‘आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती, आपण फार मोठा…’; राऊतांचा दावा

Fadnavis Fear Of Getting Arrest:  उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटकेची भीती होती असा दावा केला आहे. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीस हे आरोपी होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रकरणाचा तपास सुरु केला होता म्हणून फडणवीसांना अटकेची भीती वाटत होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.

अनेकांना अटक केली

“सरकार कारण नसताना कोणाला अटक करत नाही. आरोपी कितीही मोठा असो कायद्यासमोर सर्व समान असतात हे असं कोणाचं म्हणणं आहे तर शिंदेंचे आताचे बॉस आहेत नरेंद्र मोदी, अमित शाहा यांचं म्हणणं आहे. म्हणून तर मोदींच्या सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. अनेक मंत्र्यांना, आमदारांना आणि खासदारांना अटक केली. का अटक केली? त्यांच्याशी संलग्न काही ना काही आरोप जोडण्यात आले,” असं राऊत म्हणाले.

हेही वाचा :  काँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास

फडणवीसांना अटकेची भीती होती

“उद्धव ठाकरेंची सरकार फडणवीसांना अटक करत होती, आशिष शेलारांना अटक करत होती. का करत होती तर त्यांनी काही ना काही केलं असेल ना? काही कारण नसताना कोणी कोणाला अटक करतं का?” असा सवाल राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. “बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीस गुन्हेगार होते. बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास सुरु होता. त्यांना भीती होती की त्यांना अटक केली जाईल. माझ्याकडे काही माहिती आहे, सूचना आहे असं काही नव्हतं पण त्यांच्या मनात भूती होती की त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना विरोधीपक्षांच्या नेत्यांचे फोन मी ऐकले आहेत. त्यासाठी मी दोन अधिकारी नियुक्त केले होते, अशी भूती त्यांच्या मनात होती,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> ‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

फडणवीस कायद्याहून मोठे आहेत का?

“त्यांनी (फडणवीसांनी) नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक रश्मी शुक्ला आज डीजी आहेत. नंतर त्याच्यावर लावण्यात आलेल्या एफआयआर मागे घेतल्या. का घेण्यात आल्या मागे एफआयआर? तपास व्हायला हवा होता ना? फडणवीसांच्या मनात भीती होती की या प्रकरणात त्यांना अटक होऊ शकते. जगात कुठेही अशा प्रकरणांमध्ये अटक होते आणि त्या व्यक्तीला तुरुंगात जावं लागतं. हा भयंकर गुन्हा होता. गृहमंत्री असतानाही त्यांनी हा गुन्हा केला होता. फडणवीसांना कोणी हात लावू शकत नाही का? ते कायद्याहून मोठे आहेत का?” असा सवाल राऊत यांनी विचारला.

हेही वाचा :  15 वर्षांपासून रजेवर असलेल्या कर्मचाऱ्याने कंपनीनला खेचले कोर्टात; म्हणतो, "माझा पगार..."

नक्की वाचा >> ‘असं खोटं बोलून काय मिळतं?’ ‘त्या’ Viral Video वरुन जय पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

भाजपाच्या लोकांना कायदा हात लावू शकत नाही का?

“प्रवीण दरेकर त्यांच्याविरोधात मुबैं बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु होती. तिथे हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. सिंचन घोटाळ्याबरोबर इतर अनेक प्रकरणांमध्ये 50 लाख, 10 लाखांसाठी भाजपावाल्यांनी लोकांना अटक केली ना? मग या लोकांना काय कायदा हात लावू शकत नाही का? हे सर्व लोक प्रसाद लाड, आशिष शेलार सर्वांविरोधात आरोप होते आणि तपास सुरु होता,” असं राऊत म्हणाले आहेत.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘पत्नीसोबत अनैसर्गिक शरीर संबंध गुन्हा नाही’, कोणत्या प्रकरणात हायकोर्टाने दिला निर्णय?

Unnatural Intercourse: पती पत्नीमध्ये अनेक कारणांवरुन वाद होत असतात. हे वाद टोकाला गेले की कोर्टाची …

पाणीटंचाईमुळे गावातील तरुणांचं लग्न थांबलं, वर्ध्याच्या 8 गावांची 60 वर्षांपासून पाण्यासाठी लढाई

Wardha Drought 8 village : उन्हाळा लागला की पाणी समस्या सगळीकडे बिकट होताना बघायला मिळते. …