Tag Archives: mumbai News in Marathi

मुंबईसह १४ महापालिका, २५ जि.प. निवडणुकांची तयारी ; निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांशी चर्चा

मुंबई : मुंबईसह १४ महानगरपलिका, नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली. साधारणत: एप्रिल व मे महिन्यांत वेगवेगळय़ा टप्प्यांत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आयुक्त मदान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भारतीय जनता पक्ष, …

Read More »

मुंबई: ‘आम्हाला भारतीय दूतावासाची काहीच मदत झाली नाही;’ युक्रेनमधून परतलेल्या प्रचीतीचा आरोप

तिथे आमचा जीवही जाऊ शकत होता, असं प्रचीतीने सांगितलं. रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक भारतीयांना परत आणलं असून बचावकार्य सुरूच आहे. अशातच युक्रेनमध्ये आम्हाला भारतीय दूतावासाची काहीही मदत झाली नाही, अशी भावना युक्रेनवरून भारतात परतलेल्या प्रचीती पवार नावाच्या विद्यार्थिनीने …

Read More »

माहिती लपवल्यावरून उच्च न्यायालयाने सचिन वाझेंना फटकारले

मुंबई : माजी न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल आयोगाच्या दोन आदेशांना आव्हान देणारी याचिका करताना त्यात संपूर्ण माहिती न दिल्याने उच्च न्यायालयाने मंगळवारी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना फटकारले. तसेच तुम्ही ही याचिका मागे घेणार की आम्ही ती फेटाळून लावू, असे बजावून याप्रकरणी बुधवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने वाझे यांना दिले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याबाहेर …

Read More »

महाशिवरात्रीच्या जत्रेसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून जेसीबीने पीक उद्धवस्त ; उच्च न्यायालयाकडून ताशेरे

मुंबई : ‘महाशिवरात्री’निमित्त आयोजित जत्रेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी यंत्राच्या साहाय्याने पीक नष्ट केल्याची उच्च न्यायालयाने दखल घेऊन संताप व्यक्त केला. त्याचबरोबर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कुरुंदवाडनगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देऊन न्यायालयाने त्यांनाही धारेवर धरले. कृष्णा-पंचगंगा संगमावरील ‘कृष्णावेणी’ जत्रा साजरा करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या जमिनीचा कोणताही भाग वापरण्यास मज्जाव केला. कोल्हापूर येथील कुरुंदवाड शहरातील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी कृष्णावेणी …

Read More »

महेश मांजरेकरांना अटकेपासून दिलासा; ‘नाय वरन भात लोन्चा..’तील आक्षेपार्ह दृश्य

मुंबई : ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर आणि चित्रपटाचे निर्माते नरेंद्र आणि श्रेयांश हिरावत यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून दिलासा दिला. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच तीन आठवडय़ांपर्यंत या तिघांवर कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने या वेळी माहीम पोलिसांना दिले.  न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र …

Read More »

यंदाच्या उन्हाळय़ात सरासरीपेक्षा अधिक तापमान

उन्हाळय़ाचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाकडून जाहीर मुंबई : यंदाच्या उन्हाळय़ाचे दीर्घकालीन पूर्वानुमान हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. यानुसार कोकण, घाट प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय स्थितीचा विचार करता उष्ण लहरींची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोकण व घाट प्रदेश या भागातील किमान तापमानाची स्थिती सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ६५ …

Read More »

‘ठाकरे सरकारच दाऊदचे गुलाम झाले आहे काय?,’ भाजपाचा नवाब मलिक प्रकरणावरून सवाल

देशद्रोही दाऊदच्या हस्तकाची पाठराखण ठाकरे सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ठाणे : कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहिमची संपत्ती दुसऱ्याच्या नावावर झाली नसती तर ती सरकार जमा झाली असती. हे टाळण्यासाठी नवाब मलिक यांनी दाऊदची मालमत्ता स्वतःच्या नावावर केली, असा आरोप भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील सरकार दहशतवाद्याविरोधात नाही तर त्यांना संरक्षण देणारे हे सरकार …

Read More »

‘शिवतीर्थ’वरुन गोड बातमी: राज ठाकरे होणार आजोबा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात ही भूमिका कोणतीही राजकीय भूमिका नसून वैयक्तिक आयुष्यामध्ये राज ठाकरेंचं आजोबा म्हणून प्रमोशन होमार आहे. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरेंकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता ही खासगी आयुष्यामधील प्रमोशनची बातमी …

Read More »

मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक दडवला! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

मुंबई : नागरिकांनी प्रेरणा घेऊ नये, यासाठी देशातील मंदिरे आणि पराक्रमांचा इतिहास जाणीवपूर्वक दडविण्यात आला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले. दीपा मंडलिक लिखीत ‘पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे’ पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पुरातत्व वेत्ते आणि मूर्तीशास्त्र व मंदिरांचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राजेंद्र प्रकाशनने हे पुस्तक …

Read More »

