Tag Archives: mumbai News in Marathi

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या

Mumbai University Exam : राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University) 30 जानेवारी  2023 रोजी होणारी ‘लॉ’ची (कायदा) परीक्षा आणि विद्यापीठाच्या इतर परीक्षा 7 फेब्रुवारी 2023  रोजी घेण्यात येणार आहेत. (Mumbai University Exam News In Marathi) महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक ,अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. …

Read More »

Strike:राज्य सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत, ‘या’ मागणीसाठी आक्रमक

Maharashtra Government Employees Strike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्चमध्ये संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जुनी निवृत्तिवेतन (Old Pension) योजना लागू करण्याची मागणी केली आहे. (Pension) केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळवा, वेतन त्रुटी भरुन द्याव्यात, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने (Maharashtra State Government Employees Federation) केली आहे. (Maharashtra News in Marathi) राज्य सरकारी कर्चाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध …

Read More »

Weather Update : मुंबईवर धुक्याची चादर, राज्यात हुडहूडी; ‘या’ भागात सर्वात कमी तापमानाची नोंद

IMD Alert and Weather Update: अमेरिकेत आलेल्या हिमवादळानंतर त्याचे पडसाद इथे पाहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एकाएकी भारतामध्ये हिवाळ्यानं पुन्हा जोर पकडण्यास सुरुवात केली. एकाएकी सुरु झालेला उकाडा कुठच्या कुठे पळाला आणि देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. शनिवारपासूनच तापमानाच घट झालेली नोंदवण्यात आली असून बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीय प्रमाणात खाली उतरला.  उत्तर …

Read More »

पुण्यातील तरुणाचा प्रताप पाहून सर्वच हादरले; पतंजलीच्या मीटिंगमध्ये अचानक सुरु केला ‘तो’ व्हिडीओ…

Patanjali : गेल्या अडीच वर्षापासून कोरोनामुळे (Corona) लोकांच्या सर्वच सवयी बदलल्या आहेत. कोविड काळात लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे (Lockdown) अनेकांना लोकांच्या कामावरही गंभीर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर पडता न आल्याने अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा (Work Froum Home) पर्याय स्विकारला होता. यावेळी ऑनलाईन मीटिंगद्वारे कर्मचारी आपली कामे करत होती. पण या ऑनलाईन मीटिंगच्या ( Zoom Metting) जगतात अनेकांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का; संजय राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात

Maharashtra Politics : 40 आमदारांसह 12 खासदारांच्या फुटीनंतरही शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अद्याप धक्के बसतच आहेत. राज्याती शिंदे – फडणवीस सरकार येताच उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. अनेक निष्ठावंतांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला (Thackeray Group) गळती सुरुच आहे. …

Read More »

बारश्याला दाबून जेवले आणि दुसऱ्या दिवशी गाठवं लागलं रुग्णालय; महिन्याभरात दुसऱ्यांदा जेवणातून विषबाधा

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून सामुहिक सोहळ्यांपासून विविध कार्यक्रमांमध्ये विषबाधा (Food poisoning) होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यात (Bhandara) एका लग्नाला आलेल्या 200 पाहुण्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा भंडाऱ्यातच 70 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. एका नामकरण सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडलाय. 70 जणांना विषबाधा भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील …

Read More »

“नवनीत राणा बारावी नापास खासदार”; पाहा कोणी केली बोचरी टीका

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेला महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि बेरोजगारी या मुद्द्यावरुन शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे (MVA) मुंबईत शनिवारी महामोर्चा (Maha Morcha) आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिन्ही पक्षांचे नेते या मोर्चासाठी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी आलेल्या आंदोलकांच्या संख्येवरुन आता भाजपकडून टीका करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा …

Read More »

viral video: पुण्यात घडलंय – बिघडंलय… बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. आईनस्टाईननं झाडाच्या खाली बसल्यामुळे वरून सफरचंद पडल्यानं गुरूत्वाकर्षणाचा (gravity) शोध लावला त्यामुळे झाडाला असणाऱ्या फळांचंही …

Read More »

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

सागर आव्हाड, झी मीडिया: अंधेरी पोटनिवडणुकीचा(anedheri east elections) निकाल आज लागत असून आजच्या निकालात मोठ्या प्रमाणात नोटाना मतदान करण्यात आलं आहे. हे मतदान भाजपने केलं आहे, अशी टीका देखील होत आहे. यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता (Maharashtra Politics) ते म्हणाले की, ”कोणी कोणावर काय आरोप करावे यावर बंधने आणता येत नाही. लोकांना वस्तुस्थिती माहिती (Latest political …

Read More »

मालमत्ता करमाफीवर मोहर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर विधिमंडळात शिक्कामोर्तब मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवर बुधवारी विधिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत यासंदर्भात मांडलेले विधेयक एकमताने संमत झाले. त्यामुळे १६ लाखाहून अधिक मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका …

Read More »

पुनर्रचित इमारतींनाही चार इतके चटईक्षेत्रफळ

नव्या नियमावलीमुळे पुनर्विकास शक्य निशांत सरवणकर मुंबई : मुंबईत जागा उपलब्ध नसली तरी जुन्या इमारतींचा पुनर्विकास हाच सध्या विकासकांकडे पर्याय आहे. त्यातही जुन्या पुनर्रचित इमारतींसाठी नियमावलीत तरतूद नसल्यामुळे रस न घेणाऱ्या विकासकांना महाविकास आघाडी सरकारने संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडा व पालिकेच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासास दाखविलेला हिरवा कंदील हा त्याचाच भाग आहे.    जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास …

Read More »

प्रवासी वाढविण्यासाठी मोनो रेलची धाव आता महालक्ष्मीपर्यंत

विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा;  अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची तरतूद मुंबई : मोनो रेलला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी तसेच मोनोची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेलच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संत गाडगे महाराज चौक ते मेट्रो ३ मार्गातील महालक्ष्मी मेट्रो स्थानक असे ७०० मीटपर्यंत विस्तारीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) करण्यात येणार आहे. भूसंपादनासह इतर कामांसाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १५६.८६ कोटी रुपयांची …

Read More »

सागरी सेतूवरील मेट्रो मार्गिकेविषयी लवकरच निर्णय

व्यवहार्यता अभ्यास अहवाल महिन्याभरात अपेक्षित मंगल हनवते मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प) मेट्रोद्वारे काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी – शिवडी – नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. …

Read More »

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल मुंबई : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कारवायांना पैसे पुरविल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, सरकार पडण्याच्या भीतीपोटीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही, असा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते का, असा सवाल बुधवारी केला. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेल्या भाजपने मुंबईत …

Read More »

मालमत्ता, मद्य, वाहन, ई-कॉमर्स, इंधनावरील कराचा तिजोरीला हातभार; आदरातिथ्य, पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा

|| सौरभ कुलश्रेष्ठ आदरातिथ्य, पर्यटन उद्योगाला पुनरुज्जीवनाची प्रतीक्षा मुंबई : आर्थिक वर्ष सुरू होत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल ते जून या तिमाहीचा मोठा फटका करसंकलनावर झाला असला तरी त्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू सुधारत असून मुद्रांक व नोंदणी शुल्क, उत्पादन शुल्क, वाहन कर, इंधनावरील विक्री कर आदी महसुलाच्या राज्य सरकारच्या स्रोतांनी तिजोरीला हातभार लावला आहे. पहिल्या तिमाहीनंतर जीएसटी संकलनही वाढले असून …

Read More »

भाजपा नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढतेय असं पत्रकारांनी म्हणताच राऊत म्हटले, “मला असं वाटतं की…”

या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय. महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मंगळवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या …

Read More »

फडणवीसांनी केलेल्या गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “१२५ तास रेकॉर्डिंग केल्याचं….”

राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला. फडणवीसांनी यावेळी पेनड्राईव्हच्या माध्यमातून उपाध्यक्षांकडे पुरावेदेखील सादर केले. फडणवीसांनी केलेल्या आरोपांमध्ये शरद पवारांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. दरम्यान यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील …

Read More »

आरोपांची धुळवड : ‘भाजप नेत्यांविरोधात सरकारचे कारस्थान’

महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप यांच्यात मंगळवारी आरोपांची धुळवड रंगली़ राज्य सरकारने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला़  दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीच्या कारस्थानानुसार मुंबईत छापेसत्र सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सोमय्या पिता-पुत्रासह भाजपला लक्ष्य केल़े  मुंबई : राज्य सरकारने …

Read More »

‘ईडी म्हणजे भाजपचे एटीएम’

मुंबई : चौकशी सुरू करून खंडण्या वसूल करायच्या हा सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांचा उद्योगच झाला आहे. ‘ईडी’ ही भाजपची एटीएम मशीन झाली आहे, असा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील लवकरच तुरुंगात जातील, असा इशारा मंगळवारी दिला़ ‘ईडी’चे अधिकारी खंडणीतून वसूल होणारी रक्कम जितेंद्र नवलानी याच्या सात कंपन्यांच्या खात्यांमध्ये जमा करत होत़े  या …

Read More »

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढील आठवडय़ात ? ; विनंती करूनही राज्यपालांकडून मान्यता नाहीच

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची योजना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मान्यता मिळाली नसल्याने प्रत्यक्षात येऊ शकली नाही. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ न शकल्याने काँग्रेस पक्षावर नामुष्कीची वेळ आली आहे. आता पुढील आठवडय़ात निवडणूक घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंगळवारी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. …

Read More »