वयाच्या ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेताय, तर या गोष्टींची होईल मदत

आजकाल धावपळीच्या आयुष्यात बरेचदा ३५ व्या वर्षापर्यंत आई होण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र करिअरच्या मागे धावता धावता ४० व्या वर्षानंतरही अनेक जणी आई होण्याचा निर्णय घेतात. ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हा दुय्यम भाग आहे. पण जर एखाद्या स्त्री ला वयाच्या चाळीशीत आई व्हायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. यासाठी प्रजनन क्षमता चांगली असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर असा निर्णय कोणतीही महिला घेत असेल तर तिला या गोष्टी माहीत असायलाच हव्यात. (फोटो सौजन्य – @bipashabasu Instagram, canva)

​डॉक्टरांकडून समुपदेशन​

​डॉक्टरांकडून समुपदेशन​

सर्वात महत्त्वाचं वयाच्या ४० व्या वर्षी बाळाला जन्म देण्यासाठी तुमचे शरीर फिट आहे की नाही अथवा यामध्ये काही गुंतागुंत होऊ शकते की नाही या सगळ्याबाबत मानसिक आणि शारीरिक योग्य समुपदेशनाची गरज आहे. आपल्या डॉक्टरांची भेट घेऊन याबाबत व्यवस्थित चर्चा करण्याची गरज आहे. केवळ एकट्यानेच नाही तर आपल्या जोडीदारासह डॉक्टरांना भेटावा आणि अनुवंशिक आजार अथवा अन्य गोष्टीबाबत समजून घ्यावे. ज्यामुळे बाळाला जन्म देताना काहीही त्रास होईल की नाही याचा अंदाज येईल.

हेही वाचा :  देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याची घटना, फडणवीस म्हणतात असे....

​आरोग्याची तपासणी करून घ्यावी​

​आरोग्याची तपासणी करून घ्यावी​

एका ठराविक वयानंतर नियमित आरोग्याची तपासणी व्हायलाच हवी. मात्र तुम्हाला ४० व्या वर्षी आई व्हायची इच्छा असेल तर त्याआधी रक्तदाब, मधुमेह अथवा कोलेस्ट्रॉल या आजारांची तपासणी व्हायलाच हवी. एखाद्या आजारावर डॉक्टरांचे उपाय चालू असतील तर ते तुम्ही आई होताना तुमच्या स्त्री रोग तज्ज्ञांशी बोलून क्लिअर करायला हवे. डॉक्टर योग्य सल्ला देऊन तुम्हाला यातून मार्ग दाखवू शकतात.

​निरोगी आहाराची गरज ​

​निरोगी आहाराची गरज ​

आपल्या शरीरात एक बाळ वाढणार असतं. त्यामुळे शरीर निरोगी राहणं महत्त्वाचं आहे. वयाच्या चाळिशीत जर गर्भधारणा करायची असेल तर तुम्हाला आराहामध्ये जंक फूड, फास्ट फूड टाळणे आवश्यक आहे. या जागी निरोगी आहार आणि योग्य डाएट फॉलो करावे लागते. गर्भधारणा व्हायला हवी असेल त्यापूर्वी साधारण ३ महिने आधीच विटामिन बी ६, विटामिन डी ३ आणि अन्य पोषक तत्वांचा आहारात समावेश करून घ्यायला हवा.

​स्तनांची तपासणी आणि PAP टेस्ट करा​

-pap-

चाळीशीनंतर स्तन सैलसर होतात. तसंच महिलांमध्ये वाढणारा कर्करोगही आढळून येतो. त्यामुळे बाळाला जन्म देण्याआधी तुम्ही PAP स्मिअर चाचणी करून घ्या. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे की नाही यासाठी हे चाचणी करण्यात येते. तसंच स्तनांमध्ये कोणतीही गाठ नाहीयासाठीही चाचणी करून घेण्याची गरज आहे. बाळाला जन्म देण्याआधी आईने निरोगी असणे गरजेचे आहे.

हेही वाचा :  Gold Rate : वर्षअखेरीस सोन्याचे दर 75 हजारांवर? आज 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतायत 'इतकी' रक्कम

​नियमित व्यायामाकडे लक्ष द्या​

​नियमित व्यायामाकडे लक्ष द्या​

कोणत्याही वयात शरीर फिट असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यायामासारखा दुसरा उपाय आहे. तुम्हाला जर ४० व्या वर्षी आई व्हायचे असेल तर बाळाला जन्म देण्यासाठी शरीर आतून आणि बाहेरून फिट असण्याची गरज आहे. त्यासाठी नियमित व्यायाम करावा. यामुळे तणाव कमी होऊन वेळीच गर्भधारणा होते आणि शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी झाल्यावर प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …