BSEB Intermediate Result 2022: बिहार बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

BSEB Intermediate Result 2022: बिहार शालेय परीक्षा मंडळ (Bihar School Examination Board, BSEB) चा बिहार बोर्ड इंटरमिजिएट निकाल (bihar board 12th result live) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना बिहार बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट biharboardonline.bihar.gov.in वर निकाल पाहता येणार आहे. आर्ट्, कॉमर्स आणि सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांचा निकाल राज्याचे शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत एकूण १३.५ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

बिहार बोर्ड इंटरमीडिएट परीक्षा १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान करोना प्रतिबंध नियमांचे पालन करुन ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. इयत्ता बारावीनंतर बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना निकालाशी संबंधित नवीनतम माहितीसाठी वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यावर्षी सायन्स स्ट्रीममध्ये ५ लाख ६७ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३ लाख ८० हजार ६५ मुले आणि १ लाख ८७ हजार ४०८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी २ लाख ६५ हजार २१८ विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये, १ लाख ८२ हजार ९१९ विद्यार्थी द्वितीय, तर ४, ७६४ विद्यार्थी तृतीय विभागात उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत एकूण ४ लाख ५२ हजार ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हेही वाचा :  Employment: गेल्या सात वर्षात रोजगार २२ टक्क्यांनी वाढला, 'या' क्षेत्रात वाढल्या संधी

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा
बिहार बोर्ड इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान ३३ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना थ्योरी आणि प्रात्यक्षिक या दोन्ही पेपरमध्ये किमान गुण मिळणे आवश्यक आहे.

NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक
इयत्ता बारावीचे विद्यार्थी निकालासंदर्भातील कोणत्याही अडचणीसाठी बिहार बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी ०६१२ २२३०००९ किंवा [email protected], biharboard.ac.in/contact-us वर संपर्क साधू शकतात.

IIIT नागपूरमध्ये भरती, डिप्लोमा आणि पदवीधरांना नोकरीची संधी

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …