Tag Archives: mumbai News in Marathi

केंद्र सरकारविरोधात रणशिंग ; समविचारी पक्षांना एकत्र करण्याचा उद्धव ठाकरे, राव यांचा निर्धार

मुंबई : महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले असून, खालच्या पातळीवर सुडाचे राजकारण सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली, तर केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. बदल ही काळाची गरज असल्याचे मतही उभय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जुलमाच्या विरोधात …

Read More »

राव यांच्या खेळीला पवारांकडून थंड प्रतिसाद ; काँग्रेसच्या सहभागाखेरीज आघाडी अशक्य-पटोले

मुंबई: महाराष्ट्राच्या भूमीवरून सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य करीत केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात लढय़ाचे नेतृत्व करण्याचा  मानस तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुंबई भेटीत रविवारी व्यक्त केला असला तरी देशाच्या राजकारणातील बुजूर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राव यांच्या राजकीय खेळीला अजिबात महत्त्व दिले नाही. तर काँग्रेसशिवाय बिगर भाजप पक्षांची आघाडी यशस्वी होऊ शकत नाही …

Read More »

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली ; फास्टॅगसह १३३ सीसीटीव्ही कॅमेरे

मुंबई :  मुंबई पारबंदर प्रकल्पावरील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) प्रवास शिस्तीचा आणि सुरक्षित करण्यासाठी या सागरी सेतूवर ‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम’ (आयटीएस) अर्थात अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या यंत्रणेअंतर्गत सेतूवर फास्टॅग यंत्रणा बसविण्यात येणार असून १३३ सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे  लक्ष ठेवण्यात येईल.  मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर  अपघात रोखत  वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)  इंटेलिजंट …

Read More »

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला लवकरच गती ; रेल्वे राज्यमंत्री दानवेंची ग्वाही; सविस्तर अहवाल मार्चमध्ये

मुंबई: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच राज्यातील दोन शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून तो पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन  प्रकल्पाबरोबरच येत्या पालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून …

Read More »

सव्वाशे कोटी रुपये खर्चूनही पालिकेचा सायकल ट्रॅक अपूर्णच ; व्हीजेटीआयमार्फत कामाच्या दर्जाची तपासणी

मोकळय़ा जागेचा लोकांना उपयोग व्हावा म्हणून पालिकेने महत्त्वाकांक्षी असा हरितवारी जलतीरी प्रकल्प आणला या प्रकल्पाचे काम जेवढे पूर्ण झाले आहे, त्याचा दर्जा तपासण्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले तंत्रज्ञान संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. मुंबई: मुंबईतील पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला सुमारे ३९ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक सुरू करण्याचा पालिकेचा प्रकल्प रखडला आहे. एकूण ४८८ कोटींच्या या प्रकल्पासाठी आतापर्यंत …

Read More »

उद्धव ठाकरे-चंद्रशेखर राव यांच्यात आंतरराज्य प्रश्नांवर चर्चा

मुंबई:महाराष्ट्राबरोबर तेलंगणाची सुमारे एक हजार कि.मी.ची सीमा असून, राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या सहकार्याची अपेक्षा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली असता महाराष्ट्राच्या सख्ख्या शेजाऱ्याला जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित क्षेत्रांत सहकार्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. महाराष्ट्र व तेलगंणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत आंतरराज्य प्रश्नांच्या संदर्भातही चर्चा झाली. तेलंगणातील बाभळी बंधारा तसेच अन्य काही सिंचन प्रकल्पांमुळे राज्याचे नुकसान …

Read More »

काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी करणार का? उद्धव ठाकरेंसमोर तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले, “मी स्पष्ट सांगतो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदार आणि अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या भेटीनंतर केसीआर आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या बैठकीची माहिती दिली. तेव्हा पत्रकारांनी काँग्रेसला बाहेर ठेवून तिसरी आघाडी …

Read More »

उद्धव ठाकरे भेटीनंतर के चंद्रशेखर राव यांचं हैदराबाद भेटीचं निमंत्रण; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “महाराष्ट्रातून जो…”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो, असं मत व्यक्त केलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो …

Read More »

“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

देशातील राजकारण २०२४ नंतर अशा चु**लोकांना संपवून टाकेल – संजय राऊत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात आज भेट होणार आहे. फोनवरुन झालेल्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. के. चंद्रशेखर राव यांनी निमंत्रण स्वीकारलं असून आज मुंबईत त्यांची भेट होणार आहे. या भेटीकडे सध्या राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष …

Read More »

मुंबई पोलिसांनी समन्स पाठवल्याने किरीट सोमय्यांचा संताप; म्हणाले “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी…”

मी अशा धमक्यांना घाबरत नाही; किरीट सोमय्यांचा इशारा गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत असून आज ते सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. पोलिसांनी किरीट सोमय्यांना समन्स बजावलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तेची पाहणी केल्याने पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं होतं. दरम्यान किरीट सोमय्यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना …

Read More »

विश्लेषण: मिठी नदीचे विस्तारीकरण, सौंदर्यीकरण…कामे पूर्ण किती? खळखळाट किती?

प्रसाद रावकर कुणे एकेकाळी मुंबईत झुळझुळ वाहणाऱ्या मिठी नदीतून मालवाहतूक करण्यात येत होती असे सांगितले तर ते कुणालाही खरे वाटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे. मुंबई विस्तारत गेली आणि मिठी आक्रसत गेली. केवळ मिठी नदीच नाही तर दहिसर, पोयसर, ओशिवरा अशा विविध नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे. अतिक्रमणामुळे नद्या आक्रसत गेल्या आणि नाल्यांच्या काठावरील परिस्थितीकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्षच झाले. मात्र …

Read More »

‘झायकोव्ही-डी’च्या  वापरावर प्रश्न; राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी

राज्याला पाच लाख मात्रा ; लसीकरणाचा जोर मात्र कमी मुंबई : झायडस कॅडिलाच्या ‘झायकोव्ही-डी’ या लशीच्या सुमारे पाच लाख मात्रा राज्याला प्राप्त झाल्या आहेत. नाशिक आणि जळगावमध्ये ही लस देण्याचे ठरले. पण एकीकडे लसीकरण बऱ्यापैकी झालेले आहे, तर दुसरीकडे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लसीकरणाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे या लशीला फार कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा या लशींचा …

Read More »

परीक्षेऐवजी प्रवास अवघड; एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीला

एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी मेटाकुटीला मुंबई : राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षांचे केंद्र विद्यार्थ्यांच्या शाळेतच देण्यात आले असले तरी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोरील परीक्षा पेच संपलेला नाही. अद्यापही एसटीचा संप मिटलेला नसल्याने शाळेतच परीक्षा केंद्र असले तरी तेथे कसे पोहोचायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. जवळपास ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने …

Read More »

“मी त्यांचा शिवसैनिक आणि…”, १७ दिवसांनी तुरुंगातून सुटकेनंतर ‘हिंदुस्थानी भाऊ’ची पहिली प्रतिक्रिया

राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. यानंतर गुरुवारी (१७ फेब्रुवारी) त्याला जामीन मंजूर झाला. १७ दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर विकास पाठकने या अटकेवर पहिली प्रतिक्रिया …

Read More »

Shiv Jayanti 2022 : “छत्रपतींचा जन्मदिवस म्हणजे आपल्यासाठी तो सण आहे आणि म्हणून तो…” ; राज ठाकरे यांचं विधान!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : चांदिवलीतील मनसे कार्यलयाचे केले उद्घाटन ; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) मुंबईतील चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलायचे उद्धाटन झाले. यानंतर बोलताना राज ठाकरे यांनी मनसे शिवजयंती तिथीने साजरा करणारा पक्ष आहे, असे सांगितले आणि आपण शिवजयंती तिथीने साजरी का करावी यामागचे कारणही त्यांनी यावेळी सांगितले. …

Read More »

इक्बाल कासकर २४ फेब्रुवारीपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मुख्य सूत्रधार दाऊद आजही मुंबईत सक्रिय असून त्याची टोळी सध्या हवाला, क्रिकेट सट्टेबाजी व बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इक्बालची चौकशी करायची आहे, अशी मागणी ईडीने विशेष न्यायालयाकडे केली होती. …

Read More »

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ; न्यायालयाने फटकारल्याने दहा महिन्यांत नवे पोलीस प्रमुख

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेला आक्षेप आणि उच्च न्यायालयाने वारंवार फटकरल्यानंतर राज्य शासनाने संजय पांडे यांना पोलीस महासंचालकपदावरून दूर करीत रजनीश सेठ यांची पूर्णवेळ महासंचालकपदी शुक्रवारी नियुक्ती केली. सुबोध जयस्वाल हे केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर गेल्यावर हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. परमबिरसिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर नगराळे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर  …

Read More »

दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख

नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतने २०२०मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांतसिंहच्या आत्महत्येला आता दीड वर्ष उलटली आहेत. दरम्यान, आता नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे. “मातोश्रीच्या चौघांविरोधात ईडीची नोटीस तयार,” नारायण राणेंचा ट्विट करत इशारा “खासदार …

Read More »

समान निधी वाटपाची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे, परंतु निधी वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याची भावना त्या पक्षाचे मंत्री, आमदारांमध्ये आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे विभाग व आमदारांना निधीचे समान वाटप झाले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मंत्री व वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांकडील विभागांना पुरेसा निधी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांच्या …

Read More »

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न; के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

के. चंद्रशेखर राव रविवारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबई : बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत़  त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रविवारी मुंबईत येणार आहेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेचच …

Read More »