दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख

दिशा सालियनची सामूहिक बलात्कार करुन हत्या, नारायण राणेंचं खळबळजनक ट्वीट; सुशांतचाही उल्लेख


नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतने २०२०मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं. सुशांतसिंहच्या आत्महत्येला आता दीड वर्ष उलटली आहेत. दरम्यान, आता नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला आहे.

“मातोश्रीच्या चौघांविरोधात ईडीची नोटीस तयार,” नारायण राणेंचा ट्विट करत इशारा

“खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले,” असं राणेंनी ट्वीट करून म्हटलंय. त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात विनायक राऊत यांचा काय संबंध आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात नारायण राणे यांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेतलं आहे. तसेच मातोश्रीवरील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता हे चार जण कोण आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आधीच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात सुरू असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली होती आणि आजच राणेंनी विनायक राऊतांचं सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी नाव घेतलं आहे.

हेही वाचा :  विश्लेषण : झोमॅटो, पेटीएमच्या समभागांत का होतेय सातत्याने घसरण?

Loksatta Telegram

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link