शहरातील २५ बोगस मजूर संस्थांची बँक खाती सील ; आर्थिक गुन्हे विभागाकडून कारवाई

संदीप आचार्य, निशांत सरवणकर, लोकसत्ता मुंबई : मुंबै बँकेतील कथित घोटाळय़ाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत शहरातील २५ मजूर संस्थांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. संचालक मंडळाने एकाच दिवशी मंजुरी दिलेल्या ७४ मजूर संस्था बोगस असल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. यापैकी सुमारे सात-आठ प्रकरणांत चौकशी पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्रकरणात आरोपपत्र दाखल …

Read More »

मेट्रोसाठी ६२५० कोटींची तरतूद ; ‘एमएमआरडीए’चा १८,४०४.६३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२२-२३ या आर्थिक वर्षांच्या १८,४०४.६३ कोटी रुपयांच्या सुमारे ७६७९.९३ कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला सोमवारी मंजुरी देण्यात आली. नगर विकास मंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ िशदे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या १५२ व्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी ६,२५० कोटी रुपयांची अशी भरीव तरतूद करण्यात आली असून सागरी मार्ग, रस्ते …

Read More »

लोकलमधील लससक्तीसंदर्भातील निर्णय उद्या ; निर्णयावर मुख्य सचिवांची स्वाक्षरी न झाल्याने सरकारकडून मुदतवाढीची मागणी

मुंबई : करोनावरील लशीची एकच मात्रा घेतल्यांना किंवा एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवासाची मुभा द्यायची की नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आणखी दोन दिवसांची म्हणजेच बुधवापर्यंतची मुदत सोमवारी दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मुख्य सचिवांच्या अन्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत सतत बैठका सुरू असल्याने त्यांनी नव्या करोना निर्बंधांबाबतच्या निर्णयावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे सरकारतर्फे निर्णयासाठी …

Read More »

मुंबईत घरविक्री कमी, तरीही महसुलात वाढ

मुंबई : करोनाचा फटका बसलेला बांधकाम व्यवसाय आता बऱ्यापैकी वधारत असल्याची बाब दिसून येत आहे. घरविक्रीची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असली तरी महसूलात मात्र चांगली वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात सवलत असल्यामुळे घरविक्री वधारली. पण यंदा घरविक्री कमी झाली असली तरी महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बांधकाम व्यवसायासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे. ‘नाइट …

Read More »

नवाब मलिक पुन्हा ‘ईडी’ कार्यालयात

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या प्राकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. पोटदुखीच्या त्रासामुळे शुक्रवारी त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कुल्र्यातील जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना ३ मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालय (ईडी) कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ईडीने त्यांना बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात नेले. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारीला सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते0. नवाब मलिक …

Read More »

VIDEO: “माझी पत्नीने माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि…”, दिलीप वळसे-एकनाथ शिंदेंसमोर संभाजीराजेंचं वक्तव्य

उपोषण सोडताना संभाजीराजे छत्रपती माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला, असं म्हणाले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतलं. यावेळी त्यांनी उपोषणा दरम्यान खंबीरपणे सोबत राहिलेल्या त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांच्याविषयी लडिवाळ तक्रार केली. माझ्या पत्नी संयोगिताराजे यांनी माझ्यासोबत गनिमी कावा केला आणि माझ्यासोबत त्यांनीही अन्नत्याग केला, असं संभाजाराजे म्हणाले. …

Read More »

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारकडून ‘या’ १५ मागण्या मान्य, एकनाथ शिंदे म्हणाले…

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे. त्यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारने मराठा समाजाबाबत त्यांनी गेलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वतः कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेंच्या समोर याची माहिती देत मान्य केलेल्या १५ मागण्यांची घोषणा …

Read More »

खासदार संभाजी राजेंचं उपोषण अखेर मागे, म्हणाले “माझ्या चेहऱ्यावर…”

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारने त्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर संभाजीराजे यांनी हे उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. यावेळी संभाजीराजेंनी मलाही काय होणार आहे हे माहिती नव्हतं. मात्र, आता माझ्याही चेहऱ्यावर …

Read More »

VIDEO: “छत्रपती केव्हाही रडत नाही, पण…”, वारकऱ्यांसमोर छत्रपती संभाजी राजेंचे डोळे पाणावले

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा भावनिक झाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात वारकऱ्यांसमोर बोलताना संभाजीराजे यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “संत तुकाराम, …

Read More »

१८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ; पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक

मुंबई :  पालिकेची मुदत येत्या सात मार्चला संपत असल्याने पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या कामांना, विकासकामांना मंजुरी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची व प्रशासनाची घाई सुरू आहे.  बैठकीत  १८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत.   ७ मार्चला सध्याच्या पालिकेची मुदत संपत आहे. सत्ताधारी शिवसेनेने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक कधी होईल …

Read More »

नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ ; दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. आमदार नितेश राणेही याप्रकरणी सहआरोपी आहेत. लवकरच पोलीस दोघांचा जबाब नोंदवणार आहेत.  दिशाच्या मृत्यूनंतर नारायण राणे, त्याचे पुत्र नितेश राणे यांनी  दिशाच्या मृ्त्यूबाबत आरोप केले …

Read More »