Tag Archives: mumbai News in Marathi

महाविकास आघाडी संघर्षांच्या पवित्र्यात ; नवाब मलिक यांना अभय, आज मंत्र्यांचे धरणे

मुंबई :  अल्पसंख्याक विकासमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरू असलेल्या भाजपच्या दडपशाहीविरोधात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी केला. अटक झाली तरी मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. तसेच  गुरुवारी महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार व पदाधिकारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळय़ासमोर केंद्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात निदर्शने …

Read More »

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का ; अनिल देशमुखांपाठोपाठ नवाब मलिक तुरुंगात

मुंबई: छगन भुजबळ, अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ नवाब मलिक या पहिल्या फळीतील नेतेमंडळींच्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विविध नेत्यांवर होणारे आरोप किंवा नेतेमंडळींच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर परिणाम होतो. त्याचे परिणामही राष्ट्रवादीला भोगावे लागले आहेत. महाराष्ट्र सदन गैरव्यवहारात छगन भुजबळ यांना अटक झाली होती. खंडणीच्या आरोपांवरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुंरुगात आहेत. या यादीत …

Read More »

सर्वानाच लोकल प्रवासासाठी रेल्वेची सज्जता ; राज्य सरकारच्या अधिसूचनेची प्रतीक्षा

मुंबई : सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे. यात सरसकट सर्वानाच लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता अससल्याने मध्य व पश्चिम रेल्वेही सज्ज राहिली आहे. यात सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्याबरोबरच  एटीव्हीएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर १७८ एटीव्हीएम सुरू करण्यात आली असून रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवा दिली जात …

Read More »

ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण स्पष्ट नाही

अग्निरोधक यंत्रणेबाबत निष्काळजीपणा; चौकशी अहवालातील निष्कर्ष मुंबई :  ग्रॅन्टरोड येथील ‘सचिनम हाईटस’ या इमारतीला जानेवारी महिन्यात लागलेल्या आगीचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे. तब्बल एक महिन्यानंतर हा अहवाल सादर करण्यात आला असून आग नक्की कशामुळे लागली याचे कारण अज्ञात असल्याचे यात म्हटले आहे. अग्निरोधक यंत्रणेतील त्रुटींबाबत इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचेही या अहवालात प्रस्तावित …

Read More »

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर …

Read More »

नवाब मलिकांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ही लढाई…”

दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर …

Read More »

नवाब मलिकांना अटक केल्यानंतर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले “मलिकांनंतर आता पुढचा नंबर…”

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर सक्तवसुली संचलनालायने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीचे अधिकारी पहाटे पाच वाजता नवाब मलिक यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक …

Read More »

“संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं की, यापुढे दिशा सालियन प्रकरणावर…”; नितेश राणेंनी मानले मुंबईच्या महापौरांचे आभार

“याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली.” अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता भाजपाचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधलाय. उपहासात्मक टीका करताना नितेश राणेंनी किशोरी पेडणेकर यांचे आभार मानलेत. “एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरी …

Read More »

“२०२४ पर्यंत हे सगळं चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत” ; ‘ईडी’च्या कारवायांवर संजय राऊतांच विधान!

नवाब मलिक यांना ईडीचे पथक चौकशीसाठी पहाटेच घेऊन गेलेलं आहे, यावर संजय राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता ईडीच्या रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. …

Read More »

“शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”, सुप्रिया सुळेंकडून ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उदय यावर ट्वीट करत ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. …

Read More »

“मी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात, कधीकाळी टीका-आरोप झाले, पण…”, शरद पवार यांचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे सार्वजनिक आयुष्यात असताना कधीकाळी टीका-आरोप झाल्याचं सांगितलं. तसेच आरोप झाले, पण त्याची कधी फिकीर बाळगली नाही. अनेकांनी आरोप केले, पण ते आरोप खरे नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना पुढे बोलता आलं नाही, असंही शरद पवार …

Read More »

लोकल प्रवासासाठी लससक्तीचा निर्णय मागे?; ठाकरे सरकारने हायकोर्टात दिली महत्वाची माहिती

करोना संकटामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी करण्यात आलेली लससक्ती मागे घेतली जाऊ शकते करोना संकटामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी करण्यात आलेली लससक्ती मागे घेतली जाऊ शकते. राज्य सरकारने हायकोर्टात तशी तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारने आदेशाचा फेरविचार केला जाईल असं सांगितलं आहे. लोकल प्रवासासाठी लससक्ती करण्याचा तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेला आदेश कायद्यानुसार नसल्याचे कागदोपत्री दिसून येते. त्यामुळे हा आदेश …

Read More »

ही न्यायव्यवस्था अशासाठी आहे का?; समीर वानखेडेंच्या याचिकेवरुन हायकोर्टाने कर्मचारी आणि वकिलांना फटकारलं

बनावट कागदपत्रांद्वारे मद्यालयासाठीचा परवाना मिळवल्याबद्दल ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आणि रद्द केलेला परवाना पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेत दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या. दरम्यान त्यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने कोर्ट स्टाफ आणि वकिलांना फटकारलं आहे. कोर्टाने याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. …

Read More »

भाजपचा संघराज्य संकल्पना, कार्यप्रणालीवर दृढविश्वास ; केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

मुंबई : संघराज्य संकल्पना आणि कार्यप्रणालीवर भाजपचा दृढविश्वास असून सर्व राज्यांच्या सहमतीनंतरच अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय वने आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी केले. एकेकाळी राजकीय अस्पृश्य असलेला भाजप आज सर्वसमावेशक आणि सर्वात मोठा राष्ट्रीय विचारप्रणालीचा पक्ष झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भूपेंद्र यादव आणि केंद्र सरकारच्या माजी प्रमुख आर्थिक सल्लागार डॉ. इला पटनाईक …

Read More »

शिक्षणमंदिरात ग्रंथांची अवहेलना; मुंबई विद्यापीठातील शेकडो ग्रथांची दयनीय अवस्था; डिजिटलीकरणही संथगतीने

मुंबई विद्यापीठातील शेकडो ग्रथांची दयनीय अवस्था; डिजिटलीकरणही संथगतीने मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या नव्या इमारतीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे जुन्या इमारतीत लाखो पुस्तके अखेरचा श्वास घेत आहेत. ग्रंथालयाची अवस्था बिकट असून दुर्मीळ पुस्तके, संदर्भ ग्रंथ, वर्तमानपत्र आदींना वाळवी लागली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ ही पुस्तके धूळ खात पडली असून विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.  ग्रंथालयाची …

Read More »

सुप्रिया सुळेंनी लावली होती अंबानींच्या मुलाच्या लग्नाला हजेरी, पाहा फोटो

सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी हा नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. अनमोलने Dysco या सोशल नेटवर्किंग कंपनीची संस्थापक क्रिशा शाहशी रविवारी सप्तपदी घेतल्या आहेत. त्यांच्या लग्नात बॉलिवूड चित्रपटसृष्टीपासून राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या लोकांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा लग्नाला …

Read More »

‘जय भवानी’ ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली : प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ठेकेदारांनो जरा वाचायला शिका म्हणत ‘जय भवानी’ घोषणेबाबत मोठा दावा केलाय. जय भवानी ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. याला दुजोरा देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटर …

Read More »

संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलय, त्यांच्या स्वप्नातही किरीट सोमय्या येतात – मोहित कंबोज

हर्बल वनस्पतीने आणि बारामतीच्या वनस्पतीने संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, असं देखील कंबोज म्हणाले आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील वाद आता शिगेला पोहचल्याचं दिसत आहे. किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी किरीट सोमय्यांसाठी अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे भाजपा व शिवसेनेतील वातावरण आता चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते मोहित कंबोज …

Read More »

मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालायने फेटाळली

याचिकाकर्त्यांना दंड देखील ठोठावला आहे ; भाजपा आणि ‘मनसे’च्या नेत्यांकडून दाखल करण्यात आली होती याचिका मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी २३६ प्रभागांच्या सीमांकन किंवा त्यात बदल करण्याच्या पालिका आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेला भाजपा नेते राजहंस सिंह आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. ही याचिका आज(सोमवार) उच्च न्यायालायाने फेटाळली असून, याचिकाकर्त्यांना प्रत्येकी २५ …

Read More »

“काँग्रेसच्या नौटंकीचा शेवट मुंबईत करु”; भाजपा खासदाराचा इशारा

पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात सोमवारी भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या घराबाहेर मुंबई काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस विरुद्ध भाजपा संघर्ष मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. काँग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपा कार्यकर्त्यांकडून खासदार मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. खासदार मनोज कोटक यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते …

Read More »