‘मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?’ राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

Modi Fadnavis Pressurize Shinde: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरमामध्ये आरोपी होते. त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारने तपास सुरु केला होता. त्यामुळेच अटकेच्या भीतीने फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर दबाव आणून सरकार पाडल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांविरोधात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तपास सुरु होता असं सांगताना कारवाईच्या भीतीला घाबरुनच फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकनाथ शिंदेंवर अटकेचा दबाव टाकत आमदार फोडल्याचा आरोप केला आहे.

शिंदेंना मोदी सरकार का अटक करणार होतं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोदी सरकार अटक का करणार होतं हे विचारावं असं राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं. “तुम्ही एकनाथ शिंदेंना विचारा मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?” असं राऊत प्रसारमाध्यमांना म्हणाले. तसेच एकनाथ शिंदेंना थेट आव्हान देताना राऊत यांनी, “मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती? याचं आधी उत्तर द्या. त्यानंतर तुम्ही इतरांची नावं घ्या,” असा खोचक टोला लगावला. राऊत यांनी फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीस हे मुख्य आरोपी होते आणि त्यांच्याविरुद्ध ठाकरे सरकारने तपास सुरु केला होता असा दावा केला. या प्रकरणामध्ये विद्यमान पोलीस निर्देशक रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरु करण्यात आली होती. मात्र नंतर या एफआयआर रद्द करण्यात आल्याचं राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा :  संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले, “आमचं राजकारण नकलांवर…!”

नक्की वाचा >> ‘असं खोटं बोलून काय मिळतं?’ ‘त्या’ Viral Video वरुन जय पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मोदी-फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणला

देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्याबरोबरच रश्मी शुक्लांचा उल्लेख करत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. “(फोन टॅपिंग प्रकरणात भाजपाच्या तीन प्रमुख नेत्यांसहीत) चार लोकांविरोधात तपास सुरु झाला तर मोदी आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवर दबाव आणला. आम्ही तुम्हाला अटक करु. तुम्ही आमदार फोडा आणि आमच्याकडे या नाहीतर तुम्हाला अटक केली जाईल. हा असा खेळ आहे,” असं राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> ‘आपल्याला अटक होईल अशी भीती फडणवीसांच्या मनात होती, आपण फार मोठा…’; राऊतांचा दावा

अनेक भाजपा नेत्यांविरोधात तपास सुरु होता

“प्रवीण दरेकर त्यांच्याविरोधात मुबैं बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सुरु होती. तिथे हजारो कोटींचा घोटाळा झाला आहे. सिंचन घोटाळ्याबरोबर इतर अनेक प्रकरणांमध्ये 50 लाख, 10 लाखांसाठी भाजपावाल्यांनी लोकांना अटक केली ना? मग या लोकांना काय कायदा हात लावू शकत नाही का? हे सर्व लोक प्रसाद लाड, आशिष शेलार सर्वांविरोधात आरोप होते आणि तपास सुरु होता,” असं राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा :  डॅझलिंग शिमरी साडी आणि डीप नेक ब्लाऊज, काजोलच्या सौंदर्याने तरूणही घायाळ

नक्की वाचा >> ‘भवानी मातेशी वैर म्हणजे..’, ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, ‘प्रश्न हिंदुत्वाचा नसून..’

असं होणार नव्हतं

“तुम्ही आमच्या लोकांना कधीही अटक करु शकता. पण तुमच्या राजकीय पक्षात जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही हात लावू शकत नाही? असं होणार नव्हतं,” असंही राऊत म्हणाले. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …