Maharashtra Political Crisis: “अजित पवार असं कसं काय बोलू शकतात?,” संजय राऊत संतापले

Sanjay Raut on Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकरण विधानसक्षा अध्यक्षांकडे जाऊ शकतं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संताप व्यक्त केला आहे. ते असं कसं काय बोलू शकतात अशी विचारणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी जयंत पाटील यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीवर भाष्य करण्यास नकार दिला. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे असं सांगत त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. 

अजित पवारांनी काय म्हटलं आहे?

“सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. पण मला वाटतं ते विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण सोपवतील. ही शक्यता नाकारता येत नाही. विधीमंडळातील बाब असल्याने ते विधानसभा अध्यक्षांनाच याची माहिती घेत निर्णय घेण्यास सांगतील,” अशी शक्यता अजित पवारांनी व्यक्त केली आहे. तसंच 145 आमदारांचं पाठबळ जोपर्यंत आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊतांची टीका – 

अजित पवार यांनी सरकारला धोका नाही असं म्हटलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊतांनी हे त्यांचं मत असू शकतं असं म्हटलं आहे. “मी महाविकास आघाडीचा नेता आणि शिवसेनेचा खासदार असून मला वाटतं सरकारला धोका आहे. कारण मी जो पक्ष, आघाडीचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांचं मनोबल वाढवेन. जर 16 आमदार अपात्र झाले तर उरलेले 24 देखील अपात्र होतील आणि सरकार कोसळेल. सरकारला धोका नाही असं कसं काय कोणी बोलू शकतं? जर मुख्यमंत्री अपात्र झाले तर हे सरकार आणि बंडखोरांचा गट संपेल”.

हेही वाचा :  सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी जयंत पाटील यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीवर भाष्य करण्यास नकार दिला. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. राष्ट्रवादीच्या पक्षात मोठे वाघ आहेत ते गर्जना करतील असा टोला त्यांनी लगावला. 

“जेव्हा 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला तेव्हा नरहरी झिरवळ अध्यक्ष होते. सध्याचे विधानसभा अध्यक्ष माझ्याकडे निर्णय येईल असं सांगत आहेत. तुम्ही घटनाबाह्य सरकार बनवलं आहे. तुमची नियुक्तीच घटनाबाह्य आहे. त्यामुळे हा निर्णय नरहरी झिरवळ यांच्याकडे आला पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

“मला न्यायची आपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारे नाही. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहेत. त्यांना निकाल आपल्या बाजूने येईल असं वाटत आहे, कारण आपण न्याय विकत घेऊ शकतो हा मस्तवलापणा आहे. पण आमचा न्यायावर विश्वास आहे. घटनापीठाने प्रदीर्घ काळ सुनावणी घेतली आहे. हा जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तसाच तो देशाला संविधान, घटना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय लोकशाही. संविधानाची हत्या करणार नाही अशी खात्री आहे. आजचा निर्णय या देशात लोकशाही आहे की नाही, स्वातंत्र्य टिकलं आहे की नाही,  संसद आणि विधानसभेचं महत्व आहे की नाही, न्यायालये स्वतंत्र आहेत की नाही हे आज स्पष्ट होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

हेही वाचा :  Beauty tips : चेहऱ्यावरील वांग चारचौघात जाण्यापासून रोखतायत? केवळ 'हा' एक उपाय करून पाहा पडेल मोठा फरक

फडणवीसांनी निकालाआधी बोलणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की “तेच अनेक दिवस बोलत आहेत. आम्हाला निकालाची चिंता करण्याची गरज नाही असं म्हणण्याचा मूर्खपणा तेच करत आहेत. आता त्यांना बुद्दी सुचलवी असेल तर त्यांना सत्याची जाणीव झाली असेल. ते आणि ज्यांना मांडीवर घेतले मुर्खच आपल्या बाजूने निकाल लागेल असं म्हणत आहेत. फडणवीसांनी या मूर्खांना आवरलं पाहिजे”. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …