Aditya Thackeray: गद्दारी अशीच खपवून घेतली तर…; आदित्य ठाकरेंचा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Aditya Thackeray on Political Row: नाव चोरूद्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे असं विधान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Bow and Arrow) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Faction) दिल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची याचिका ऐकण्यास तयारी दर्शवली असून आयोग आणि शिंदे गटाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आता सर्वात महत्त्वाची भूमिका ही सर्वोच्च न्यायालयाची असणार असल्याचं सांगितलं आहे. 

“ही लढाई आता फक्त आमची राहिलेली नाही. लोकशाहीला, संविधानाला सुरक्षित ठेवण्याची ही लढाई आहे. ही गद्दारी अशीच खपवून घेतली देशात इतर पक्ष अशा पद्धतीने गद्दारी करू लागतील,” अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

“जे गद्दार आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. गद्दारांना मंत्रिमंडळ विस्ताराची अपेक्षा होती,” असं सांगताना आदित्य ठाकरेंनी निवडणूक आल्यावर लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील असा विश्वास व्यक्त केला. 

हेही वाचा :  Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

पुढे ते म्हणाले की “नाव चोरू द्या काहीही करू द्या, पण त्यांच्या नावावर गद्दारचा शिक्का लागलेला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही, लोकांची कामं केली”. देवेंद्र फडणवीस यांना मित्र मानतो असंही यावेळी त्यांनी सांगितलं. 

“मुंबईसाठी आम्ही लढत राहू. मुंबईच्या एफडीवर यांचा डोळा आहे. मुंबईचे चांगले प्रकल्प रद्द करत आहेत आणि स्वतःच्या Davos दौऱ्यावर खर्च करत आहेत. मुंबईचे पैसे पळवत आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

बाळासाहेबांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनीच दिलेला” 

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच दिलेला होता,” असा दावा शीतल म्हात्रे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी हे लक्षात आहे का? अशी विचारणाही केली आहे. 

मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तसंच या बैठकीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव मांडण्यात आला. याबाबतचा पाठपुरावा केंद्राकडे केला जाईल, असंही या बैठकीत ठरण्यात आलं, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

हेही वाचा :  तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? RBIच्या 'या' नियमामुळे वाचू शकतात लाखो रुपये



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी, डेस्टिनेशन वेडींगमध्ये ‘असं’ काही झालं की वऱ्हाडाचा उडाला गोंधळ

Destination Wedding: महाराष्ट्रीयन नवरा आणि गुजराती नवरी…यांच्या लग्नात उडाला गोंधळ…असंकाही तरी हेडींग वाचून तुम्ही याचा …

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …