबतही पोलिसांना आयोगाकडून सांगण्यात आले. आर्यन खानला अमली पदार्थाप्रकरणी …

Read More »

आदिवासींच्या विकासासाठी निधीची कमतरता; मंत्र्यांचीच खंत

मंत्र्यांचीच खंत मुंबई : राज्यातील आदिवासी समाजासाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो, त्यात विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मोठा भार असतो, परिणामी या समाजाच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळत नाही, अशी खंत खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी यशवंतराव प्रतिष्ठान येथे आदिवासी समाजाचे नेते …

Read More »