‘सगळे स्ट्रगल करत आहेत…’; ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला धर्मेंद्र यांनी दिलं सडेतोड उत्तर

Dharmendra: अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या हटके स्टाइलमुळे आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT) रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत.  या सीरिजमधील लूकचा फोटो धर्मेंद्र यांनी काल सोशल मीडियावर शेअर केला.  या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं त्यांना ट्रोल केलं. आता या ट्रोलरला धर्मेंद्र यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 

नेटकऱ्याची कमेंट

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या वेब सीरिजमधील लूकच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘हे स्ट्रगलिंग अॅक्टरसारखं का वागत आहेत?’ नेटकऱ्याच्या या कमेंटला धर्मेंद्र यांनी रिप्लाय दिला, ‘वैष्णव, आयुष्य हे स्ट्रगल आहे. तू, मी, सगळे स्ट्रगल करत आहेत. आराम करणे म्हणजे तुमच्या स्वप्नांचा प्रवास थांबण्यासारखं आहे.’

धर्मेंद्र हे ‘ताज’ (Taj) या आगामी सीरिजमध्ये सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या ‘ताज’ (Taj) या वेब सीरिजमध्ये अभिनेते नसिरुद्दीन शाह हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. आशिम गुलाटी, अदिती राव हैदरी, राहुल बोस हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. ते या चित्रपटात अकबर ही भूमिका साकारणार आहे. ‘ताज रॉयल ब्लड’ ही वेब सीरिज झी-5 या ओटीटी प्लॅफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

हेही वाचा :  Trending : सारा अली खानच्या 'चका चक' गाण्यावर थिरकली चिमुकली, व्हिडीओ व्हायरल

धर्मेंद्र यांचा आगामी चित्रपट

धर्मेंद्र त्यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि  शबाना आजमी हे कालकार महत्वाची भूमिका साकारणार आहेत. मेरा गाव मेरा देश, प्रतिज्ञा, शोले, धरम-वीर शालीमार, लाइफ इन अ मेट्रो  यांसारख्या चित्रपटांमध्ये धर्मेंद्र यांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.

महत्वाच्या इतर बातम्या :  

Dharmendra: धर्मेंद्र झाले सुफी संत; ‘ताज रॉयल ब्लड’ सीरिजमधील लूकचा फोटो केला शेअर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …