Pune News : केशवनगर-खराडी परिसरात घोंगावतोय डासांचा लोंढा; मुठा नदीवरचा Video पाहून भरेल धडकी

Mosquito Storm Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच आता पुण्यातील केशवनगर मुंढवा खराडी परिसरातील एक व्हिडीओ (Mosquito Storm in pune) सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, केशवनगरच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डासांचं वावटळ निर्माण झालंय. त्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील पहायला मिळतंय. कशामुळे अचानक या परिसरात डास आले? नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जातोय.

फक्त केशवनगर किंवा खराडीच नाही तर पुण्यातील नदीकिनारच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डास झालेत. सध्या सोशल मीडियावर मुठा नदीच्या परिसरामध्ये डासांचे लोटच्या लोट घोंगावताना दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे, मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साठलेली जलपर्णी… या वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर,कीटक आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याचं चित्र समोर आलंय. मात्र, महानगरपालिका प्रशासन यावर काहीच उपाययोजना करताना दिसत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जातोय.

काही वर्षापूर्वी पुणे महानगरपालिकेने मुंढवा परिसरामध्ये जॅकवेल प्रकल्प या ठिकाणी सुरु केला होता. या प्रकल्पाजवळ असलेल्या बंधाऱ्याजवळ पाणी साचून राहिल्याने अनेकदा फेसाळ पाणी नदीपात्रात दिसतं. त्यामुळे ठिकठिकाणी जलपर्णी साठली आहे. त्यामुळे परिसरात डासांची पैदास देखील वाढल्याचं चित्र पहायला मिळतंय. त्याचा परिणाम आसपास राहणाऱ्या नागरिकांवर होताना दिसतोय. मात्र, महापालिका कोणताही ठोस पर्याय शोधत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :  Russia Ukraine War Live: “युक्रेनला आर्थिक पाठबळ अन् रशियाविरुद्ध…;” झेलेन्स्की यांची बायडेन यांच्याकडे मागणी

पाहा Video

दरम्यान, केशवनगर परिसरातील नागरिकांना डेंगी आणि मलेरिया अशा समस्यांना सामोरं जावं लागत असल्याने महापालिकेने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये. दरवेळी वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. मात्र, यावेळी कोणतीही उपाय न राबवल्याचा संताप ग्रामस्थ सुजित घुटे यांनी व्यक्त केला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …