Tag Archives: Marathi News

मुंबईत मॉर्निंग वॉकनं बिघडू शकतं आरोग्य! सरकारकडून खबरदारीचा इशारा

Avoid Morning Walk: तुम्ही तुमच्या आरोग्याच्या हितासाठी मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉकला जाता का? पण आता तुम्हाला हा वॉक बंद करावा लागू शकतो. राज्य सरकारकडून यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  वायू प्रदूषण वाढल्याने आरोग्य विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि लगतच्या 17 मुख्य शहरांमध्ये प्रदूषणामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शहरांतील धूलिकण वाढल्याने आरोग्य …

Read More »

ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंचाला किती मिळतो पगार?

Sarpanch Salary: राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष, गाव पॅनलच्या उमेदवारांचे उमेदवार या निवडणुकीला उभे होते. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार गट, कॉंग्रेस आणि इतर. यापैकी कोण किती  ग्रामपंचायती जिंकणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  यामध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचाय निवडणुकीच्या निकालातून आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकींचा …

Read More »

महिला सरकारी अधिकाऱ्याच्या हत्येचा उलघडा; ऑफिसमधला कर्मचारीच निघाला खरा आरोपी

Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमध्ये (Bengaluru) वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या प्रकारात आता महत्त्वाचा खुलासा झाला आहे.  43 वर्षीय एस. प्रतिमा यांची राहत्या घरातच गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Bengaluru …

Read More »

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

MPSC Recruitment 2023: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्राध्यापक पदाच्या एकूण 32 …

Read More »

इस्रो प्रमुख सोमनाथ आत्मचरित्रामुळे एक पाऊल मागे? वाद चिघळल्यानंतर घेतला मोठा निर्णय

K Somnath Nilavu Kudicha Simhanal: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या आत्मचरित्रामुळे देशभरात खळबळ उडाली होती. यामध्ये त्यांनी मोठमोठे गौप्यस्फोट केले होते. यातून अनेक वाद निर्माण होऊ लागले होते. यामध्ये त्यांनी माजी इस्रो प्रमुख सिवन यांच्यावर आरोप केले होते. देशभरात उडालेल्या खळबळीनंतर त्यानंतर आता एस. सोमनाथ यांनी आपले ‘निलावु कुडिचा सिम्हल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तुर्तास टाळण्याचा निर्णय घेतला …

Read More »

महिला भूवैज्ञानिकाची घरात घुसून हत्या, भावाच्या फोनमुळे झाला उलघडा

Crime News : कर्नाटकची (Karnataka Crime) राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेची तिच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. बंगळुरूमध्ये एका महिला भूवैज्ञानिकाची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी (Karnataka Police) दिलेल्या माहितीनुसार, गळा आवळून व गळा चिरल्याने मृत्यू …

Read More »

‘राजकारण्यांना वेळ नाही, त्यांच्याच नाटकाचे खूप प्रयोग लागलेत’; प्रशांत दामलेंचा खोचक टोला

सर्फराज मुसा, झी मीडिया, सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले (Prashant Damle) यांना रविवारी सांगली (Sangli) जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना अभिनेते प्रशांत दामले यांनी राजकारण्यांना खोचक टोला लगावला आहे. राजकारणी ही आमच्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत,नाट्य कलाकार तीन तास काम …

Read More »

हे टॅलेंट देशाबाहेर जायला नको… गर्लफ्रेंडच्या कुटुंबियांपासून वाचण्यासाठी तरुणाची शक्कल

Viral Video : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या गुपचूप भेटीचे अनेक मजेदार किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. बॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मात्र कधी कधी ही चोरी पकडली जाते. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडलाय. या गुपचूप भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता, मात्र तो पकडला गेला. घरच्यांनी शोधाशोध केल्यानतंर …

Read More »

आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी घेतला चिमुकलीचा जीव; जमिनीवर आपटल्याचा आरोप

Crime News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये नवजात बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या तृतीयपंथीयांनी (transgender) त्याचा जीव घेतला आहे. तृतीयपंथीयांनी हिसकावून घेतल्याने नवजात मुलीचा मृत्यू झाला. वाद झाल्यानंतर संतापलेल्या तृतीयपंथीयांनी दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीला खाली आपटलं आणि तिचा मृतदेह घरात फेकून दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार …

Read More »

2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Elections : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका गेले तीन वर्षे रखडल्या असल्या तरी आज 2353 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातल्या काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक राजकीय नेत्यांना ताकदीचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. या निवडणुकीचा …

Read More »

‘यांनी तर महादेवालाही सोडले नाही’; बेटिंग अ‍ॅपवरुन पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

PM Narendra Modi on Mahadev Betting App : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचलनालयाने (ED) महादेव बुक बेटिंग अ‍ॅपप्रकरणी (Mahadev Betting App) समन्स बजावल्यामुळे याची देशभरात चर्चा सुरू झाी आहे. अशातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ((Bhupesh Baghel) यांचेही याप्रकरणात नाव आल्यानंतर राजकारण तापलं आहे. याची दखल आता थेट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली आहे. छत्तीसडमध्ये एका …

Read More »

‘साहेब पाकिट मिळाले…’; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक

Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) लाचलुचपत विभागाने (ACB) विक्रमी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या सापळ्यात अडकल्यानंतर आता चक्क एक कोटी रुपयांची लाच घेताना मोठ्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. शासकीय ठेकेदाराचे काम केल्याच्या बदल्यात अभियंत्याने तब्बल एक कोटींची लाच घेतली आहे. हा अभियंता नगर जिल्ह्यातील (ahmednagar) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या या कारवाईने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराच्या वाढत्या दरांचा खुलासा होणार …

Read More »

‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी मुलगी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP News: प्रेमाला देशांच्या सीमेच्या मर्यादा नसतात. गेल्या काही महिन्यात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. कोणी आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आले तर कोणी भारतातून पाकिस्तानात गेले. सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया.  भारतातील प्रियकराला भेटण्यासाठी, त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रेयसी दुबईहून भारतात आली. उत्तर प्रदेशच्या बस्ती येथे …

Read More »

दिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’

Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना …

Read More »

आता एससीच्या विद्यार्थ्यांना द्यावं लागणार ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Non Creamy Layer Certificate : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला असताना अनुसूचित जातीच्या (SC) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी (scholarship) नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), मराठा समाज तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांकरिता असलेल्या स्कॉलरशिप आणि परदेशी …

Read More »

इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, ‘बायको नसल्याने रात्री…’

Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे.  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने …

Read More »

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : तुमचं नाव जर ‘मनोज’ असेल तर एका हॉटेलमध्ये तुम्हाला मोफत जेवण मिळणार आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडच्या अमृत हॉटेलचे मालक बाळासाहेब भोजने यांनी जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. भोजने यांनी मनोज नावाच्या व्यक्तीला आधार कार्ड दाखवून 23 ऑक्टोबरपासून येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत मोफत जेवण दिले …

Read More »

WhatsApp वर ‘हे’ नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार…

Whatsapp New Features : WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ …

Read More »

कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या

Anti Venom Snack: ‘बिग बॉस 2’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. परदेशातील महिलांना बोलावून सापाचं विष आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विषारी सापांच्या विषाचा उपयोग अ‍ॅण्टी वेनम तयार करण्यासाठी करतात. पण रेव्ह पार्ट्यांमध्ये याचा उपयोग नशा म्हणून केला जातो. दरम्यान अ‍ॅण्टी वेनमसाठी कोणत्या सापाचे विष लागते? हा साप खूप विषारी असतो. बहुतेक लोक …

Read More »

पत्नीसोबत निघालेल्या बाईकस्वारावर काळ होऊन कोसळली बाल्कनी; मृत्यूचा थरार CCTVत कैद

Accident News : हरियाणाच्या (haryana) पानिपत (panipat) शहरात गुरुवारी एक मोठा अपघात घडला आहे. बाल्कनी अंगावर कोसळल्याने (wall collapse on biker) एका बाईकस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत व्यक्तीची पत्नी थोडक्यात बचावली आहे. पानिपत येथील पचरंगा बाजार येथे बाईकवरून जात असताना 80 वर्षांच्या जीर्ण घराची बाल्कनी पडल्याने या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्याचा जागीच …

Read More »