Black and White: महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरु, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Ashok Chavan Black and White Interview:  राजकारणाचं गँगवॉर (Political Gangwar) होत असल्याचं आपल्याला वाटत आहे असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी अशोक चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर नाराजी जाहीर केली. असं राजकारण न केलेलं बरं असंही ते यावेळी म्हणाले. 

“आजच्या सध्याच्या राजकीय स्थितीत महाराष्ट्रात काँग्रेसच असा एक राजकीय पक्ष आहे, जिथे टोकाची भूमिका घेतली जात नाही. याउलट इतर पक्षांशी समन्वय साधत, संवाद ठेवत समतोल साधला जात आहे. आमची व्यवस्थित काम करण्याची भूमिका लोकांनी पाहिली असून ते कौतुक करत असतात. काँग्रेसमध्ये काहीतरी वर्किंग कल्चर आहे आणि वैचारिक भूमिका लोकांना पटते. सध्या जे सुरु आहे ते घृणास्पद, वाईट आहे. काँग्रेसने कधीही याला खतपाणी घातलेलं नाही किंवा या गँगवॉरमध्ये गेलेली नाही,” असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. 

राजकारणाचं गँगवॉर होत आहे असं तुम्हाला वाटत आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले “हो, निश्चितच वाटत आहे. सध्या देशात जी काही स्थिती आहे, ते एक वॉर आणि कंसात गँगवॉर लिहिण्यासारखीच आहे. एकमेकांना वैचारिक भूमिकेतून विरोध करा हे अनेक दिवस मी सांगत आहे”. 

हेही वाचा :  Mutual Fund मध्ये SIP गुंतवणुकीसाठी सोपं गणित, नुकसानीची शक्यता फारच कमी

“विरोधकांचे संबंध कसे हवेत यासाठी देश पातळीवर उदाहरण द्यायचं झालं, तर एकेकाळी राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तम संबंध होते. पक्ष वेगळे असल्याने सभागृहात एकमेकांविरोधात भूमिका मांडल्या असतील. पण युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी यांची एक व्हिडीओ आहे, ज्यामध्ये त्यांनी मला किडनीचा आजार झाल्यानंतर उपचारासाठी मला अमेरिकेत जायचं होतं, पण आर्थिक स्थिती नव्हती. राजीव गांधी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वत: मला अमेरिकेत पाठवलं आणि सरकारने सगळा उपचाराचा खर्च केला असं सांगितलं आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी ही गोष्ट सांगितली होती,” अस अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

“याआधीही सभागृहात वैचारिक मतभेदातून आरोप-प्रत्यारोप होत होते. पण सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर एक वेगळं वातावरण असायचं, एकमेकांबद्दल आदर असायचा. आज सर्व संपलं आहे. आपण एकमेकांचे वैयक्तिक शत्रू असल्यासारखे वागत असून एकमेकांना संपवण्याची भाषा सुरु आहे. हे काही बरोबर नसून, असं राजकारण न केलेलं बरं अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे,” अशी खंतही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …